‘पाकिस्तानी लष्कराची गुप्तहेर शाखा असलेल्या ‘आयएसआय’चे माजी प्रमुख हमीद गूल हे राक्षसी वृत्तीचे होते आणि भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया करण्यात त्यांचा प्रमुख हात होता, अशी त्यांची प्रतिमा आपल्या देशातील प्रसार माध्यमातून उभी केली जात असते. मात्र जनरल हमीद गूल यांच्या व्यक्तिमत्त्वाची दुसरीही एक बाजू आहे आणि त्याचीही चर्चा होण्याची…
गेल्या काही दिवसांत पाकिस्तानातील राजकीय पेचप्रसंगाने नाट्यमय वळण घेतले. इम्रान खान यांच्या ‘तेहरीक इ इन्साफ’ पक्षाचे सरकार काही असंतुष्ट सहकारी आणि घटक पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्याने अल्पमतात आले होते. तेव्हा राजीनामा देण्याऐवजी विरोधी पक्षांनी आणलेला अविश्वास ठराव सभापतीकरवी नियमबाह्य ठरवून मांडूच द्यायचा नाही आणि सरळ नॅशनल असेंब्ली बरखास्त…
१९४७ साली भारतीय उपखंडात एकीकडे स्वातंत्र्य आणि दुसरीकडे फाळणी अशा दोन्ही गोष्टी एकाचवेळी आल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. फाळणीच्या माध्यमातून हिंदू, मुस्लिम आणि शीख यांनी एकमेकांचे केलेले शिरकाण आणि हत्याकांड, आणि स्वातंत्र्यानंतर तेलंगणा आंदोलन, जम्मू – काश्मीर संस्थान विलीनीकरण आणि हैद्राबाद पोलीस कारवाई, या सगळ्या घटनांमुळे खूप मोठा हिंसाचार झाला.…
गेल्या वर्षभरात खो-यात जो हिंसाचार उसळला आहे, त्यात जे तरूण—आणि तरूणीही- रस्त्यावर येत आहेत, ते नव्वदीच्या दशकातील दहशतवादाच्या पर्वात जन्मलेल्या पिढीतील आहेत. दहशतवादी हल्ले, रात्री-बेरात्री होणारी सुरक्षा दलांच्या झडतीची सत्रं आणि त्या काळात सगळ्या गावानं थंडी–पाऊस-वा-यात उघड्यावर बसण्याची सक्ती, सुरक्षा दलाशी वारंवार होणा-या चकमकी, घराबाहेर पडल्यावर प्रत्येक चौकात…