कोरोना व्हायरसच्या आधी सव्वाशे वर्षे ब्युबॉनिक प्लेगच्या साथीने बॉम्बे प्रेसिडेन्सीतच नव्हेतर देशात आणि जगभरात हाहाःकार माजवला होता. या दोन्ही साथीमध्ये विलक्षण साम्य आढळते. आश्चर्य म्हणजे सव्वाशे वर्षांपूर्वी जे घडले होते तेच आणि तसेच आता घडत आहे. तीच परिस्थिती, तेच भय, तीच दहशत, तेच उपाय, तोच हलगर्जीपणा, तसेच बिथरलेले…
नव्यानेच सत्तेवर आलेले ठाकरे सरकार तिजोरीतील खडखडाट पाहून आर्थिक स्थितीचा आढावा घेत असताना जीएसटीतील घट, हाडकुळी आलेली स्टँप ड्युटी, महसुलाला लागलेली ओहोटी तशातच वाढलेल्या कर्जाचा आणि व्याजाचा बोजा पाहून पदोपदी ठेचकाळत होते. यातून कसा मार्ग काढायचा यावर खल सुरू होता. तेव्हढ्यात, ज्या भयानक साथीने चिनी डॅ्रगनचे पेकाट मोडत…
“एकाद्याला दगडं मारून येडं करायचं आणि येडा आला म्हणून पुन्हा दगडं मारायची”, अशी गावात पद्धत असते. मराठ्यांची अवस्था आज महाराष्ट्रात नेमकी तशी झालीय. महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या या समाजालाच आता वेडे ठरवायचे राजकारण सुरू आहे. एकदा हा समाज वेडा ठरविला की आपोआपच तो बहुजन समाजातील इतर जातीजमातींपासून वेगळा…
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात छगन भुजबळ यांना फुले पगडी घालायला लावली आणि महाराष्ट्रात एकदम वादंग सुरू झाले. पवार यांनी पुणेरी पगडीचा अवमान केला. पवार यांनी पुणेरी पगडी नाकारली. त्यांचे भान सुटले आहे. त्यांचा आत्मविश्वास डळमळला आहे. विद्वत्तेची ओळख असलेल्या पुणेरी पगडीलाही त्यांनी क्षूद्र राजकारणात ओढले.…
अखेर श्री. छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाला. सत्र न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय, अशा चकरा मारून हैराण झालेल्या महाराष्ट्रातल्या एकेकाळच्या फायरब्रँड नेत्याला मुंबई उच्च न्यायालयाने जाचक अटी आणि शर्ती घालून त्यांच्या जामिनाचा अर्ज मंजूर केला. त्यातून त्यांचे समर्थक आणि विरोधक यांच्यात सहाजिकच परस्परविरोधी टोकाचे पडसाद समाजमाध्यमांमध्ये…
संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नावाने काँग्रेसने सलग दहावर्षे कारभार केला. तेव्हा या सरकारला सत्तेतून घालविण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि संघपरिवाराने चोख रणनीती आखली होती. काँग्रेसच्या विरोधात भाजपने संसदेत संघर्ष करायचा. पण रस्त्यावरचा थेट संघर्ष टाळायचा. रस्त्यावरच्या थेट संघर्षासाठी काँग्रेसपुढे सुरुवातीला नवनव्या बिगर राजकीय आघाड्या उभ्या करायच्या. करदात्याच्या नावाने पावसाळी…
भारतीय समाजातील विषमता आणि जन्माधिष्ठित उच्चनीचतेमागील सत्त्याचा शोध घेत असताना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या माध्यमातून सत्यशोधक पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली गेली. तत्त्पूर्वी बंगालमध्ये राजा राममोहन रॉय यांनी १८२१साली संवाद कौमुदी आणि १८२२मध्ये मिरत उल अखबार हे फारसी भाषेतील वृत्तपत्र सुरु केले होते. रॉय यांनी स्त्रीशिक्षण, विधवाविवाह, प्रौढविवाह या प्रश्नांच्या…
राज ठाकरे यांनी शरद पवार यांची घेतलेली मुलाखत ऐतिहासिक ठरली. पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे झाल्याच्या निमित्ताने घेतलेल्या जाहीर मुलाखतीची दखल आख्ख्या महाराष्ट्रासह राजकीय जगताने घेतली. एकाद्या राजकीय नेत्याने दुसऱ्या राजकीय नेत्याची मुलाखत घेण्याची, ही कदाचित पहिलीच वेळ असेल. मुलाखतकार या पिढितले तरुण राजकारणी. सुरुवातीच्या यशानंतर पवारांप्रमाणे पावलापावलाला…
कोपर्डी, कर्जत ।। खर्डा, जामखेड ।। लोणी-मावळा, पारनेर ।। जिल्हा अहमदनगर अल्पवयीन शाळकरी मुलींवर झालेले बलात्कार आणि अत्यंत निर्घृणपणे केलेल्या त्यांच्या हत्या तसेच एका अल्पवयीन विद्यार्थ्याचे थेट शाळेतून अपहरण करुन केलेली हत्या, अशा तीन संवेदनाक्षम खटल्यांचे नुकतेच निकाल लागले. तिन्ही घटना ग्रामीण भागातल्या होत्या. तिन्ही घटना अहमदनगर जिल्ह्यातल्या…