गेल्या काही महिन्यांत श्रीलंकेतील आर्थिक-राजकीय अरिष्ट अधिकच गंभीर झाले आहे. महागाईचा भडका उडाला आहे. परकीय चलनाच्या तुटवड्यामुळेअन्नधान्य, इंधन तेल आणि औषधे यांच्या आयातीची किंमत सरकार चुकवू शकत नसल्यामुळे त्यांचा भीषण तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक भागांतवीजपुरवठा १२- १३ तास खंडित राहतो आहे. त्याविरुद्ध नागरिकांचा असंतोष आणि शांततापूर्ण निदर्शने…
गेल्या काही दिवसांत पाकिस्तानातील राजकीय पेचप्रसंगाने नाट्यमय वळण घेतले. इम्रान खान यांच्या ‘तेहरीक इ इन्साफ’ पक्षाचे सरकार काही असंतुष्ट सहकारी आणि घटक पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्याने अल्पमतात आले होते. तेव्हा राजीनामा देण्याऐवजी विरोधी पक्षांनी आणलेला अविश्वास ठराव सभापतीकरवी नियमबाह्य ठरवून मांडूच द्यायचा नाही आणि सरळ नॅशनल असेंब्ली बरखास्त…
देशात पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरु असतानाच कर्नाटकातील हिजाब प्रकरण चांगलेच चिघळले आहे. कर्नाटकात इतर ठिकाणीही त्याचे पडसाद उमटले आहेत. देशातील इतर राज्यांमध्येही ‘हिजाब विरुद्ध भगवा’ वादाचे लोण पसरायला सुरु झाले असून असून राजकारण तापलं आहे. एकीकडे राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबविरोधातील निदर्शने तीव्र झाली आहेत तर दुसरीकडे…
काँग्रेस आणि गांधीजींशी मतभेद असूनही नेताजींनी महात्मा गांधींना राष्ट्रपिता संबोधले आणि दोन ऑक्टोबर हा गांधीजींचा वाढदिवस आजाद हिंदमध्ये राष्ट्रीय सणाचा दिवस जाहीर केला. काँग्रेस आणि नेताजी यांची लढाई ही सत्तेसाठीची लढाई नव्हती तर स्वातंत्र्य कोणत्या मार्गांनी आणि कशासाठी मिळवायचे या विचारांची लढाई होती. म्हणूनच नेताजींच्या सैन्यदलातील तुकड्यांची नावे…
कालच्या प्रजासत्ताक दिनी मुंबईमध्ये पुन्हा एकदा मैदानाला नाव देण्यावरून वाद बघायला मिळाला. मालाड येथील एका मैदानाला टिपू सुलतान असं नाव दिल्याने भाजप, बजरंग दल आदी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. भाजपचं सरकार २०१४ मध्ये केंद्रात सत्तेत आल्यापासूनच स्थळं, शहरं आदींची मुस्लिम नावं बदलण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे. कालच्याच दिवशी…
मराठी टीव्ही क्षेत्रामध्ये अभिनेते किरण माने यांना स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका “मुलगी झाली हो” मधून अचानक काढून टाकल्याने गेला आठवडाभर मराठी प्रसार माध्यमे आणि सोशल मिडियावरील मराठी भाषकांमध्ये चांगलाच वाद रंगला आहे. त्यांनी फेसबूकवर केलेली एक पोस्ट ही मोदींच्या पंजाबमधील रद्द झालेल्या रॅलीशी जोडून पाहिली गेल्यानेच हा वाद…
डिजिटल जगामध्ये कितीही नवीन तंत्रज्ञान आलं आणि एखादी गोष्ट तयार करणारा शोधणं मुश्कील होऊन बसलं तरी त्याचे “फूटप्रिंट” राहतातच. याचं उत्तम उदाहरण म्हणजे गेल्या आठवड्यात कायदेतज्ज्ञ असलेल्या ब्रिटिश अध्यापक डॉ. लिझा लोडो गॉमसेन यांनी फेसबुकच्या विरोधात दावा केला असून कंपनीने आपल्या ४४ दशलक्ष सदस्यांना तीन बिलियन डॉलरची भरपाई…
सध्याच्या करोना साथीमुळे भारताच्या सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेवर गंभीर परिणाम होणार आहेत. स्पॅनिश फ्लू साथीचे उदाहरण आपल्याला भविष्यात करोना साथीनंतरच्या भारतीय समाजाचे चित्र स्पष्ट करण्यास मदत करू शकते. या लेखात होऊ घातलेल्या बदलांचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला आहे. दिनांक ३० जानेवारी २०२० रोजी भारतात पहिला करोनाचा बाधित रुग्ण…
नव्यानेच सत्तेवर आलेले ठाकरे सरकार तिजोरीतील खडखडाट पाहून आर्थिक स्थितीचा आढावा घेत असताना जीएसटीतील घट, हाडकुळी आलेली स्टँप ड्युटी, महसुलाला लागलेली ओहोटी तशातच वाढलेल्या कर्जाचा आणि व्याजाचा बोजा पाहून पदोपदी ठेचकाळत होते. यातून कसा मार्ग काढायचा यावर खल सुरू होता. तेव्हढ्यात, ज्या भयानक साथीने चिनी डॅ्रगनचे पेकाट मोडत…
मे २०१४ मध्ये पूर्ण बहुमत मिळवून केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आल्यानंतर, निवडणुकीत दिलेली भरमसाठ आश्वासने पूर्ण करण्याऐवजी, पूर्वीच्या ६५ वर्षात कॉंग्रेसच्या राजवटीत, प्रामुख्याने पंडीत जवाहरलाल नेहरूंच्या काळात, निर्माण करण्यात आलेल्या सर्व लोकशाही संस्था उध्वस्थ करण्याचा सरकारने सपाटा चालवला आहे. त्यामुळे, मोदींची राजवट ही स्वातंत्र्योत्तर काळातील…