ओटीटीवर सध्या के-ड्रामा किंवा कोरिअन ड्रामामध्ये “स्क्विड गेम्स” आणि “हेलबाऊंड” या मालिका प्रचंड गाजत आहेत. जगभरातून या मालिकांना मोठा प्रेक्षकवर्ग मिळाला आहे. या दोन्ही मालिका रुपककथा घेऊन आल्या असल्या तरी “स्क्विड गेम्स”, द. कोरियातील क्रूर भांडवलशाही आणि “हेलबाऊंड” फॅसिझमवर भाष्य करतात. आशिया खंडातील गरीब देश म्हणून गणल्या गेलेल्या…
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अमेरिकेमध्ये #मी टू ही चळवळ सुरू झाली आणि त्याचे पडसाद काही काळाने वेगवेगळ्या देशांमध्ये उमटू लागले. गेला आठवडाभर भारतातही या #मी टूची सुरुवात झाली आणि अनेक महिलांनी त्यांच्यावरील लैंगिक अत्याचार, शोषण, छळवणूकीच्या कथा सांगून समाजाला हादरवून सोडलं. बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने याची सुरुवात केली आणि माध्यमांमध्ये अनेक महिला पत्रकारांनी…
गोमांसावर बंदी घालून, लोकांना ठेचून मारल्यानंतर शाकाहारी व मांसाहारी या भ्रामक भेदातून प्रत्यक्षात हिंदू व मुसलमान अशी दरी तयार करण्याची पुढची पायरी म्हणून आता रेल्वेने २ अॉक्टोबर या महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी रेल्वेमध्ये फक्त शाकाहारी अन्न देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावानुसार, २ अॉक्टोबरला देशभरातील सर्व रेल्वे स्थानकांमध्ये,…
कर्नाटक निवडणुकांमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून विजयी झाला तर सत्ताधारी असलेल्या काँग्रेसने परत निवडून येण्याची संधी असतानाही ती गमावली. भाजपने १०४ जागा, काँग्रेस ७८ आणि जनता दल (से) ३८ जागा घेतल्या. गुजरात विधानसभेच्या निकालानंतर काँग्रेसला कर्नाटक राज्यातून बऱ्याच आशा होत्या आणि आत्मविश्वासही. त्यामुळेच जनता दल (से) बरोबर…
गुरुवारी नाशिकमध्ये एक विचित्र घटना घडली. गेली चार वर्ष, जो मवाळ आणि आईसमान प्राणी गाय देशाच्या राजकारणाचा भाग झाली होती ती पुन्हा एकदा बातम्यांमध्ये झळकली. कारणही तसंच होतं. आतापर्यंत गोहत्या करू नये म्हणून बातम्या येत होत्या. पण गुरुवारी नाशिकमध्ये मात्र एका भटक्या गायीने एका वृद्धेवर एवढा हल्ला चढवला…
“हृदय हे त्याग करू शकतं. तशीच योनीही करू त्याग करू शकते. हृदय हे एखाद्याला माफ करून गोष्टी सुधारू शकतं. ते अनेकांना सामावून घेऊ शकतं. ते काहींना बाहेरही काढू शकतं. तसंच योनीही करू शकते. त्याला (हृदय) आपल्यासाठी दुखतं-खुपतं, ते आपल्यासाठी मोठं होऊ शकतं, मरू शकतं आणि रक्तबंबाळ होऊ शकतं.…
मागच्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये झालेला भाजपच्या स्थापना दिवसाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी विरोधी पक्षांना उद्देशून वापरलेल्या प्राण्यांच्या विशेषणांवर राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली. साप, मुंगूस, मांजर, कुत्रा, चित्ता, वाघ असे सगळे प्राणी केवळ पूर आल्यावर प्राण वाचवण्यासाठी एका वटवृक्षावर चढतात असे उदाहरण शहा यांनी दिले. या उदाहरणातील…
अलीकडेच एका “अवर लिप्स आर सिल्ड” नावाच्या उत्पादनाची जाहिरात बघायला मिळाली. याला “कॅमल टो पॅन्टीज” म्हणून ओळखलं जातं कारण उंटाचे खूर ज्या पद्धतीने विभागलेले असतात तशी महिलांसाठीची चड्डी. बघता क्षणी त्याचा अर्थ कळला नाही म्हणून गुगल सर्च केलं, तर गेल्यावर्षीपासून हा ट्रेंड सुरू झाल्याचं समजलं. घट्ट, तोकडे कपडे…
भारतामध्ये अलीकडे लहान मुलांसाठी “ग्रेट लिडर्स ” नावाचं एक पुस्तक प्रकाशित करण्यात आलं होतं. त्यामध्ये महात्मा गांधी, नेल्सन मंडेला यांच्या जोडीला थेट अॅडाॅल्फ हिटलरला दाखवून जगातल्या महान नेत्यांमध्ये त्याची गणना केली गेली आहे. या पुस्तकाबद्दल भारतात काही प्रतिक्रिया उमटण्याआधीच आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची दखल घेण्यात आली. मानवी हक्कांसाठी काम…
आज उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीमध्ये गोरखपूर आणि फुलपूर या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे मतदारसंघ असलेल्या दोन महत्त्वाच्या जागांवर भाजपचा पराभव झाला आणि समाजवादी पक्ष (सपा) व बहुजन समाज पक्ष (बसपा) यांचा विजय झाला. अगदी गेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत एकमेकांचे कट्टर शत्रू असलेले हे दोन्ही पक्ष या पोटनिवणुकीसाठी एकत्र आल्याने त्यांची मोठ्या…