fbpx
Tag

RSS

Browsing
फेक न्यूज मागचं खरंखोटं

या महिन्याच्या सुरुवातीला केंद्र सरकारने सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरील खोटी माहिती किंवा फेक न्यूज काढून टाकण्यासाठी इंफोर्मेशन टेक्नॉलॉजी नियम २०२१ मध्ये बदल प्रस्तावित केला. त्यासाठी सरकारच एक वेगळं फॅक्ट चेक युनिट बनवणार असल्याचं घोषित केलं आणि सोशल मिडियामधून सरकारला वाटेल ती खोटी माहिती किंवा फेक न्यूज ओळखून, ती थेट…

rahul_gandhi_disqualified

महेंद्र दळवी आणि बच्चू कडू. हे दोघेही आज शिंदे गटात सामील झालेले आहेत. या दोघांपैकी दळवी हे अलिबागचे आमदार आहेत आणि त्यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्याखाली आणि मारहाणीबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला होता. या संबंधात अलिबाग येथील सत्र न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. त्याची सुनावणी होऊन सत्र न्यायाधीश विभा इंगळे यांनी…

वीर टिपू सुलतान क्रीडा संकुलः नावात काय आहे?

कालच्या प्रजासत्ताक दिनी मुंबईमध्ये पुन्हा एकदा मैदानाला नाव देण्यावरून वाद बघायला मिळाला. मालाड येथील एका मैदानाला टिपू सुलतान असं नाव दिल्याने भाजप, बजरंग दल आदी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. भाजपचं सरकार २०१४ मध्ये केंद्रात सत्तेत आल्यापासूनच स्थळं, शहरं आदींची मुस्लिम नावं बदलण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे. कालच्याच दिवशी…

हरिद्वार धर्म संसद

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (संघ) स्थापना १९२५ साली महात्मा गांधींच्या सर्वसमावेशक भारतीय राष्ट्रवादाला म्हणजेच नव्याने निर्माण होत असलेल्या ‘आयडिया ऑफ इंडिया’ला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी केली. ब्रिटिशांनी भारत जिंकला तो मुख्यत्वे पेशव्यांकडून जिंकला. अर्थातच येथून निघून जाताना ब्रिटिशांनी भारताचे राज्य पेशव्यांच्या वारसांकडे सोपवले पाहिजे, असे या मंडळीचे मत होते.…

भाजपची पुढची प्रयोगशाळा – उदाहरणार्थ, तेलंगणा

सध्या राजकारणात उत्तर प्रदेश निवडणुकांची चर्चा चालू आहे. भारतीय जनता पक्षासाठी आणि त्याच्या हिंदुराष्ट्र प्रकल्पासाठी उत्तर प्रदेश हे अत्यंत कळीचं राज्य ठरणार आहे. इथला पराभव किंवा जेमतेम विजय हा भाजपला फटका देणारा असेल. अयोध्येतील राममंदिराचं सर्वात मोठं आश्वासन पूर्ण करूनही उत्तर प्रदेशात जर थोडीसुध्दा पीछेहाट होणार असेल तर…

बुल्ली बाई अॅप | मुस्लिम महिलांच्या लिलावामागची मानसिकता

या नवीन वर्षाची सुरुवात कोविडच्या संसर्गामुळे शांततेत व्हावी असं वाटत असतानाच सोशल मिडियावर देशातल्या १०० मुस्लिम महिलांचा एका ॲपमार्फत ‘बुल्ली बाई’ या नावाखाली ऑनलाईन लिलाव मांडण्यात आला. तुमची शारिरीक भूक भागवण्यासाठी बायकांना विकत घ्या असाच संदेश यातून द्यायचा होता. त्यातून मुस्लिम महिलांची नावं आणि फोटो वापरून हिंदूराष्ट्रामध्ये त्यांचं…

हरिद्वार धर्म संसद | बीबीसी/वर्षा सिंह

हिंदू युवा वाहिनीने (आदित्यनाथ प्रणित) हरिद्वारला भरवलेल्या धर्मसंसदेमध्ये मुसलमानांच्या वंशसंहाराची कत्तली करण्याच्या घोषणा करण्यात आल्या, हिंदुराष्ट्राच्या स्थापनेची द्वाही फिरवण्यात आली, विखारी आणि द्वेषाने ओतप्रोत भरलेल्या शपथा घेण्यात आल्या,भाषणे केली गेली याला आता आठवडा होत आला आहे. एका समूहविरोधात हिंसेला चिथावणी देऊन समाजाला अराजकाच्या बेबंदशाहीच्या खाईत लोटायला निघालेल्या या…

Nehru & China Policy

दुसऱ्या महायुद्धातील एक घटना! दोस्त राष्ट्रांनी जर्मनीतील एका भागात हवाई मार्गे एक भलमोठे असे मशीन टाकले. विविध लहान लहान यंत्रे, त्यांवर कांही नावे, तत्कालीन उपकरणे यांना असंख्य वायर्सनी एकमेकांशी जोडून हे यंत्र तयार केले होते. जमीनीवर पाहून हे यंत्र तात्काळ उचलून जवळच्या प्रयोगशाळेत नेऊन संशोधन सुरू झाले. कांही…

आंतरराष्ट्रीय दौ-यावर (ऑगस्ट 2018) गेलेल्या राहुल गांधी यांनी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटर्जिक स्डडीज येथे आपल्या आपल्या भाषणात म्हटले होते की, “राष्ट्रीय स्वयंसेवी संघटना देशाचा आत्माच बदलण्याचा प्रयत्न करीत आहे. भारतातील अन्य कोणत्याही संघटना अशा नाहीत ज्या इथल्या प्रमुख संस्थांवर ताबा मिळवू इच्छितात… अरब विश्वात अस्तित्वात असलेल्या मुस्लिम ब्रदरहुडप्रमाणे…

Dhule - Source: scroll.in

धुळे जिल्ह्यात भटक्या समाजातील पाच नागपंथी डवरी गोसावी जमातीतील भिक्षेकर्‍यांना ठेचून मारण्याची घटना घडली आहे. ही घटना अत्यंत दु:खद आणि निषेधार्ह आहे. याचप्रकारची घटना ओरीसामध्ये घडली आणि ओरीसामध्ये सरकारी योजनांचा प्रचार करणार्‍या कलावंताला पोरे पळविणार्‍या टोळीचा माणूस म्हणून पकडण्यात आले आणि तिथेल्या त्याला मारण्यात आले. त्याच्याआधी अकलख नावाच्या…