Author

प्रा. प्रतिमा परदेशी

Browsing

देशात जातजमातवादी शक्तींचा अक्षरशः नंगानाच सुरु आहे. महाराष्ट्र २०१८ सालच्या पहिल्याच महिन्यापासून त्याचा अनुभव घेत आहे. १ जानेवारी कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी गावखेड्यातून आलेल्या निरपराध जनतेवर दगडफेक करून हल्ला केला गेला. त्यापूर्वी सामाजिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले गेले. ते फारसे सफल झाले नाहीत म्हणून…

२००८ च्या ऑगस्ट  मधील घटना आहे. ऑगस्ट- क्रांतीदिनाच्या अगोदरचा एक दिवस, या दिवशी इंग्रजी, मराठी वर्तमानपत्रात एक वृत्त प्रसिध्द झाले होते ते ‘सरोगेट बाळाच्या’ संदर्भात. १२ दिवसांच्या एका मुलीच्या जन्माची हकीकत अशी – या चिमुरडीचे आई-वडील ज्यांना इंग्रज़ीत बायोलॉजिकल पेरेंटस म्हणतात. मराठी पर्यायी शब्द म्हणून ‘जन्मदाते’ हा शब्द…

निर्हुतीच्या गण संस्कृतीत स्त्री मुख्या होती. स्त्री-पुरुष विषमता होती, पण पुरुषांना शोषणाला समोर जाव लागत नव्हत. ना हिंसाचाराला बळी पाडाव लागत होत. विशामातही कशा प्रकारची तर राज-कार्याच्या संदर्भातील. गण भूमीचे वाटप करणे हे होत राजकार्य, जे पुरुष करू शकत नव्हते. कारण शेतीचा शोध स्त्रियांनी लावलं, म्हणून त्या गण मुख्या ठरल्या. इतिहासाची चक्र फिरत गेली आणि वर्ण-जाती समाजात…

जम्मू काश्मीर नेहमीच आधीचा जनसंघ आणि नंतर भाजपाच्या रडारवर राहिला आहे. हिंदू-मुस्लिमांमध्ये सतत संघर्ष तेवत ठेवण्याचा प्रयत्न या ब्राह्मणी-फॅसिष्ट  शक्तींनी केला आहे. जम्मू काश्मीर मध्ये 370 कलमावरून संभ्रमाचे वातावरण ठेवण्याचा पद्धतशीर प्रयत्न त्यांनी केला आहे. या संघर्षाचे बळी सामान्य कष्टकरी जातवर्गीङ्म लोक ठरतात.  केंद्र आणि काही राज्यात झालेल्या…

देशातील शेतकरी, दलित, बहुजन, कामगार कष्टकरी, सकल स्त्रिया अस्वथतेच्या उंबरठ्यावर आहेत. त्यातून एक असंतोष साकार होत आहे. या सामाजिक घटकात कमालीचा असंतोष पाहायला मिळतो, त्याची कारणे आजच्या परिस्थितीत पहायची झाल्यास २०१४ पासून सत्ताधारी वर्गाने चालविलेल्या धोरणात प्रामुख्याने ती दिसत आहेत. लोकशाही मार्गाने निवडून येत लोकशाही प्रणालीचाच घात…

महिला दिन साजरा करण्याचा त्यांना काय अधिकार?वास्तविक जागतिक महिला दिन हा शोषित – कष्टकरी चळवळीची देण आहे. १९०८ सालात १५ हजार कष्टकरी स्त्रिया न्यूयॉर्क शहरात एकत्रित आल्या आणि आपल्या मागण्यांसाठी त्यांनी अभूतपूर्व असा मोर्चा काढला होता. कामाचे तास निश्चित करा, योग्य वेतन द्या आणि मतदानाचा अधिकार द्या या…

प्रिय साऊ, सत्य की जय हो! सावित्रीबाई तुम्ही आमचे प्रेरणास्थान! प्रेरणास्थान म्हणजे जिच्या कार्यकर्तृत्वातून जात-पुरुषप्रधान समाजात जगण्याची, तग धरण्याची आणि अन्यायाविरुध्द बंड करण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली, मिळत असते आणि मिळत राहिल. १९ व्या शतकात होत्या बर्‍याच जणी. ज्या विषमताग्रस्त समाजाच्या काळपाषाणाला धडका देण्याचा प्रयत्न करत होत्या. कोणी आनंदीसम…

देश शेतीप्रधान आहे. शेती देशाच्या प्रगतीचा गाभा आहे. आजही देशातील ६०% हून अधिक रोजगार शेतीतून निर्माण होतो. एकतर शेती प्रश्नाबद्दल सकारात्मक चर्चा होत नाही. शेतीसंदर्भातील स्वतंत्र बजेटची मागणी बासनात गुंडाळून ठेवण्यात आली आहे. त्या नंतर एकूण सार्वजनिक चर्चा विश्वात शेती, शेतकरी, शेतीधोरण इ. बाबत जी काही थोडीठीडकी चर्चा…

भारतीय समाजात आजही जातपुरुषसत्ताक मूल्यव्यवहार राजरोसपणे चालू आहेत. जाती समाजात स्त्रियांच्या लैंगिकतेवर नियंत्रण ठेऊन जातीची उतरंड कायम आणि भक्कम केली जाताना दिसते. स्त्रियांच्या शरीर, मन, श्रम आणि सर्वस्वावर जात पुरुषांचा ताबा-नियंत्रण-वर्चस्व ठेवणाऱ्या अनेक प्रथा, रूढी, परंपरा, चालीरीती निर्माण करण्यात आल्या. मनुस्मृतीसारखे अनेक ब्राह्मणी ग्रंथ मुलीच्या जन्मापासूनच नाही तर…

१९३९ साली महाराष्ट्रातील ख्यातनाम इतिहासकार वा. सी. बेंद्रे यांनी छ. संभाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला व त्या ठिकाणी छ. संभाजी महाराजांच्या अंत्यसंस्काराबाबत एक शासकीय फलक लावला. त्यात अंत्य संस्कारामध्ये स्थानिक स्त्रिया, महार समाजाने केलेल्या कार्याबद्दल लिहिले. अलीकडील काळात तो फलक गायब करण्यात आलेला आहे. दि. २८ डिसेंबर २०१७…