fbpx
Author

मिहीर पाटील

Browsing

तिबेटी बौद्ध धर्म गुरू दलाई लामा हे गेली ६० वर्षे भारतात आश्रयास आहेत. तिबेटवर चीनने आपला हक्क सांगितल्यापासून ते भारतात आश्रयास असून तिबेटला चीनपासून मुक्त करण्यासाठी ते जगभरात जनमत घडवत असतात. चीनच्या या दादागिरीला दलाई लामांना आपल्या देशात तब्बल साठ वर्षे आश्रय देऊन आपण उघड विरोध केला आहे.…

या देशातील प्रमुख सत्ताधारी पक्षाला या देशाची बिलकूलच चिंता नाही, अशी टीका सध्या वारंवार होते आहे. मात्र हे काही योग्य नाही. आता गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना चिंता आहे की, सध्या महिलांनी बिअर पिण्याचे प्रमाण खूप वाढलं आहे. तसंच त्यांच्याच सरकारमधील एक पूर्वाश्रमीचे स्वतःला फार पुरोगामी समजणारे एक…

दर वर्षी एक कोटी रोजगार या देशातील युवकांसाठी निर्माण करण्याचे स्वप्न आपल्याला २०१४ च्या निवडणुकीपूर्वी दाखविले गेले होते. आणि आपल्याला तर माहितेय, कि आधीची सगळी सरकारे भ्रष्ट आणि निकम्मी होती, पण २०१४ साली आपण भारतीयांनी विकासासाठी मतदान करीत मोदी सरकारला बहुमताने निवडून दिलय. आणि मोदी सरकार तर अहोरात्र…

२०१४ ला निवडून आलेल्या मोदी सरकारचा कार्यकाळ अधिकृतरित्या मे २०१९ मध्ये संपेल. त्यामुळे सार्वत्रिक निवडणुका २०१९च्या एप्रिल मे महिन्यात नियमानुसार होतीलच. मात्र कदाचित नरेंद्र मोदी या निवडणुका आधीच घेण्याची शक्यता सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चिली जात आहे. एक दीड वर्षांपूर्वी अशी जोरदार अफवा उठली होती कि मोदीजी सोळाव्या…

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये सध्या जोरदार वाद सुरू झाला आहे. हा वाद पक्षाचे विद्यमान सरचिटणीस सिताराम येचुरी व माजी सरचिटणीस प्रकाश करात यांच्या दरम्यान सुरू आहे. अर्थात कम्युनिस्ट पक्षातील कुठलेही वाद हे व्यक्तिगत पातळीवरचे नसतात. माकपचे हे दोन्ही नेते पक्षातील वेगवेगळ्या गटांचे किंवा वेगवेगळ्या रणनितींचे प्रतिनिधित्व करतात. प्रकाश करात…

गुजरात दंगलीचा चेहरा म्हणून कुतुबुद्दीन अन्सारी यांचा फोटो जगभरात गेला. समोर अत्यंत हिंसक असलेल्या जमावासमोर डोळयात जिवाच्या भितीने दाटलेले अश्रू सावरत हात जोडून दयेची भिक मागणाऱ्या अन्सारी यांना कॅमेऱ्यात टिपलं होतं रॉयटर्सचे फोटोग्राफर ऑर्को दत्ता यांनी. आज या फोटोची आठवण झाली ती म्हणजे गुजरात दंगलीतील हिंसाचाराचं उघड समर्थन…

एकेकाळी समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी हाक दिली की मुंबई बंद व्हायची. जॉर्ज यांचा बंद म्हणजे टोटल बंद! जॉर्ज यांनी टॅक्सी चालक-मालक यांची संघटना उभारली होती. मुंबईतील वाहतुकीचे महत्त्वाचे साधान असलेल्या बेस्टमध्येही त्यांची युनियन होती. महापालिका, गुमास्ता अशा कितीतरी असंघटित क्षेत्रातील कामगारांना जॉर्ज यांनी अत्यंत मेहनतीने संघटित केले…

केंद्रीय मंत्रीमंडळातील अनेकांना माज आल्याची उदाहरणे गेल्या एकदोन दिवसांत प्रकर्षाने पुढे आली. एक केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे म्हणाले की या देशात कुणी स्वतःला सेक्युलर म्हणवणे म्हणजे स्वतःची वा स्वतःच्या आई-बापाची, तसेच स्वतःच्या रक्ताची ओळख मारून टाकण्यासारखेच आहे. या देशात एकवेळ तुम्ही स्वतःला मुस्लिम, ब्राह्मण, ख्रिश्चन, लिंगायत किंवा हिंदु…