fbpx
Author

उदय कुलकर्णी

Browsing
अरब जगातील स्त्रियांचे प्रश्न: तीन देशातील तीन सिनेमा

अरब जगातील स्त्रियांचे प्रमुख प्रश्न आपल्याला दिसतात ते त्यांच्यावर अनेक प्रकारचे निर्बंध, बुरख्यामधील वावर आणि पतीला चार लग्न करण्याची परवानगी, अगदी चार विवाह नाही केले पण दुसरं लग्न केलं तरीही त्रास आहे. हा आपला दृष्टिकोन झाला, परंतु त्या स्त्रियांना त्याविषयी काय वाटतं, तिथल्या लोकांना त्याविषयी काय वाटतं हे…

प्रहार हा नाना पाटेकर दिग्दर्शित व अभिनीत १९९१मध्ये प्रदर्शित झालेला एक उत्तम चित्रपट. सैनिकांना किती खडतर प्रशिक्षण घ्यावे लागते, त्यातूनच ते कसे कणखर बनतात ते ह्यात दिसते. मात्र याची दुसरी बाजूही ह्या चित्रपटात आहे. नाना पाटेकर ह्या सिनेमात सैन्यातील मेजर असतो. त्याचा लाडका अधिकारी पीटर डिसुझा याचा गुंडांनी…

अमेरिकेत गुलामगिरीची प्रथा होती. कृष्णवर्णीय लोकांची गुलाम म्हणून खरेदी-विक्री होत असे. प्रेसिडेंट लिंकन यांनी १८६५ साली घटनादुरुस्ती करून ही प्रथा निकालात काढली. पण त्यांना त्यासाठी प्रचंड विरोध सहन करावा लागला. एक यादवी युध्दच तिथे झाले. गुलामगिरीची प्रथा गेली तर वर्णभेद मात्र पुढे अनेक वर्षे कायम होता. १९६५ साली…

पाश्चात्य देश हे आधुनिक विचारसरणीचे असा समज सहसा असतो, पण धार्मिक बाबतीत तिथेही कट्टरता असते. आयर्लंड इथे स्त्रिच्या जीवाला थेट धोका असल्याशिवाय गर्भपात हा गुन्हा मानला जातो व ह्या गुन्ह्यासाठी जन्मठेपेची शिक्षा आहे. ह्या कायद्यात आता (मे २०१८मध्ये) बदल करण्यात येत असून त्यानुसार गर्भपाताला परवानगी दिली जाणार आहे,…

डाल्टन ट्रम्बो हे हॉलिवूडचे जुन्या पिढीतील एक नामवंत चित्रपटकथा व पटकथाकार. १९३६ ते १९७३ इतकी त्यांची प्रदीर्घ कारकिर्द. अनेक महत्वाचे गाजलेले चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. रोमन हॉलिडे, द ब्रेव्ह वन, एक्झोडस आणि स्पार्टाकस ही काही नावे वानगीदाखल. ऑस्करसारखे प्रतिष्ठेचे पुरस्कारही त्यांना मिळालेले आहेत. ते विचाराने कम्युनिस्ट होते. १९४०…

अमेरिका हा मुक्त भांडवलशाहीचा पुरस्कार करणारा देश आहे,  त्यामुळे तो कम्युनिस्ट विचासरणीच्या विरोधात असणार यात नवल नाही.  तथापि १९४० आणि १९५०च्या दशकात अमेरिकेत कम्युनिस्ट विरोध अतिशय टोकाला (Paranoid) गेला. त्याकाळात तिथे सत्ताधारीवर्गाने कम्युनिस्ट असल्याच्या केवळ संशयावरून हजारो व्यक्तींचा छळ केला. कम्युनिस्टांशी कोणाचे लागेबांधे आहेत, कोण विघातक कारवाया करत आहे, कोण कम्युनिस्टांचे सहानुभूतीदार आहेत, इत्यादींबाबत अमेरिकी नागरिक,  सरकारी कर्मचारी, संस्था यांचा तपास करण्यासाठी तिथल्या वेगवेगळ्या तपास यंत्रणा, सरकारी समित्या काम करत होत्या. हजारो अमेरिकी लोकांवर ते कम्युनिस्ट असल्याचा किंवा कम्युनिस्टांचे सहानुभूतीदार, सहप्रवासी असल्याचा आरोप करण्यात आला. त्यांची कसून चौकशी करण्यात आली. काही लोकांवर तर ते सोव्हिएट रशियाकरता हेरगिरी करत असल्याचाही आरोप करण्यात आला. अमेरिकेतील तेव्हाचा एक सेनेटर जोसेफ मॅकार्थी हा कट्टर कम्युनिस्टद्वेष्टा होता. त्याने जाहीर आरोप केला की दोनशे पाच कार्डधारक कम्युनिस्ट शासनयंत्रणेत घुसलेले आहेत, त्यातील काही अमेरिकेच्या आर्मीतही आहेत. त्यामुळे तर एकच खळबळ उडाली. मॅकार्थीने कम्युनिस्टांविरुध्द जहरी अपप्रचार केला, भाषणे दिली. जोसेफ मॅकार्थी हा गव्हर्नमेंट ऑपरेशन्स कमिटीचा चेअरमन होता आणि ह्या समितीची एक पर्मनंट सबकमिटी ऑन इन्व्हेस्टीगेशन्स होती, त्याचाही तो चेअरमन होता. त्याच्या समोर सुनावणी चालायची. ह्या सुनावणीत त्याने न्याय वगैरे गुंडाळून ठेवला होता. जोसेफ मॅकार्थीच्या ह्या कम्युनिस्ट विरोधी अत्यंत द्वेषपूर्ण विचारसरणीमुळे व त्याच्या कारवायांमुळे तो काळ मॅकार्थी इरा म्हणून ओळखला जातो व मॅकार्थीझम हा शब्दप्रयोग तेव्हापासून रूढ झाला जो आजही वापरण्यात येतो. कोणताही पुरावा नसताना देशद्रोहाचा व राज्यसत्ता उलथून टाकण्याचा आरोप करणे म्हणजे मॅकार्थीझम. राजकीय  विरोधकांवर देशद्रोहाचा आरोप करणे हा प्रकार सध्या किती बोकाळला आहे ते आपल्यालाही दिसत आहेच. तसेच लोकांच्या मनात एखाद्या समुदायाविषयी किंवा विचारधारेविषयी कलुषित भावना असतात. सत्ता  मिळवण्यासाठी अशा कलुषित भावनांचा वापर करणे…