उपसभापती कार्यालय विधान परिषद यांच्या वतीने स्त्री आधार केंद्र,पुणे व विधवा महिला सन्मान कायदा अभियान समितीच्या सहकार्याने विधवा प्रथेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पुणे येथील विधानभवनात २७ मे यादिवशी परिवर्तन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला महिला व बाल विकासाचे अधिकारी, पुणे जिल्हा परिषदेच्या ग्राम विकास विभागाचे अधिकारी,…
आधुनिकतेबरोबर स्त्रीशिक्षणाची वाट अधिकाधिक सबल होत जाईल, अशी एक अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात या वाटेवर धर्मवादाचा अडसर आजही कायम आहे. या धर्मवादासमोर निधर्मीवाद (सेक्युलॅरिझम), बहुसांस्कृतिकतावाद (मल्टिकल्चरलिझम) या आधुनिक संकल्पना एकच एक उत्तर द्यायला अयशस्वी ठरत आहेत. किंबहुना धर्मवाद निधर्मीवादाला आपल्या सोयीने वापरत कधी त्याला बहुसांस्कृतिकतेच्या विरोधात उभं करतो…
शारीरिक हिंसा शक्य नसेल त्यावेळी प्रतिपक्षाच्या कर्तृत्त्वाला, त्याच्या मानदंडांना अनुल्लेखाने मारायचे. मौनाच्या या कटानंतरही प्रतिपक्षाचे मानदंड समाजमानसात तगून राहिले तर मग त्यांच्या विरोधात कुजबूज तंत्र वापरायचे. असत्याची पेरणी करण्यासाठी कधी अवास्तव कहाण्या तर कधी संभ्रमित सत्य, आभासी सत्य विविध माध्यमातून कुजबुजत राहायचे. विरोध वाढला की शांत राहायचे, विरोध…
ऊसतोडीचा हंगाम सुरु झाला की ऊसतोड कामगारांचे तांडे आपापले कोयते घेऊन पोराबाळांसह निघतात. दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील कामगार पक्ष्चिम महाराष्ट्राच्या दिशेने स्थलांतर करतात. मराठवाड्यातल्या गावागावांमधून, वाड्यावाड्यांमधून मजूर साखर कारखान्यांची दिशा पकडतात. नवराबायकोच्या जोडीला कोयता म्हणजे मजूरी जास्त मिळते. त्यामुळे नवराबायको दोघेही निघतात. साहाजिकच दहा वर्षांच्या आतली लहान लेकरंही त्यांच्याबरोबर असतात.…
दोन्ही बाजूने चिंचोळया, अंधार्या झोपड्यांची रांग, मध्ये छोटीशी गल्ली, गल्ली म्हणजे एक उघडे, वाहते गटार, त्या गटाराच्या दोन्ही बाजूने जी वितभर जागा होती तेवढ्या जागेवर पाय देत गल्लीच्या एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत कसरत करत जायचे. तिथेच बाजूला एक लहान मूल उघड्यावरच शौचाला बसले आहे. भिवंडीतील शांतीनगर असो, गायत्रीनगर…
गांधीबाबा आलेत. आपल्या १५० व्या जयंतीवर्षाचा प्रारंभ सोहळा पाहत सगळीकडे झाडू मारत फिरत आहेत. महात्माच ते. त्यांना स्वच्छतेची केवळ आवडच नाही तर स्वच्छतेचं तत्त्वज्ञानच त्यांनी तयार केललं, त्यामुळे नव्याने हाती आलेला झाडू आवडला त्यांना. झाडायला घेतलाय त्यांनी एकेक रस्ता. २०१४ मध्ये सत्तेवर आल्यावर भाजपा आघाडीचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी…
केले एखाद्याने मनुस्मृतीचं समर्थन तर तुम्ही एवढी तीव्र प्रतिक्रिया का देता? अशा पुराणमतवादी लोकांकडे दुर्लक्ष का करत नाही? आपला वेळ का वाया घालवाता? असे काही प्रश्न मनुस्मृती समर्थनाच्या विरोधात लेख लिहिल्यावर कायम विचारले जातात. ही मंडळी स्वतःला सजग, आधुनिक मानत असतात. मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी मनुस्मृतीचे समर्थन…
या देशातल्या काही घटकांना विषमतेचा पुरस्कार करणारी मनुस्मृती ही श्रेष्ठ वाटते, देशाच्या लोकशाहीवादी घटनेपेक्षा अधिक महत्त्वाची वाटते, हे उघड गुपित आहे. ती त्यांना तशी वाटते म्हणूनच या देशात विषमतेवर आधारित चातुर्वण्य व्यवस्था शतकानुशतकं टिकून राहिली, अस्पृश्यतेचं हीनत्व समाजाच्या सर्व अंगात भिनलं. देशाला स्वातंत्र्य मिळालं, समतावादी घटनेवर आधारित राज्यव्यवस्था…
गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यापाठोपाठ ५ मार्चला झालेल्या ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळ्यातही सेक्शुअल हॅरॅसमेंट विरोधातल्या मी टू मोहिमेचा पुनरुच्चार झाला आणि विविध सेलिब्रिटींनी या मोहिमेला जाहीर पाठिंबा दिला. लैंगिक शोषणाविरोधात मी टू असं म्हणत आणि पुरुषसत्तेला टाइम इज अप असं बजावत हालिवूडमधल्या अभिनेत्री एकत्र आल्या आहेत आणि जगभरातल्या…