fbpx
Author

नचिकेत कुलकर्णी

Browsing
हरिद्वार धर्म संसद | बीबीसी/वर्षा सिंह

हिंदू युवा वाहिनीने (आदित्यनाथ प्रणित) हरिद्वारला भरवलेल्या धर्मसंसदेमध्ये मुसलमानांच्या वंशसंहाराची कत्तली करण्याच्या घोषणा करण्यात आल्या, हिंदुराष्ट्राच्या स्थापनेची द्वाही फिरवण्यात आली, विखारी आणि द्वेषाने ओतप्रोत भरलेल्या शपथा घेण्यात आल्या,भाषणे केली गेली याला आता आठवडा होत आला आहे. एका समूहविरोधात हिंसेला चिथावणी देऊन समाजाला अराजकाच्या बेबंदशाहीच्या खाईत लोटायला निघालेल्या या…

अलीकडच्या काळात दोन प्रसिद्ध आणि बोलक्या (vocal या अर्थी) सार्वजनिक काका-मामांमध्ये (public figures) एक जुना वाद नव्याने रंगला होता. इंदिरा गांधी, जयप्रकाश नारायण आणीबाणी, जनता पक्ष अशा व्यक्ती आणि घटितांच्या भूमिकांचा, इतिहासाचा संदर्भ या वादाला होता. मात्र वादाचे राजकीय सद्यस्थितीशी जोडलेले संदर्भही पुरेसे उघड होते. नंतर बऱ्याच हौशा-नवशानी…

फॅसिस्ट पक्ष ,संघटना सरकारे आणि फेक न्यूज यांचा परस्परसंबंध ही काही अलीकडेच समोर आलेली बाब नाही , हा संबंध जुनाच आहे . गोबेल्सनीती हा शब्द रूढ झालेला आहेच.सध्याच्या  अतिउजव्या -हुकूमशाही-फासिस्ट शक्तींच्या जागतिक उभाराच्या काळात post truth, alt (alternative) facts या संकल्पनांसोबत फेक न्यूजची संकल्पना जोडली गेली आहे .…

अटल बिहारी वाजपेयींचे मूल्यमापन हा या लेखाचा हेतू नाही , त्यांच्या गुणगानात वाहून गेलेल्या उदारमतवादी पुरोगाम्यांच्या गफलती गैरसमजुती दाखवून देणे हादेखील नाही। मात्र उदारमतवादी पुरोगामी (आणि काही डावे म्हणवून घेणारे सुद्धा!)अटलप्रशस्ती का करत आहेत ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न ह्या लेखात करायचा आहे। ढोबळमानाने पुरोगाम्यांच्या अटलप्रशस्तीच्या दोन तऱ्हा…

त्रिपुरा निवडणुकीनंतर - डाव्यांपुढे नवी आव्हाने.

त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत सलग २५ वर्षे सत्तेत असलेल्या डाव्या आघाडीचा पराभव करून भारतीय जनता पक्ष-इंडिजिन्स पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा यांच्या आघाडीने राज्यात ४३ जागा जिंकत दोन तृतीयांश बहुमत मिळवले आहे. डाव्या आघाडीला ४५% मते मिळाली तरी जागा मात्र १६ आहेत. देशातील सर्वात गरीब मुख्यमंत्री अशी ख्याती मिळवलेले कॉ.…

अँड्रिया : ज्या राष्ट्रात नायक पैदा होत नाहीत ते राष्ट्र खरोखरच दुर्दैवी आहे. गॅलिलिओ : नाही अँड्रिया, ज्या राष्ट्रांना कायम नायकाची प्रतीक्षा असते, ती खरी दुर्दैवी आहेत. ( बर्टोल्ट ब्रेख्तच्या ‘लाईफ ऑफ गॅलिलिओ’ या नाटकातील संवाद ) सर्वोच्च न्यायालयाच्या चार ज्येष्ठ न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन सरन्यायाधीशांशी असलेले मतभेद…

गुजरातच्या निवडणुकांचे मतदान पार पडले आहे आणि निकालांची प्रतीक्षा आहे. या निवडणुकीदरम्यान दिसून आलेली एक लक्षणीय बाब म्हणजे कॉंग्रेस पक्ष आणि त्या पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेला जोमदार आणि सुनियोजित प्रचार. इतक्या हिरीरीने राहुल गांधी प्रचारात उतरल्यामुळे आणि तथाकथित गुजरात मॉडेल – विकास-अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावर आत्मविश्वासाने प्रधानमंत्री…

(स्कुल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज, लंडन ,यांनी नचिकेत कुलकर्णी यांस निमंत्रित केले असून येत्या ९ नोव्हेंबरला नचिकेत याच विषयावरील विस्तृत निबंध तेथे सादर करणार आहेत.) ७ नोव्हेंबरच्या दिवशी बोल्शेविक क्रांतीची शंभर वर्षं पुरी होत आहेत. मार्क्सवादी इतिहासकार एरीक हॉब्सबॉम यांनी विसाव्या शतकाचे वर्णन age of extremes असे…

जातीअंताची वैचारिक भूमिका आणि डाव्या संघटनांच्या नेतृत्वाचे जातिय/सामाजिक चरित्र ( caste character ) हा एकंदरच भारतीय डाव्या चळवळीला भेडसावणारा प्रश्न आहे आणि jnu त्याला अपवाद नाही , (किंबहुना उच्च शिक्षणाच्या लोकशाहीकरणाचा मुद्दा बॅकसीट वर राहिल्यामुळे ,जे एन यु सारख्या विश्वविद्यालयात इंग्रजी भाषक जातवर्गीय अभिजनवादाचा अंतःप्रवाह कायमच राहिला आहे…

समाजवादी साथी फॅसिझम दिसता खाती माती असं म्हणणं हे अर्धसत्य आहे कारण प्रश्न केवळ फॅसिझमविरोधी लढाईत दगा  देण्याचाच नाही.  संघाच्या फॅसिझमला मुख्य प्रवाहात आणण्याचं समाजवाद्यांचे योगदान वादातीत आहे. आचार्य नरेंद्र देव यांच्यासारख्या थोर  दार्शनिक नेत्याचा आणि नंतरच्या टप्प्यावर मधू लिमयेंचा अपवाद वगळता समाजवादी पक्ष /आंदोलनाला वैचारिक राजकीय दिशा…