या महिन्याच्या सुरुवातीला केंद्र सरकारने सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरील खोटी माहिती किंवा फेक न्यूज काढून टाकण्यासाठी इंफोर्मेशन टेक्नॉलॉजी नियम २०२१ मध्ये बदल प्रस्तावित केला. त्यासाठी सरकारच एक वेगळं फॅक्ट चेक युनिट बनवणार असल्याचं घोषित केलं आणि सोशल मिडियामधून सरकारला वाटेल ती खोटी माहिती किंवा फेक न्यूज ओळखून, ती थेट…
सध्या देशासमोर महागाई, गरिबी, बेरोजगारी, अन्न, शिक्षण हे प्रश्न नसून बॉलिवूड कलाकार रणवीर सिंगचे‘बम’ (कुल्ले) हा राष्ट्रीय विषय झाला आहे. त्याने केलेल्या न्यूड फोटो मॉडेलिंगमुळे त्याच्याविरोधात पोलीसतक्रारी झाल्या आणि तक्रार करणाऱ्याने हा राष्ट्रीय मुद्दा असल्याचं जाहीर करत त्याचा निषेध व्यक्त केला. आताअशा मोठ्या मोठ्या समस्या भारतासमोर अनेकदा उभ्या…
“भूक ही भूक असते, पण शिजवलेलं मांस काटा-चमच्याने खाणाऱ्याच्या भूकेपेक्षा कच्चं मांस हात, नखं आणि दाताने तोडणाऱ्याची भूक वेगळी असते.” कार्ल मार्क्सचे हे शब्द भारतासारख्या देशातील करोडो गरीब जनतेला लागू होतात. पण अशा देशातही अन्नावरून लोकांची हत्या केली जाते, विशिष्ट अन्नं खाल्लं म्हणून लोकांना धमकावलं जातं, माणसाच्या स्पर्शाने…
पु. ल. देशपांडेंचं साहित्य हे आजही मराठी शहरी मध्यमवर्गाकडून डोक्यावर घेतलं जातं आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्व म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांच्या पुस्तकांच्या नवनव्या आवृत्त्या सातत्याने येत असतात. महाराष्ट्रातल्या थोर व्यक्तीमत्वांमध्ये त्यांची गणना होते. सध्याच्या स्टँडअप कॉमेडी प्रकाराच्या कितीतरी वर्ष आधी पु. ल. यांनी त्यांच्या वाचकांना, प्रेक्षकांना हसवण्याचं काम…
आजकाल बिगर भाजप नेत्यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालयाची (ईडी) धाड पडणं ही अगदीच सामान्य बाब झाली आहे. टपरीवर जाऊन चहा पिवून येऊ, अशा थाटात ईडीचे अधिकारी बिगर भाजप नेत्यांवर धाडी, त्यांना अटक आदी बाबी करताना दिसते. ईडी लावत असलेल्या आरोपांमधील गांभीर्य हे इतके संपुष्टात आले आहे की, सर्वोच्च न्यायालयाचे…
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात, हिटलरच्या नाझी विचारसणीने अनेकांना भुरळ घातली असली तरी त्याला विरोध करणाऱ्यांची संख्याही कमी नव्हती. नाझी विरोधी प्रचाराचा भाग म्हणून, कच्च्या कोबीचं लोणचं खातात म्हणून जर्मनांना हिणवलं जायचं. पण नाझी विचारसणी एवढी वर्चस्ववादी आणि हेकेखोर होती की त्यांनी त्या विरोधकांना उलट सुनावलं. “होमलँड कुकिंग” नावाचं एक…
कालच्या प्रजासत्ताक दिनी मुंबईमध्ये पुन्हा एकदा मैदानाला नाव देण्यावरून वाद बघायला मिळाला. मालाड येथील एका मैदानाला टिपू सुलतान असं नाव दिल्याने भाजप, बजरंग दल आदी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. भाजपचं सरकार २०१४ मध्ये केंद्रात सत्तेत आल्यापासूनच स्थळं, शहरं आदींची मुस्लिम नावं बदलण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे. कालच्याच दिवशी…
डिजिटल जगामध्ये कितीही नवीन तंत्रज्ञान आलं आणि एखादी गोष्ट तयार करणारा शोधणं मुश्कील होऊन बसलं तरी त्याचे “फूटप्रिंट” राहतातच. याचं उत्तम उदाहरण म्हणजे गेल्या आठवड्यात कायदेतज्ज्ञ असलेल्या ब्रिटिश अध्यापक डॉ. लिझा लोडो गॉमसेन यांनी फेसबुकच्या विरोधात दावा केला असून कंपनीने आपल्या ४४ दशलक्ष सदस्यांना तीन बिलियन डॉलरची भरपाई…
या नवीन वर्षाची सुरुवात कोविडच्या संसर्गामुळे शांततेत व्हावी असं वाटत असतानाच सोशल मिडियावर देशातल्या १०० मुस्लिम महिलांचा एका ॲपमार्फत ‘बुल्ली बाई’ या नावाखाली ऑनलाईन लिलाव मांडण्यात आला. तुमची शारिरीक भूक भागवण्यासाठी बायकांना विकत घ्या असाच संदेश यातून द्यायचा होता. त्यातून मुस्लिम महिलांची नावं आणि फोटो वापरून हिंदूराष्ट्रामध्ये त्यांचं…
उरी येथे दहशतवाद्यांनी लष्करी ठाण्यावर हल्ला केला आणि त्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्काराने सर्जिकल स्ट्राइक केला. अर्थात असे सर्जिकल स्ट्राईक यापूर्वीही भारतीय लष्कराने अनेकदा केले होते. मात्र भारतीय लष्कराचे श्रेय लोकनियुक्त सरकारने घेण्याच्या प्रथा तेव्हा पडलेल्या नव्हत्या. उरीनंतर केलेला सर्जिकल स्ट्राईक मात्र छप्पन इंच छातीच्या नरेंद्र मोदी यांच्या…