fbpx
Author

श्रुति गणपत्ये

Browsing

उत्तर प्रदेशच्या गोरखपुर आणि फुलपूर या दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये ११ मार्चला पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर बहुजन समाज पक्ष (बसपा) आणि समाजवादी पार्टी (सपा) यांच्या हातमिळवणीमुळे उत्तर प्रदेशात आणि पर्यायाने भविष्यात देशाच्या राजकारणातही काही वेगळी राजकीय समीकरणं निर्माण होऊ शकतात असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.  भाजपला मात देण्यासाठी दोन…

असं म्हणतात की, आकडे खोटं बोलू शकत नाहीत. त्यामुळे बँका, आर्थिक व्यवहार यांतील फसवणूक कधीना कधी उघडकीस येतेच. पण जिथे भाजपचं सरकार आहे तिथे आकडेही खोटेच दाखवले जातात. तीन वर्षांपूर्वी मेक इन इंडिया आठवडा साजरा केल्यावर गेल्या तीन दिवसांमध्ये महाराष्ट्र सरकारने मॅग्नेटिक महाराष्ट्र हा तीन दिवसांचा एक गुंतवणूक…

अयोध्येमध्ये पुन्हा एकदा “राम राज्य रथ यात्रा” सुरू करण्यात आली आहे. अयोध्येपासून निघून ही रथयात्रा २२ मार्चला रामेश्वरला पोहोचेल आणि तिथेच तिचा शेवट होईल. राम मंदिराची प्रतिकृती घेऊन ही रथयात्रा सुरू झाली असून अयोध्येमध्ये राम मंदिर बांधणं आणि देशात राम राज्याची स्थापना करणं हे दोन उद्देश घेऊन ही…

रात्री १२.१५ वाजले आहेत. वर्तमानपत्र छापण्यासाठी लायनोग्राफ प्लेट तयार आहेत. केवळ एक बटण दाबलं की पेपर छपाईसाठी जाईल. पण वर्तमानपत्राची मालकीण, कॅथरिन ग्रॅहम (मेरिल स्ट्रीप) हिच्या घरी जाऊन वर्तमानपत्राच्या बोर्डाचे सदस्य, वकील मुख्य बातमी न छापण्यासाठी तिच्यावर खूप दबाव आणत आहेत. एक एक सेकंद महत्त्वाचा असताना, बोर्डाचे सदस्य,…

गेल्या आठवड्यामध्ये आधार कार्डाचा डेटा अवघ्या ५०० रुपयांना विकत घेणं शक्य अाहे हे दाखवून देणाऱ्या द ट्रिब्यून वर्तमानपत्राची वार्ताहर रचना खैरा हिच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. खरंतर रचना हिने आधार कार्डाचा डेटा कसा सुरक्षित नाही हे दाखवून सरकारला जागं करण्याचा प्रयत्न केला होता. पण तिच्यावर थेट फौजदारी…

गेल्या आठवड्यामध्ये कोर्टाच्या दोन निकालांनी भ्रष्टाचार या मुद्द्यावर भाजपचं केंद्रातील सरकार अक्षरशः तोंडावर पडलं. टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपी आणि तत्कालीन टेलिकॉम मंत्री ए. राजा आणि डीएमके नेत्या कनिमोई यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या घटनेच्या दोनच दिवसांनी राष्ट्रीय जनता दलचे (राजद) नेते लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यामध्ये…

राजस्थानमध्ये पुन्हा एकदा गायीला घेऊन जाणाऱ्या दोन मुस्लिम युवकांवर गोळीबार करण्यात आला. यातील एकाचा मृत्यू झाला असून दुसरा अत्यवस्थ आहे. गेले काही दिवस गायीवरून माणसं मारण्याच्या या प्रकारांना थोडासा आळा बसल्यासारखे वाटत असतानाच आता गुजरात निवडणुकांचे पडघम वाजू लागले आणि पुन्हा हे प्रकार सुरू झाले आहेत.