रशियात संपन्न झालेल्या फुटबॉल विश्वचषकाचा ज्वर (किंवा नशा) फ्रान्स आणि क्रोएशिया यांच्यात काल झालेल्या अंतिम सामन्यानंतर ओसरेल. युरोप- अमेरिका आणि रशिया यांच्यातले ताणलेले संबंध, शिवाय रशियातील एलजीबीटीविरोधी, वंशवादी वातावरण, कायदे, एकूणच स्लाव राष्ट्रवाद आणि जगभरच वर्णवर्चस्ववादी गटांना फुटबॉलच्या निमित्ताने चढणारा जोम यामुळे हा विश्वचषक आधीपासूनच वादग्रस्त ठरला होता.…
माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी नागपूर येथे संघाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि कॉंग्रेस आणि इतरही लोकशाहीवादी, पुरोगामी लोकांत अस्वस्थता पसरली. पन्नासच्यावर वर्षे सार्वजनिक जीवनात असणारे, कॉंग्रेसकडून अर्थ, परराष्ट्र, गृह अशी मातब्बर खाती सांभाळलेले आणि राष्ट्रपती हे सर्वोच्च पद भूषवलेले प्रणब मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर जाणार,…
१९८९ मध्ये बर्लिन भिंत आणि पूर्व युरोपातील साम्यवादी राजवटी कोसळल्या. गोर्बाचेव्ह यांच्या पेरेस्त्रोईका आणि ग्लासनोस्तची परिणती सोविएत साम्यवाद संपुष्टात येण्यात झाली. शीतयुद्ध संपले, पश्चिमी भांडवली लोकशाही व्यवस्था विजयी झाल्या आणि फुकुयामाने म्हटल्याप्रमाणे ‘इतिहासाची इतिश्री’ झाली. ‘अमेरिका ही एकमेव महासत्ता आणि जागतिकीकरणाच्या लाटेला आता कुठलाही पर्याय आणि पर्यायी विचार…
उत्तर प्रदेशातील लोकसभा पोटनिवडणुकांत समाजवादी पक्ष (सपा) व बहुजन समाज पक्ष (बसपा) यांच्या युती-आघाडीने फुलपूर (केशव मौर्य, उ.प्र. चे उपमुख्यमंत्री) आणि गोरखपूर (योगी आदित्यनाथ-उ.प्र.चे मुख्यमंत्री आणि माध्यमांचे ‘भावी मोदी’!) या दोन महत्त्वाच्या जागांवर भाजपचा पराभव केला. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांचे ऐक्य, ‘६९% मतांची एकजूट’, भाजपविरोधी…
त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत डाव्यांचा पराभव टीव्ही आणि इतर माध्यमांनी कितीही आरडून ओरडून आणि रंगवून रंगवून सांगितला तरी तिचा बातमी म्हणून प्रभाव इतर माध्यमचर्चाप्रमाणे दिवसभरापुरता; आणि फार फार तर शपथविधी उरकेपर्यंत. तसेही राष्ट्रीय राजकारणात औषधालाच उरलेल्या डाव्यांचे ‘डावीकडून तिसरेपण’ हे चावून चोथा होईस्तो गेल्या ३० वर्षांत चघळण्यात आलेले- तेव्हा…
गेल्या शतकभरात ‘कला आणि सामाजिक जाणीव’ हा मराठी साहित्य- कला चर्चाविश्वाचा लाडका विषय राहिला आहे. त्यातून लाजेकाजेस्तव म्हणा किंवा अपराधभावनेने म्हणा- मध्यमवर्गीय प्रस्थापित साहित्य-कला समीक्षेला ‘कलेसाठी कला’ अशी विशुद्ध ‘कलावादी’ पर्यायाने उच्चभ्रू elitist भूमिका घेणे शक्य होत नाही हे खरे. पण ‘सामाजिक जाणीव’ अश्या ऐसपैस नावाखाली ‘कला ही…
भीमा कोरेगावच्या लढाईला २०० वर्षे पूर्ण झाली त्या निमित्ताने शनिवारवाडा इथे झालेली एल्गार परिषद आणि तिला देशद्रोही ठरवण्याचा खटाटोप, भीमा कोरेगावच्या शौर्य स्तंभाला मानवंदना देण्यासाठी १ जानेवारीला जमलेल्या लाखोंच्या दलित बहुजन समाजावर अतिरेकी हिंदुत्ववादी जमावाने केलेला हिंसक हल्ला आणि त्यानंतर राज्यभरात उमटलेले तिचे पडसाद, ३ जानेवारीला झालेला महाराष्ट्र…
२०१७ च्या सुरुवातीला नोटबंदीच्या पार्श्वभूमीवरदेखील मिळवलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा विजयाने भाजपचा उधळलेला वारू वर्ष सरताना गुजरातमधल्या निसटता विजयाने जमिनीवर आला. हार्दिक पटेलच्या नेतृत्वाखाली झालेले पाटीदार आंदोलन, उना येथील दलित अत्याचार आणि त्याविरोधी आंदोलनातून पुढे आलेले जिग्नेश मेवानीचे नेतृत्व, ओबीसी नेता अल्पेश ठाकोर, ह्या सगळ्यांना सोबत घेत राहुल गांधींच्या…
आदित्य निगम यांच्या बोल्शेविक क्रांतीवरील आख्यानाच्या निमित्ताने प्रा. आदित्य निगम यांचा ‘वायर’ मध्ये काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेला बोल्शेविक क्रांतीवरचा लेख[1] महत्वाचा आहे. (https://thewire.in/192636/russian-revolution-centenary-marx-gramsci-peasant/) फ्रेंच साम्यवादी विचारवंत लुई अल्थ्यूसर (Althusser) यांचे ‘आर्थिक पाया हा मानवी सामाजिक संबंधांचा आधार असला तरी राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक संरचना यांचा स्वतःचा असा स्वायत्त इतिहास…
‘रस्ते हे आमचे कुंचले आहेत, आणि चौक हे रंगमिश्रणासाठीचे पॅलेट’- व्लादिमीर मायकोव्हस्की ऑक्टोबर क्रांतीचा आढावा घेणे म्हणजे भूतकालीन स्मरणरंजनात मश्गुल होणे नाही. ‘कोई लौटा दो मेरे बीते हुए दिन’ असला भावूकपणा नाही. तर परखडपणे त्या ऐतिहासिक स्थित्यंतराची चिकित्सा- त्यातील उद्दिष्टे आणि त्यांची आज काही उपयुक्तता उरली आहे का,…