fbpx
Author

राहुल वैद्य

Browsing

माहिती-तंत्रज्ञान आणि जीवशास्त्र यांच्या समुच्चयातून चौथी औद्योगिक क्रांती, बिग डेटा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), स्मार्टफोन, गूगल मॅप्स, ड्रायव्हरलेस वाहने, किमान समान उत्पन्न (universal basic income), फेसबुक, whatsapp इ. सोशल मिडियाचा विस्फोट (त्यातून अरब क्रांतीचा वसंत आणि नंतर इस्लामिक राष्ट्रवादाचा/ लष्करी हुकुमशाहीचे अंधारयुग, सोशल मिडियाचा अति-उजव्या राजकारणाने केलेला वादग्रस्त वापर)…

शीतयुद्ध संपायच्या आसपास, ‘साम्यवादाचा पाडाव म्हणजे भांडवलशाही, खुला व्यापार आणि उदार लोकशाही राजकीय व्यवस्था यांना आव्हान देणाऱ्या वैचारिक व्यवस्थेचा पाडाव, फासिझमचा पाडाव तर दुसऱ्या महायुद्धातच झालेला, तेव्हा हा विचारसरणीच्या संघर्षाच्या ‘इतिहासाचा अंत’ आहे’ अशी जोरकस मांडणी करून प्रसिद्ध झालेला विचारवंत फ्रान्सिस फुकुयामा एका अर्थाने नव्वदीच्या उत्फुल्ल नव-उदार भांडवली…

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर संसदीय लोकशाहीच्या संकेतानुसार सर्वपक्षीय शोक, श्रद्धांजली इ. व्यक्त झाली. वाजपेयी यांची प्रदीर्घ संसदीय कारकीर्द, भाजपला देशाच्या राजकारणाच्या मुख्यप्रवाहात स्थापित करण्यात, भाजपने वेळोवेळी आपल्या आक्रमक हिंदुत्वाच्यावाटे ओढवून घेतलेली राजकीय ‘अस्पृश्यता’ तोडत विविध प्रादेशिक पक्ष, समाजवादी साथी इ. ना सोबत घेत गैर-काँग्रेसी सरकार चालवण्यात…

रशियात संपन्न झालेल्या फुटबॉल विश्वचषकाचा ज्वर (किंवा नशा) फ्रान्स आणि क्रोएशिया यांच्यात काल झालेल्या अंतिम सामन्यानंतर ओसरेल. युरोप- अमेरिका आणि रशिया यांच्यातले ताणलेले संबंध, शिवाय रशियातील एलजीबीटीविरोधी, वंशवादी वातावरण, कायदे, एकूणच स्लाव राष्ट्रवाद आणि जगभरच वर्णवर्चस्ववादी गटांना फुटबॉलच्या निमित्ताने चढणारा जोम यामुळे हा विश्वचषक आधीपासूनच वादग्रस्त ठरला होता.…

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी नागपूर येथे संघाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि कॉंग्रेस आणि इतरही लोकशाहीवादी, पुरोगामी लोकांत अस्वस्थता पसरली. पन्नासच्यावर वर्षे सार्वजनिक जीवनात असणारे, कॉंग्रेसकडून अर्थ, परराष्ट्र, गृह अशी मातब्बर खाती सांभाळलेले आणि राष्ट्रपती हे सर्वोच्च पद भूषवलेले प्रणब मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर जाणार,…

१९८९ मध्ये बर्लिन भिंत आणि पूर्व युरोपातील साम्यवादी राजवटी कोसळल्या. गोर्बाचेव्ह यांच्या पेरेस्त्रोईका आणि ग्लासनोस्तची परिणती सोविएत साम्यवाद संपुष्टात येण्यात झाली. शीतयुद्ध संपले, पश्चिमी भांडवली लोकशाही व्यवस्था विजयी झाल्या आणि फुकुयामाने म्हटल्याप्रमाणे ‘इतिहासाची इतिश्री’ झाली. ‘अमेरिका ही एकमेव महासत्ता आणि जागतिकीकरणाच्या लाटेला आता कुठलाही पर्याय आणि पर्यायी विचार…

उत्तर प्रदेशातील लोकसभा पोटनिवडणुकांत समाजवादी पक्ष (सपा) व बहुजन समाज पक्ष (बसपा) यांच्या युती-आघाडीने फुलपूर (केशव मौर्य, उ.प्र. चे उपमुख्यमंत्री) आणि गोरखपूर (योगी आदित्यनाथ-उ.प्र.चे मुख्यमंत्री आणि माध्यमांचे ‘भावी मोदी’!) या दोन महत्त्वाच्या जागांवर भाजपचा पराभव केला. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांचे ऐक्य, ‘६९% मतांची एकजूट’, भाजपविरोधी…

त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत डाव्यांचा पराभव टीव्ही आणि इतर माध्यमांनी कितीही आरडून ओरडून आणि रंगवून रंगवून सांगितला तरी तिचा बातमी म्हणून प्रभाव इतर माध्यमचर्चाप्रमाणे दिवसभरापुरता; आणि फार फार तर शपथविधी उरकेपर्यंत. तसेही राष्ट्रीय राजकारणात औषधालाच उरलेल्या डाव्यांचे ‘डावीकडून तिसरेपण’ हे चावून चोथा होईस्तो गेल्या ३० वर्षांत चघळण्यात आलेले- तेव्हा…

गेल्या शतकभरात ‘कला आणि सामाजिक जाणीव’ हा मराठी साहित्य- कला चर्चाविश्वाचा लाडका विषय राहिला आहे. त्यातून लाजेकाजेस्तव म्हणा किंवा अपराधभावनेने म्हणा- मध्यमवर्गीय प्रस्थापित साहित्य-कला समीक्षेला ‘कलेसाठी कला’ अशी विशुद्ध ‘कलावादी’ पर्यायाने उच्चभ्रू elitist भूमिका घेणे शक्य होत नाही हे खरे. पण ‘सामाजिक जाणीव’ अश्या ऐसपैस नावाखाली ‘कला ही…

भीमा कोरेगावच्या लढाईला २०० वर्षे पूर्ण झाली त्या निमित्ताने शनिवारवाडा इथे झालेली एल्गार परिषद आणि तिला देशद्रोही ठरवण्याचा खटाटोप, भीमा कोरेगावच्या शौर्य स्तंभाला मानवंदना देण्यासाठी १ जानेवारीला जमलेल्या लाखोंच्या दलित बहुजन समाजावर अतिरेकी हिंदुत्ववादी जमावाने केलेला हिंसक हल्ला आणि त्यानंतर राज्यभरात उमटलेले तिचे पडसाद, ३ जानेवारीला झालेला महाराष्ट्र…