शिवसेनेला पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपकडून हार खावी लागली आणि गुरूवारी ३१ मे रोजी संध्याकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे युतीतून बाहेर पडण्याची घोषणा करणार, अशा अटकळी बांधल्या जाऊ लागल्या होत्या. प्रत्यक्षात उद्धव यांनी निवडणूक आयोगालाच लक्ष्य बनवलं….आणि त्याचवेळी ‘बिघडलेल्या मतदान यंत्रांमुळं भाजपच्या मताधिक्क्यावर परिणाम झाला’,अशी तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र…
दूरगामी दृष्टीनं हानिकारक ठरतील, असे बदल लोकशाही राज्यव्यवस्थेतील सर्व संस्थात्मक जीवनात मोदी सरकार घडवून आणत आहे काय? निश्चितच ! मग केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे होणार्या प्रशासकीय अधिकार्यांच्या निवडीच्या पद्धतीत बदल करण्याचं मोदी सरकार टाकत असलेलं पाऊल म्हणजे एकाच विचारसरणीचे—म्हणजे हिंदुत्वाशी बांधिलकी असणारे—अधिकारी प्रशासनात नेमण्याचा डाव आहे, या काँग्रेसनं…
हेमंत करकरे आज हयात असते तर? मुंबईवरील २६ /११ च्या दहशतवादी हल्ल्याला १० वर्षे पुरी व्हायला केवळ सात महिने बाकी असताना आज हेमंत करकरे यांची आठवण झाली, ती मक्का मशीद बॅाम्बस्फोट खटल्याचा निकाल लागून सर्व आरोपींची पुराव्याअभावी सुटता झाल्यानं.मालेगाव येथे सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या बॅाम्बस्फोटाचा तपास करकरे यांनी…
जम्मूतील कथुआा गावतील बलात्काराच्या घटनेनं देशभर संतापाची व निषेधाची लाट उसळली असल्याचं चित्र उभं राहिलं आहे. ‘चित्र उभं राहिलं आहे’, असा शब्दप्रयोग मुद्दामच केला आहे. …कारण ही घटना घडली, ती १० ते १६ जानेवारीच्या दरम्यान. असिफा या आठ वर्षाच्या मुलीचं अपहरण करण्यात आलं १० जानेवारीला आणि तिचं…
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं ‘संविधान बचाव रॅली’ काढणारे मोदी विरोधक आणि त्याला ‘तिरंगा रॅली’ काढून प्रत्युत्तर देऊ पाहणारा भाजपा व मोदी समर्थक हे दोघंही पराकोटीचे ढोंगी तर आहेतच, पण ते बौद्धिकदृष्ट्या कमालीचे अप्रामाणिकही आहेत. असं नसतं, तर ‘पदमावत’ या चित्रपटावरून जो तमाशा चालू आहे, तो झालाच नसता. राष्ट्रीय स्वयंसेवक…
एक आटपाट नगर होतं. तेथील राजाला चांगलेचुंगले कपडे घालण्याचा व छानछौकीचा षोक होता. एक दिवशी राजला अगदी तलम कपडे घालायची लहर आली. त्यानं फर्मान काढलं की, नगरातील शिंप्यांनी अगदी तलम कपडे घेऊन दरबारी हजर व्हावं. अनेक शिंपी आले. पण ते राजाच समाधान करू शकले नाहीत. राजाच्या या फर्मानाची खबर…
अशोक चव्हाण यांच्यावर ‘आदर्श’ प्रकरणात खटला चालविण्याची महाराष्ट्राच्या राज्यपालांनी दिलेली परवानगी मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केली आहे. केंद्रातील ‘२ जी’ घोटाळ्यातील सर्व आरोपींची पुराव्याअभावी दिल्लीतील ‘सीबीआय’ न्यायालयानं सुटका केल्यावर दुस-या दिवशीच मुंबई उच्च न्यायालयाचा हा निकाल आला. हा निव्वळ योगायोग असला, तरी या दोन प्रकरणांनीच केंद्रातील डॉ. मनमोहन…
गुजरात निवडणुकीच्या निकालाचं तात्पर्य काय? …तर पहिलं म्हणजे मोदींचा बालेकिल्ला अभेद्य नाही आणि दुसरं म्हणजे यश मिळविण्यासाठी मोदी कोणत्याही थराला जाऊ शकतात हेच. गुजरात विधानसभेच्या २०१२ साली झालेल्या निवडणुकीपेक्षा भाजपाच्या मतांच्या टक्केवारीत वाढ झाल्याचं दिसतंय. यंदाच्या निवडणुकीत भाजपाला ४९.६ टक्के मतं मिळाली. ती २०१२ साली ४२ टक्के होती.…
मोदी गुजरात निवडणूक निर्विवादपणं जिंकतील काय? की भाजपाला जेमतेम बहुमत मिळेल? भाजपाच्या हातून काँग्रेस गुजरात हिसकावून घेऊ शकेल काय? गुजरातेत भाजपाला धक्का बसला, तर त्याचा २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काय परिणाम होईल? भाजपा पुन्हा स्वबळावर केंद्रातील सत्ता हाती घेऊ शकेल काय? तसं घडलं नाही आणि भाजपा सर्वात जास्त…
ही दुर्घटना घडल्यापासून सतत सांगितलं जात आहे की, हा पूल धोकादायक आहे, हे रेल्वेला अनेकदा लेखी स्वरूपात सांगितलं गेलं होतं. पूर्वीचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी निविदा काढण्यास परवानगीही दिली होती. खर्च होता ११—१२ कोटीच्या घरात. पण काहीही झालं नाही. या फायलीवर रेल्वे अधिकारी ‘बसून’ राहिले. त्यामुळं ही दुर्घटना…