मोदी व शहा लिखित आणि देवेंद्र फडणवीस दिग्दर्शित `पवारांचं वस्त्रहरण` या एकांकिकेचा पहिला प्रयोग बुधवारी, ५ जुलै रोजी छगन भुजबळ यांच्या `एमईटी` या मुंबईच्या उपनगरात असलेल्या संस्थेत पार पडला. या एकांकिकेत अजित पवार यांची प्रमुख भूमिका होती आणि त्यांच्या जोडीला हवशे, नवशे व गवशे यांनी एकांकिकेतील संहितेनुसार त्यांना…
या आहेत दोन घटना. त्यापैकी पहिली आहे, १९७७ सालची आणि दुसरी आहे, ताजी एप्रिल २०२३ मधली. पहिली घटना आहे, भारतातील आणि दुसरी आहे अमेरिकेतील. या चार दशकांच्या फरकानं घडलेल्या दोन्ही घटनांकडं आज मागं वळून बघायचं कारण म्हणजे गेले १० दिवस महाराष्ट्रात राजकीय तमाशाचा लागलेला वेग आणि त्यावरून प्रसार…
महेंद्र दळवी आणि बच्चू कडू. हे दोघेही आज शिंदे गटात सामील झालेले आहेत. या दोघांपैकी दळवी हे अलिबागचे आमदार आहेत आणि त्यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्याखाली आणि मारहाणीबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला होता. या संबंधात अलिबाग येथील सत्र न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. त्याची सुनावणी होऊन सत्र न्यायाधीश विभा इंगळे यांनी…
‘पाकिस्तानी लष्कराची गुप्तहेर शाखा असलेल्या ‘आयएसआय’चे माजी प्रमुख हमीद गूल हे राक्षसी वृत्तीचे होते आणि भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया करण्यात त्यांचा प्रमुख हात होता, अशी त्यांची प्रतिमा आपल्या देशातील प्रसार माध्यमातून उभी केली जात असते. मात्र जनरल हमीद गूल यांच्या व्यक्तिमत्त्वाची दुसरीही एक बाजू आहे आणि त्याचीही चर्चा होण्याची…
भारतीय सैन्यदलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका व इतर ११ सैन्यदल अधिकारी व जवानांचा हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यावर समाज माध्यमांवरून जी गरळ ओकली जात आहे, त्यानं समाजमनात विद्वेषाचं विष पद्धतशीररित्या किती भिनवलं गेलं आहे, याचं पुन्हा एकदा प्रत्यंतर येत आहे. मृत्यू, मग तो कोणाचाही असो,…
नरेंद्र मोदी असू देत वा मनमोहन सिंह किंवा नरसिंह राव अथवा अटलबिहारी वाजपेयी,यापैकी कोणाताही नेता पंतप्रधान असताना त्याच्या सरकारनं आर्थिक सुधारणांचा विषय काढला की, राजकीय रण माजणं, हे गेल्या ३० वर्षांत अपरिहार्य बनलं आहे. साहजिकच मोदी सरकारनं लॉकडाऊनच्या काळात कृषीविषयक सुधारणा करणारे तीन वटहुकूम प्रथम जारी केले व…
संसदेतील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी मोदी सरकारवर ‘राफाल’ ची तोफ डागली. गेली तीन दशकं भाजपासह सर्व रिोधी पक्ष भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढं आला की, एखाद्या कर्मकांडाप्रमाणं ‘बोफोर्स’चं नाव घेत आले आहेत. किंबहुना मोदी सरकार २०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर त्यानं हे ‘बोफोर्स’ प्रकरण पुन्हा…
घटनात्मक नैतिकतेच्या चौकटीत जर ही राज्यघटना राबवली, तर ती सर्वोत्तम ठरेल, पण ही चौकट झुगारून जर राज्यघटना राबवली गेली, तर ती वाईट असल्याचे मानलं जाईल हे उदगार आहेत, डॉ. बाबासाहेब आंबडकर यांचे. घटना समितीत राज्यघटनेचा अंतिम मसुदा संमत करण्यासाठी मांडण्यात आला, तेव्हा केलेल्या भाषणात काडलेले. आज या उदगारांची…
या लेखाचं हे शीर्षक मुद्दामच दिलं आहे. मोदी सरकार केंद्रात सत्तेत आल्यापासून काश्मीर खोर्यात जे काही चालू आहे, त्याचं प्रतीक म्हणून ‘राष्ट्रीय रायफल्स’ या निमलष्करी दलाच्या (राष्ट्रीय रायफल्स हे भारतातील एकमेव निमलष्करी दल आहे. या दलात भारतीय सैन्यदलातील अधिकारी व जवान कार्यरत असतात. सीमा सुरक्षा दल, केंद्रीय सुरक्षा…
या वर्षाच्या प्रारंभाला महाराष्ट्रात जे ‘भीमा-कोरेगाव’ प्रकरण घडलं, त्या निमित्तानं माओवाद्यांच्या अटकेचं जे सत्र राज्याच्या पोलिसांनी सुरू केलं आहे, त्याचा उद्देश हा दलित चळवळीला बदनाम करण्याचाच आहे, याबद्दल अजिबात शंका घेण्याचं कारण नाही. मात्र राज्यातील भाजपा-सेना युतीच्या सरकारला ही संधी दलित चळवळीनंच मिळवून दिली आहे, हेही तेवढंच कटू सत्य आहे. ‘भीमा-कोरेगाव’ प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकर यांनी…