दिल्ली उच्च न्यायालयाने१९८४ सालच्या शीखविरोधी दंग्यांबाबत दिलेल्या निकालानंतर दोषी ठरलेले काँग्रेसचे नेते सज्जन कुमार यांनी अखेर डिसेंबर ३१, २०१८ रोजी शरणागती पत्करून पोलिसांच्या हवाली झाले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर शीख समुदायाच्या विरोधात हा दंगलींचा भडका उडाला होता. नानावटी कमिशनने सज्जन कुमार यांना दिल्लीतील दंगलींसाठी दोषी असल्याचं…
सध्याच्या वातावरणात भावनिक विषय पुढे करून हिंसेचे नवीन नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न होताना दिसतो. गेल्या काही वर्षांमध्ये बाबरी मशिद उद्ध्वस्त करणं (१९९२), गोध्रा ट्रेन जाळणं (२००२), कंधमालमध्ये एका स्वामीचा खून (२००८), लव्ह जिहादच्या नावाखाली मुझफ्फरनग दंगली (२०१३) अशी हिंसेची काही उदाहरणं डोळ्यासमोर आली. समाजातल्या वेगवेगळ्या समूहांमध्ये तेढ निर्माण…
गेल्याच आठवड्यात मुंबईवर झालेल्या २६/च्या दहशतवादी हल्ल्याला १० वर्ष पूर्ण झाली. दहा दहशतवादी समुद्रामार्गे येऊन ससून डॉकमध्ये उतरले होते. हातात बंदुका, जीन्स पँट आणि टी-शर्ट घातलेले ते सर्व जिहादसाठी आले होते. खूपच विचारपूर्वक हा हल्ला नियोजित केला होता आणि ते तडीस नेण्याचं काम या दहशतवाद्यांनी केलं. त्यानंतर झालेल्या…
पुस्तकांवर बंदी घालणं, पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला आणि गायकांना विरोध करणं या गोष्टी भारतामध्ये नवीन नाहीत. सलमान रश्दी यांच्या ’सॅटॅनिक वर्सेस’ या पुस्तकावर बंदी घातलेली आपण पाहिली आहे भारत-पाक क्रिकेट सामन्याला विरोध करण्यासाठी वानखेडे स्टेडियमचं पिच उखडून टाकल्याचही उदाहरण आहे, गुलाम अली यांच्या गझलचा कार्यक्रमही उधळून लावण्यात आला होता.…
पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने ३१ अॉक्टोबला आशिया बिबीची धर्मद्रोहाच्या आरोपांमधून मुक्तता केली. फाशीची शिक्षा सुनावल्याने गेली आठ वर्ष ती तुरुंगात खितपत पडली होती. पण तिच्यावरच्या आरोपात तथ्य नसल्याचं न्यायालयाला वाटलं. धर्मद्रोहाची पाकिस्तानात शिक्षा म्हणजे मृत्यू. ख्रिश्चन कुटुंबातून आलेली बिबी हीचा परिवार शेतमजूर असून तिला वाचवण्यासाठी त्यांनी अक्षरशः जीवाचं रान…
ब्रिटिशांविरोधी दिलेल्या लढ्यातून आधुनिक भारतातील सेक्युलर लोकशाहीला सुरुवात झाली. या लढ्यामध्ये विविध राजकीय विचारणी सहभागी झाल्या. पण धर्माच्या आधारावर राष्ट्रीयत्वाचं तत्त्वं मांडणारी विचारधारा मात्र या लढ्यात कधीच उतरली नाही. सद्य परिस्थितीमध्ये मात्र निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी ही विचारधारा आपला स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग असल्याचं दाखवण्यासाठी वाट्टेल तसा इतिहास तोडून मोडून…
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या नाव बदलण्याच्या मोहीमेवर अाहेत. अलीकडेच त्यांनी उत्तर प्रदेशमधील प्रसिद्ध शहर अलाहाबादचं नाव प्रयागराज असं केलं. अलाहाबादला गंगा, यमुना आणि अदृश्य पावलेली सरस्वती यांचा संगम होतो म्हणजेच प्रयाग होतो म्हणून बहुदा इस्लामिक प्रभाव असलेलं नाव त्यांनी बदललं. पण या शहराबद्दलच्या अनेक कथा आहेत.…
धार्मिक-जातीय दंगली या आपल्या राजकारणाचा दुर्दैवी भाग राहिल्या आहेत. भारताच्या फाळणीनंतर झालेल्या दंगलींनी तर देशाला हादरवून सोडलं होतं. पण या धार्मिक दंगली तिथे थांबल्या नाहीत. त्या वाढत जाऊन १९८० नंतर जेव्हा राम मंदिराच्या मुद्द्यावरून वातावरण तापायला सुरुवात झाली तेव्हा त्याचं स्वरूप आणखी तीव्र झालं. राम मंदिर बांधण्यासाठीची मोर्चेबांधणी…
आपण लोकशाही व्यवस्थेमध्ये राहतो जिथे समानता अपेक्षित आहे. औद्योगिक प्रगतीच्या कितीतरी आधीपासूनच असमानता ही जन्म, जात आणि लिंगावर आधारित होती. ही असमानता आजही संपलेली नाही. त्याचाच एक भाग म्हणजे अनेक मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश, पूजा नाकारणे. अगदी मशिदींमध्येही मुख्यतः पुरुषच अल्लासाठी नमाज पढू शकतात. देवळांमध्ये होणारा भेदभाव हा लिंग…
सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच २-१ अशा बहुमताने दिलेल्या एका निर्णयानुसार, डॉ. फारुकी प्रकरणातील आदेश संविधानिक खंडपीठाकडे द्यायला नकार दिला. डॉ. फारुकी प्रकरणातील निर्णयानुसार, इस्लाम धर्माचं पालन करण्यासाठी मशिद आवश्यक नाही. न्यायालयाच्या नवीन आदेशामध्ये या विचाराशी असहमत असलेल्या न्यायमूर्तींचं म्हणणं होतं की, हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या एका खंडपीठाकडे विचारार्थ देण्यात…