fbpx
कला विशेष सामाजिक साहित्य

मेळ बसत नाही…..

संविधान सन्मानार्थ १५ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे ४ व ५ डिसेंबररोजी मविप्र समाज संस्थेचे केटीएचएम महाविद्यालय येथे होणार आहे. ज्योतिरावफुले यांनी ग्रंथकार सभेस पाठविलेले पत्र हा विद्रोहीचा वैचारिक पायाआहेन्या..गोरानडेंनी ग्रंथकार सभेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले तेव्हा तुमच्याग्रंथांमध्ये अखिल मानवाचे हित होईल याचे बीज नाहीअसे म्हणत . फुलेंनीउंटावरून शेळ्या वळणार्‍या “घालमोड्या दादांच्या” त्या संमेलनात सहभागी होण्यासठाम नकार दिला होता आणि आमचे ग्रंथकार तयार होतील तेव्हा ते स्वाभिमानानेआपली संमेलने भरवतील असेही म्हटले होतेग्रंथकार सभेचे २० व्या शतकातील रूपम्हणजे .भामराठी साहित्य संमेलन आहेब्राह्मणीभांडवलीपुरुषसत्ताक मूल्यसंस्कृतीविचारांचा विषारी प्रचारप्रसार करणार्‍या संस्थासंघटनासंमेलनांच्याविरोधात भूमिका घेण्याचा फुले,शाहूआंबेडकरांचा संदेश मानून आपण विचार संघटित कृती केली पाहिजे.भा.सासंमेलन आणि  साहित्य महामंडळ यांचाआजवरचा व्यवहार हा विषमतावादी राहिला आहेचिपळूणच्या साहित्य संमेलनातपरशुरामाची मूर्ती स्टेजवर ठेवणेठाण्यात संमेलन स्मरणिकेत गांधी यांच्याखुन्याचा ’पंडित नथुराम’ असा उल्लेख करणे असेलसंयुक्त महाराष्ट्राचे सेनानीशाअण्णाभाऊ साठेशागव्हाणकरशाअमर शेखशावामनदादाकर्डकक्रांतिसिंह नाना पाटीलभाई उद्ववराव पाटीलकर्मवीर दादासाहेबगायकवाडशाहीर यशवंत चकोरशागजानन बेणीशाप्रताप परदेशीलेखकप्रभाकर वैद्य यांना संमेलनासाठी साधे निमंत्रणही देणेउलट अनेक दांभिकांनाअध्यक्षपदे बहाल करणे,  स्वातंत्र्यसैनिक धर्मनिरपेक्ष लेखिका नयनतारा सहेगलयांना अपमानित करणे अशी भामराठी साहित्य संमेलनाच्या विषमतावादाचीअसंख्य उदाहरणे आहेतकिंबहुना विषमतावादी सांस्कृतिक राजकारणाचे ते मुखंडचआहेम्हणूनच ब्राह्मणी – भांडवली – पुरुषसत्ताक मुल्य संस्कृतीच्या विरोधात विद्रोहीसांस्कृतिक चळवळ १९९९ पासून महाराष्ट्रभर कार्यरत आहे.भा.मराठी साहित्यसंमेलन हा मूठभरांचा प्रवाह आहेतर विषमतेविरूद्धच्या सर्वंकष चळवळीच्या मुशीतूनआणि कुशीतून आमचे साहित्य जन्म घेतेत्यामुळेच ते माणसाच्या जगण्याचा साहित्यनिर्मितीबरोबरचा दुवा जोडत असतेआदिम सिंधू संस्कृतीतीलनिऋतीयाहामोगी,कंसारामाताबळीराजातथागत गौतम बुद्धश्रमण संतमहावीरसंत चक्रधरसंत बसवेश्वरसंत गुरुनानकसंत नामदेवांपासूनसंततुकाराम महाराजसंत बहिणाबाईसंत सेवालालसंत गाडगेबाबांपर्यंतचे सर्व सूफी वारकरी संत महानुभावलिंगायत परंपरेनेच मराठीचा संस्कृतीसह एकूणजीवनप्रवास समताभिमुख केला आहेस्वराज्य संकल्पक जिजाऊरयतेचे राजे.शिवाजी महाराजआदिवासी क्रांतिवीर तंट्या भिलझलकारीबाईफुले यासर्वांपासून विद्रोही सांस्कृतिक चळवळीने प्रेरणा घेतेली आहेमहान समतावादीसावित्रीबाई फुलेक्रांती शिक्षिका फातिमा शेखस्त्रीपुरुष तुलनाकार ताराबाईशिंदेपहिल्या निबंधकार मुक्ता साळवेसत्यशोधक सावित्रीबाई रोडे या महानसत्यशोधकांचा वारसा विद्रोहीला ललामभूत आहे. फुलेंची तत्कालीन साहित्यसंमेलनाच्याविरोधात भूमिकेची आठवण करून देणारा हा लेख.


मेळ बसत नाही…..

अ.भा.साहित्य संमेलनाशी आपला मेळ बसत नाही

– म. ज्योतिबा फुले

नाशिकमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला विरोध करत पर्यायी असे विद्रोही साहित्यसंमेलन आमने-सामने होणार आहे. हा एक सांस्कृतिक-साहित्यिक संघर्ष  आहे. जोतीराव फुलेंच्याशब्दात ‘ घालमोड्या दादां ‘ च्या  संमेलनात आम्ही सहभागी होणार नाही. कारण ग्रंथकार म्हणून तिथेजमत आलेले- जमणारे कोण नेमके कोण आहात? तर तुम्ही सर्वजण ‘ब्राह्मणीग्रंथकार’ आहात!  तुम्ही ‘ घालमोडे दादा’ आहात!

महात्मा ज्योतिबा फुले यांनी मराठी ग्रंथकार सभेला लिहिलेल्या पत्रास खास असं कारण आहे. त्यालातत्कालीन-समकालीन संदर्भ आहेत. त्यांनी सांस्कृतिक प्रतिवादाचा मुद्दा या निमित्ताने पुढे आणला आहे. तो केवळ जाती युद्धाचा नाही. अ.भा.म.सा. संमेलनाच्या संदर्भात फुले-आंबेडकरवाद्यांनी नेमकी कोणतीवैचारिक भूमिका आज घेतली पाहिजे, यासाठी या पत्राचा विचार एकविसाव्या शतकाच्या पार्श्वभूमीवरकेला पाहिजे.

आज २०२१ सालात या प्रक्रियेचा विचार करताना मला एकोणिसाव्या शतकाची पार्श्वभूमी महत्वाचीआहे. धनंजय किर लिखित म. फुलेंचे चरित्र व न.र.फाटक यांचे महाराष्ट्रातील सहा थोर पुरूष या दोनपुस्तकांचा संदर्भ घेऊन या पत्राचे चर्चा केली तर काय चित्र स्पष्ट होते? एकोणिसाव्या शतकातवासाहतिक काळात आलेल्या शिक्षणपध्दतीतून आत्मभान जागृत झालल्या उच्चवर्णजाती सर्वहाराजातींच्या आधी सजग झाल्या. जातीज्ञानव्यवहारावर शिक्षणातून आलेल्या नवं विचारचे कलम करतत्यांनी संकरित पध्दतीने विचारांच्या संस्थिकरणास सुरुवात केली ती ज्ञान, संस्कृती, सामाजिक, राजकीय आदी सर्वच क्षेत्रात. त्याचाच एक प्रकार म्हणून ग्रंथकार सभेची निर्मिती करण्यावर भर देण्यातआला. या उच्चवर्णजातीतून आलेल्या मराठी सारस्वतांनी वेगवेगळे ग्रंथ रचले, त्याची चिकित्सा सुरुकेली, वादविवाद करायला सुरूवात केली आणि आपल्या ग्रंथकारांना काय अडचणी आहेत, याचा ठावघेण्यासाठी  ११ मे १९८७ मध्ये लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख आणि न्यायमूर्ती महादेव रानडे यांच्यापुढाकारातून पहिल ग्रंथकार संमेलन पार पडले. ते नेमके कसे पार पडले?  न.र.फाटक त्या संदर्भात वर्णनकरतात, ‘थाटा-माटा’त!

साहित्य संमेलने कशासाठी असतात. साहित्याची चर्चा, त्याच्यावर परिसंवाद कवितांचा अस्वाद त्याचाअन्वयार्थ समकालिन प्रश्नांवर भाष्य, दारिद्र्यावर कोरडे ओढणं, वंचित घटकांचा त्यांचे अधिकारनाकारले त्याच्याबद्दलचा विद्रोही साहित्यातून मांडणं अपेक्षित असतं. परंतु या कोणत्याही गोष्टी ब्राह्मणग्रंथकारांनी केलेल्या नव्हत्या. कारण त्या त्यांच्या हिताच्या नव्हत्या. पहिल्या संमेलनात ते जमलेकशासाठी? पेशवाई थाटात भोजनावळी उठवण्याचाच प्रयत्न केला गेला.  पण या संमेलनाला फारसाप्रतिसाद मिळाला नाही आणि सरबराई न झाल्यामुळे एका दिवसात संमेलन उरकते घ्यावे लागले. यांच्यासंमेलनाच्या स्थापनेचा इतिहासच पेशवाई थाटाचा आहे, भोजनभाऊंची गर्दी म्हणजे संमेलन नसते!  हेआपण लक्षात घेतला पाहिजे.

पुन्हा २४ मे १८८५ मध्ये सात वर्षानंतर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी पुण्यामध्ये ग्रंथकारांचीसभा भरवण्याचा निर्णय घेतला. त्या सभेचे निमंत्रण पत्र त्यांनी महात्मा ज्योतिबा फुल्यांना दिले. पहिलेसंमेलन सफल आहे आणि दुसरं संमेलन करायचे आहे. म्हणून लोकप्रिय असणार्‍या-जनांची मान्यताअसणार्‍यांच्या नेतृत्वाच्या शोधात ते होते.  म्हणून ते जोतीराव फुलेंना निमंत्रण देताना दिसतात.

जोतीराव फुल्यांनी त्या ग्रंथकार सभेमध्ये सामील होता येणार नाही- या आशयाचे एक पत्र न्यायमूर्तीरानडेंना पाठविले. रानडेप्रभूतींच्या पुढाकाराला फुलेंनी नेमका का विरोध केला हे समजण्यासाठीतत्कालीन संदर्भ लक्षात घेतले पाहिजेत. १८८५ मध्ये महादेव गोविंद रानडे दुय्यम न्यायधीश म्हणूनपुण्यामध्ये रुजू झाले आहेत. रानडेंना महात्मा फुल्यांनी पत्र लिहिलं आणि ते पत्र त्या संमेलनामध्ये वाचूनपण दाखवण्यात आलं. रानडेंच्या संपूर्ण कृतीला फुलेंचा विरोध का राहिला? हा काही व्यक्ती व्देष नव्हतातर एक वैचारिक संघर्ष होता. न्यायमूर्ती रानडे जोतीराव फुलेंपेक्षा वयाने खूपच लहान होते. ते चर्चेसाठीफुलेंकडे जात असत, मार्गदर्शन घेत असत. रानडेंच्या एकूण विचारांचा पिंड आणि सुधारणांची पद्धत हीमूळात सत्यशोधकांना मान्य नव्हती. महात्मा फुल्यांकडे गेलेले असताना आपली बहिण विधवा होऊनमाहेरी आली आहे हे रानडेंनी सांगितले तेव्हा म. जोतिराव फुले यांना म्हटले, माधवराव ही तर सुधारणेचीसुवर्णसंधी आहे. विधवा बहिणीचा पुनर्विवाह लावून द्या! कारण आपण त्या मताचा प्रचार-प्रसार करता. रानडे तेव्हा काय उत्तरले – मी जर तिचा पुनर्विवाह लावून दिला तर माझे वडील रागवतील! हे कारण, हीसबब पुढे करत रानडेंनी सपशेल माघार घेतली. जे लिहिलं, ज्या सुधारणांचा प्रतिपाळ केला त्या बाजूनंजाणं त्यांनी नाकारलं. म्हणजे फुले आणि रानडे यांच्यात वैचारिक मतभिन्नता कायम राहलेली आहे. फुलेंनी जे लिहिलं, जे बोलले, ते प्रत्यक्षात कृती कार्यक्रमात आणलेले दिसत.

महात्मा फुले अशा ग्रंथकार संमेलनाला ज्याचे पुढारपण करणारेच सुधारणा विचारांची प्रतारणाकरणारे असतील त्यांच्या सभेस ते जातील तरी कसे? म .गो. रानडे जेव्हा पुण्यात दुय्यम न्यायधीश म्हणूनआले त्यांच्या समोर एक खटला आला. सदाशिव माधवे नावाचे एक गृहस्थ होते त्यांनी आपल्या घरामध्येधार्मिक विधी केला पण गावातल्या पुरोहिताला बोलवलं नाही. याचा राग त्या ग्रामजोशाला आला आणित्यांनी थेट कोर्टात दावा दाखल केला. आता खरे तर कुणी कुठे पूजा सांगावी. याचे धर्मशास्त्रात नियमनाही.  हा खटला कोर्टात गेला तेव्हा जज होते- न्यायमूर्ती रानडे. रानडेंनी काय त्याच्यावर प्रतिक्रियादिली? १८७८ मधील ही केस आहे. आणि याच्यामध्ये त्या निर्णयामध्ये रानडे असे म्हणतात, यजमानाचीइच्छा असो त्याच्या घरी संस्कार करण्याचा ब्राह्मण पुरोहिताचा हक्क आहे. तसाच त्याला दक्षिणाघेण्याचा सुद्धा अधिकार आहे. म्हणजे दक्षिणा बुडाली म्हणून ब्राह्मण कोर्टात जातात आणि त्याब्राह्मणाची बाजू न्यायमूर्ती असणारे रानडे यांनी घेतली.

ज्योतिबा फुले तर मध्यस्थच नाकारण्याच्या भूमिकेत आहेत. निर्मिकाची साधना करायची असेल तरब्राह्मण पुरोहित मध्यस्थ का? ही भूमिका मांडणारे महात्मा फुले १८७८ मध्ये न्यायमूर्ती या पद्धतीचा निर्णयदेतात त्यांच्या बाजूने जातील तर कसे? म्हणजे बहुजनाचे शोषण करणारा धर्म त्याचे समर्थन करणारेन्यायमूर्ती रानडे तर सुधारक ब्राह्मणी सुधारक आहेत.

दुसरा प्रसंग या पत्राच्या संदर्भामध्ये पाहिला पाहिजे १८८५ या काळामध्ये पावसाळ्यामध्ये एक महिनाबडोद्याचे सयाजी महाराज पुण्यात येऊन राहिले होते. तेव्हा सत्यशोधकांनी त्यांच्या उपस्थितीतव्याख्यानमाला आयोजित केली होती. रानडे आणि सुधारक मंडळक्षंनीही तोच गित्ता गिरवला. महाराजांच्या उपस्थितीमध्ये १८८५ तेव्हा राष्ट्रसभेचीसुध्दा सभा होणार होती. जेव्हा हे दुसरे साहित्यसंमेलन पुण्यामध्ये घेत होते त्या काळात रानडेंचे भाषण ‘मराठे आणि महाराष्ट्र’ या विषयावर झालेले होते. तेव्हा रानडे म्हणतात, पूर्वी जरी जातीभेद होते तरी राष्ट्राच्या प्रगतीला काहीही अडथळा नव्हता. हे विधानचअर्धसत्य आहे. याचं कारण राष्ट्र नावाची संकल्पना उदयाला येऊ लागली होती. राष्ट्रवादाच्या उद्याच्याकाळातच पूर्वीच्या जाती राष्ट्राला अडथळा नाही असे महणता येऊ शकते का? खरे तर बाबासाहेबआंबेडकरांनी विसाव्या शतकात हे स्पष्टपणे म्हटले आहे. की, ‘जाती याच राष्ट्र विरोधी आहेत.’ याचेकारण राष्ट्र सर्वांचे मिळून बनले पाहिजे आणि जातीव्यवस्था माणसा-माणसाचे विभाजन करते म्हणूनजात ही राष्ट्र विरोधीच असते, या प्रकारची भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा घेतली होती. रानडेंनी पूर्वी जातीभेद होते, पण त्याने राष्ट्राला काही अडथळा केला नाही. ३० वर्षापूर्वी शेतकर्‍यांची जीपरिस्थिती होती. त्यापेक्षा ती अधिक चांगली झाली आहे. आता १८८५ मध्ये ज्या काळामध्ये कृष्णरावभालेकर यांनी राष्ट्र सभेचा अधिवेशन पुण्यात सुरु असताना शेतकर्‍यांचा पुतळा उभा केलेला आणिआमच्या शेतकर्‍यांचे किती हाल होत आहेत हे ब्रिटीश सरकारला लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला होतातिथे रानडे ३०वर्षांपूर्वी शेतकर्‍यांची जी परिस्थिती होती. त्यापेक्षा ती अधिक चांगली झाली आहे असेचसांगतात. शेतकर्‍यांची परिस्थिती बरी आहे असे म्हणणेच शेती आणि शेतकरी विरोधी आहे. असे विचारमांडणार्‍या न्यायमूर्ती रानडे सोबत पुणे ग्रंथकार संमेलनाला सत्यशोधक फुले जातील तरी कसे?

महात्मा ज्योतिबा फुल्यांनी रानडेंना जो नकार दिला, जे पत्र लिहिलं त्यामध्ये अत्यंत सुस्पष्ट अशीवैचारिक भूमिका मांडलेली आहे. पत्राची सुरूवातच आपले पत्र ता. १३माहे मजकूराचे कृपापत्रासोबतचेविनंती पत्र पावले. वाचून मोठा परमानंद झाला. परंतु माझ्या घालमोड्या दादा….  म्हणजे का आम्ही त्यासंमेलनाला जाणार नाहीत? मराठी ग्रंथकार म्हणून तिथे जमलेले तुम्हीच सर्वजण ब्राह्मणी ग्रंथकार आहाततुम्ही ‘घालमोडे दादा’ आहात.

ज्या गृहस्थांकडून सर्व एकंदर सर्व मनुष्याच्या मानवी हक्काविषयी वास्तविक विचार केला जावूनज्यांचे त्यांस ते हक्क त्यांच्याने खुषीने व उघडपणे देववत नाहीत, व चालू वर्तमानावरून अनुमान केलेअसता पुढेही देववणार नाहीत. तसल्या लोकांनी, उपस्थित केलेल्या सभांनी व त्यांनी केलेल्यापुस्तकातील भावार्थाशी आमच्या सभांचा व पुस्तकांचा मेळ दिसत नाही.

म्हणजे तुम्ही स्वखूशीने आमचे अधिकार देत नाही. उलट डावलतात.  फुले पत्रामध्ये न भिता, स्पष्टपणेमांडताना दिसतात.  मधवे यांची केस चाललेली होती याचा संदर्भ या पत्रामध्ये निश्चित आलेलाआपल्याला दिसतो. पुढे ते म्हणतात, तुमच्या पुस्तकातील भावार्थ, आमच्या संभाचा आणि तुमच्यासभांचा, पुस्तकांचा मेळ बसत नाही. कारण त्यांच्या पूर्वजांनी आम्हांवर सूड उगवण्याच्या इराद्यानेआम्हास दास केल्याचे प्रकारण त्यांनी आपल्या बनावट धर्म पुस्तकात कृत्रिमाने दडपले आहेत. म्हणजे जीदडपणूक केली, ती ग्रंथात लिहिली आणि सर्व ही सर्व प्रकरणे जबरदस्तीनं प्रकरण चालवलेली आहेत. स्त्रीशूद्रादिशूद्रांना दास  केले. म्हणून महात्मा फुले असे म्हणतात, ‘तुमचे जूनाट खल्लड ग्रंथ’ भंगड ग्रंथांतूनआमचे कोणतेही हित होणार नाही. आणि म्हणून आम्ही काय दु:ख-यातना सहन करतो हे तुम्हाला समजूशकत नाही. कारण तुम्ही लोक उंटावरून शेळ्या वळणारे आहात. अशा ग्रंथकारांना मोठ मोठ्या सभासस्थानी आगंतूक भाषणे करण्याची सवय आहे. ती आम्हाला नाही.

अशा लोकांसोबत आम्ही संमेलनामध्ये असणार नाही. ते सार्वजनिक सभेबद्दल बोलतात. आणि तुमचीसार्वजनिक सभा खरे पाहू शकत नाही तुम्ही डोळ्यावर कातडे पांघरून घेतलेले लोक आहात असे ग्रंथकारआम्हाला नको. ब्रिटीशाच्या प्रशासनात तुम्ही ‘सोवळं’ घेऊन गेलेले लोक आहात म्हणून तुमच्या ग्रंथकारसोहळात आम्ही सहभागी होऊ शकत नाही. तुमच्या भुलस्थापना आम्ही फसणार नाही असे फुलेम्हणतात. २१ व्या शतकात सुद्धा लक्षात घेवून त्याप्रमाणे कृती केली पाहिजे.

पत्राच्या शेवटी, सारांश त्यांच्यात मिसळल्याने आम्हास शूद्रादि अतिशूद्रांचा काही एक फायदा होणेनाही. याबद्दल आमचा आम्हीच विचार केला पाहिजे म्हणजे आमचे ग्रंथकार आमच्या सभा या स्वतंत्रअसतील, आम्ही ब्राह्मणी ग्रंथकार सभांसोबत जाणार नाही. हे फुल्यांनी आवर्जून सांगितले आहे.

‘अहो, त्या दादांना जर सर्वांची एकी करणें असेल तर यांनी एकंदर सर्व मानवी प्राण्यांत परस्पर अक्षयबंधूप्रीती काय केल्याने वाढेल, त्यांचे बीज शोधुन काढावे व ते पुस्तकाद्वारे प्रसिध्द करावे.’ म्हणजे आखिलमानव एक कसा होईल अशा तत्त्वांची बीज तुमच्या ग्रंथामध्ये नाहीत. आणि ते शोधणारी सर्व मानवाची हितहोईल असे लेखण करणारी, असे बिजे पेरणारे आमचे लेखक तयार होतील, आमचे ग्रंथकार तयारहोतील,आणि ते सर्व मिळून आपल्या ग्रंथकार सभा स्वतः भरवतील हा साहित्य-संस्कृतिकडे बघण्याचासत्यशोधक दृष्टीकोन म. फुले यांनी दिला आहे. म्हणून तुमच्याकडे येण्याचा सवालच उद्धभवत नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जी सुरुवात गोपाळ हरि देशमुख , रानडे यांच्या मतांनीझाली, त्यांच्याशी आपलं वैचारिक मतभेद आहेत. कारण ते ब्राह्मणी-भांडवली-पुरुषसत्ताक मनोवृत्तीचाजागर करतात. त्याच मूल्यांचे पुरुत्पादन-पुनरुज्जीवन करतात. म्हणून त्यांच्यात  मिसळता कामा नये हीभूमिका महात्मा फुल्यांनी घेतलेली होती.

आपण लोकहितवादी व रानड्यांच्या भूमिकेने जायचे की महात्मा फुल्यांच्या मार्गाने जायचे हा प्रश्नआज नाशिकच्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आला आहे  संमेलनाच्या मंचावरूनमराठी सारस्वत मेळ्यात

फॅसिस्टांचे मुखंड मोदीशहा यांच्या विरोधात, शेतकर्‍यांची आंदोलने ज्या पध्दतीने दडपून टाकत आहेतत्याच्यावर ‘ब्र’ शब्द सुद्धा जेथे उच्चारला जाणार नाही त्या संमेलनाकडे का फिरकायच? या देशामध्येदलितांवर वाढत्या अत्याचार वर बोललं जाणार नसेल तर सर्वहारा समुहाच्या साहित्यिकांनी सुध्दाबहिष्काराचा बडगा उगारला पाहिजे. आपल्याला एक कविता म्हणायला स्टेज मिळेल म्हणून आजच्याब्राह्मणी साहित्य संमेलनाकडे आशाळभूतपणे जाणं सोडून दिले पाहिजे. ही आत्मसन्मानाच्या लढाईचामार्ग महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवला आहे. त्याच मार्गाने सांस्कृतिकसंघर्षासाठी आपण सिद्ध झाले पाहिजे हाच महात्मा फुले यांनी लिहिलेल्या पत्राचा सांगावा आहे.

लेखिका अब्राह्मणी स्त्रीवादाच्या पुस्कर्त्या आहेत. राज्यशास्त्राच्या प्राध्यापक असून सत्यशोधक कम्युनिस्ट चळवळीत त्यांचे सक्रिय योगदान आहे.

Write A Comment