या महिन्याच्या सुरुवातीला केंद्र सरकारने सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरील खोटी माहिती किंवा फेक न्यूज काढून टाकण्यासाठी इंफोर्मेशन टेक्नॉलॉजी नियम २०२१ मध्ये बदल प्रस्तावित केला. त्यासाठी सरकारच एक वेगळं फॅक्ट चेक युनिट बनवणार असल्याचं घोषित केलं आणि सोशल मिडियामधून सरकारला वाटेल ती खोटी माहिती किंवा फेक न्यूज ओळखून, ती थेट…
१९८० च्या दशकात मिरवणुका निघत. मंदिर वही बनायेंगे अशा घोषणा दिल्या जात. बाबरच्या अवलादींचा उध्दार होई. डोक्याला भगवी पट्टी, हातात त्रिशूल. चेहऱ्यावर समोरच्याचा खूनच करू असा त्वेष. अत्यंत प्रक्षोभक भाषणं होत. प्रत्येक हिंदूने दोन-पाच मुसलमान मारलेच पाहिजेत असा माहोल तयार होई. हे सर्व आपल्या आजूबाजूला घडे. ( ज्यांचा…
उत्तराखंडमध्ये १४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सत्तारुढ भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये सरळ लढत आहे. एकूण ७० विधानसभा जागांसाठी ६३२ उमेदवार मैदानात असून लोकांच्या खऱ्या प्रश्नांपेक्षा लोकप्रिय घोषणाबाजीवर या निवडणुकांचा प्रचार सुरू आहे. त्याचवेळी स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्या नेत्यांचीही इथे काही कमी नाही. भाजप आणि काँग्रेसमध्ये मुकाबला सुरू असला…
कालच्या प्रजासत्ताक दिनी मुंबईमध्ये पुन्हा एकदा मैदानाला नाव देण्यावरून वाद बघायला मिळाला. मालाड येथील एका मैदानाला टिपू सुलतान असं नाव दिल्याने भाजप, बजरंग दल आदी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. भाजपचं सरकार २०१४ मध्ये केंद्रात सत्तेत आल्यापासूनच स्थळं, शहरं आदींची मुस्लिम नावं बदलण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे. कालच्याच दिवशी…
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (संघ) स्थापना १९२५ साली महात्मा गांधींच्या सर्वसमावेशक भारतीय राष्ट्रवादाला म्हणजेच नव्याने निर्माण होत असलेल्या ‘आयडिया ऑफ इंडिया’ला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी केली. ब्रिटिशांनी भारत जिंकला तो मुख्यत्वे पेशव्यांकडून जिंकला. अर्थातच येथून निघून जाताना ब्रिटिशांनी भारताचे राज्य पेशव्यांच्या वारसांकडे सोपवले पाहिजे, असे या मंडळीचे मत होते.…
सध्या राजकारणात उत्तर प्रदेश निवडणुकांची चर्चा चालू आहे. भारतीय जनता पक्षासाठी आणि त्याच्या हिंदुराष्ट्र प्रकल्पासाठी उत्तर प्रदेश हे अत्यंत कळीचं राज्य ठरणार आहे. इथला पराभव किंवा जेमतेम विजय हा भाजपला फटका देणारा असेल. अयोध्येतील राममंदिराचं सर्वात मोठं आश्वासन पूर्ण करूनही उत्तर प्रदेशात जर थोडीसुध्दा पीछेहाट होणार असेल तर…
हिंदू युवा वाहिनीने (आदित्यनाथ प्रणित) हरिद्वारला भरवलेल्या धर्मसंसदेमध्ये मुसलमानांच्या वंशसंहाराची कत्तली करण्याच्या घोषणा करण्यात आल्या, हिंदुराष्ट्राच्या स्थापनेची द्वाही फिरवण्यात आली, विखारी आणि द्वेषाने ओतप्रोत भरलेल्या शपथा घेण्यात आल्या,भाषणे केली गेली याला आता आठवडा होत आला आहे. एका समूहविरोधात हिंसेला चिथावणी देऊन समाजाला अराजकाच्या बेबंदशाहीच्या खाईत लोटायला निघालेल्या या…
मुंबईला अतिवृष्टीने झोडपल्याची आणि अभूतपूर्व, तरीही अपेक्षित अशा या वर्षावाला तोंड देण्यात अपयश आल्याची ही कितवी वेळ कोणास ठाऊक. २४ तासात २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. अगदी एकदाच जरी जोराची वृष्टी झाली, तरी पाणी तुंबणार, पूल पडणार, रेल्वेगाड्या अडणार अशा दुर्दैवी तरी नित्याच्या झालेल्या अडचणींना आपण ‘पावसाळ्यात व्हायचेच…
आपण अशा काळातून जात आहोत, जिथे समाजातील दुर्बल घटक आणि धार्मिक अल्पसंख्यांकांविरुद्धचा द्वेष प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गोमांसाच्या कारणास्तव जमावाकडून होणाऱ्या हत्या आणि विशिष्ट जातींना दिली जाणारी अपमानकारक वागणूक, दलितांना होणारी मारहाण, या पाठोपाठ देशभरात आता मूलं चोरल्याच्या अफवेमधून जमावाकडून होत असलेल्या हत्या वाढत आहेत. राजकीय पातळीवरुन…
संत कबिरांच्या ६२० व्या प्रकटदिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी अलिकडेच उत्तर प्रदेशमधील मगहर येथील त्यांच्या मजारवर जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. त्यावेळी पुन्हा एकदा भारतीय इतिहासाचे त्यांचे म्हणून जे आकलन आहे, त्यावरून वाद निर्माण झाला. मोदीजी आपल्या औघवत्या शैलीत समोर जमलेल्या श्रोत्यांना म्हणाले की गुरु नानक, बाबा गोरखनाथ आणि कबीर…