सर्व पिढ्यांतील महापुरुष बहुतांशी मानवाच्या सुधारणेबद्दलच आग्रही होते. परंतु हे कसे व कशा पद्धतीने समजून घ्यावे हे प्रत्येक पिढीसाठी नेहमीच एक कठीण काम होऊन बसते. ध्येय जरी एकसारखे असले, तरी ध्येय साध्य करण्याची साधने वेगवेगळी असू शकतात. आणि दृष्टिकोनातील हा फरकही वाद निर्माण करू शकतो, वेगळी मते बनवू…
गांधीजींची धर्मकल्पना हा विषय आजच्या काळात समजावून घेणं महत्त्वाचं आहे; कारण एक वेळ गडगडलेलं अर्थकारण सावरता येईल, विस्कळीत झालेली राजसत्ता एकत्र आणता येईल, लोकांचे अधिकार त्यांना परत मिळवून देता येतील, पण धर्मकारणात जी विकृती आजच्या काळात निर्माण झाली आहे, ती जर तशीच चालू राहिली, तर या देशाचं विघटन…
या एप्रिलमध्ये चंपारणच्या शेतकरी आंदोलनाला १०५ वर्षे पूर्ण झाली. शेतीचे कॉर्पोरेटीकरण किंवा कॉर्पोरेटीकरण आणि शोषणाची संघटित लूट याविरोधात आंदोलनाच्या अनेक मागण्यांची मुळे चंपारणपर्यंत जातील. याआधीही बंड झाले होते, पण ते इतके नियोजनबद्ध नव्हते. शतकापूर्वी शेतकऱ्यांचे हे पहिले संघटित शांततापूर्ण अहिंसक आंदोलन होते. गांधीजी चंपारण, बिहारमध्ये १७५ दिवस राहिले…
पुढील वर्ष म्हणजे 2019 हे महात्मा गांधींचे शतकोत्तर सुवर्ण जयंती वर्ष आहे. केवळ भारतातच नव्हे तर साऱ्या जगभर हे वर्ष साजरं केलं जाईल. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तर हे वर्ष सादर करायला इतके आतूर झाले आहेत की त्यासाठी त्यांनी विविध कमिट्यांची स्थापनासुद्धा केली. या कमिट्यांवर वर्णी लागावी म्हणून…
मोदी गुजरात निवडणूक निर्विवादपणं जिंकतील काय? की भाजपाला जेमतेम बहुमत मिळेल? भाजपाच्या हातून काँग्रेस गुजरात हिसकावून घेऊ शकेल काय? गुजरातेत भाजपाला धक्का बसला, तर त्याचा २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काय परिणाम होईल? भाजपा पुन्हा स्वबळावर केंद्रातील सत्ता हाती घेऊ शकेल काय? तसं घडलं नाही आणि भाजपा सर्वात जास्त…
गांधींच्या आणि सावरकरांच्या इस्रायलसंबंधीच्या कल्पना इथे थोडक्यात मांडल्या आहेत त्यावरून त्यांना काय म्हणायचं आहे ते सूत्ररूपात स्पष्ट होतं. त्या दोघांच्या आकलनांमधला फरक लक्षात घेण्याजोगा आहे. गांधीनी एक अत्यंत महत्वाचा प्रश्न ज्यू प्रतिनिधींसमोर मांडला. तो म्हणजे पॅलेस्टाइन मध्ये ज्यूंची सत्ता स्थापन झाली तर तिथल्या अरबांवर अन्याय होणार नाही का?…