fbpx
विशेष

बाकीच्या १४९ स्वातंत्र्यवीरांचे काय ?

अंदमान येथील सेल्युलर  जेलमध्ये ब्रिटीशांनी ‘काळ्या पाण्याची’ सजा देऊन अनेक स्वातंत्र्यवीरांना डांबले होते. अशा जवळपास १४९ स्वातंत्र्यवीरांसोबत सातत्याने शासकीय विषमता व भेदभाव बाळगण्यात आला आहे, त्यांना अजूनही अंदमानातील कैदी एवढीच ओळख आहे. वीर सावरकारांप्रमाणे त्या इतर १४९ स्वतंत्र्यवीरांनाही समान सन्मान द्यावा व त्यांची छायाचित्रे भारतीय संसदेतील दालनात लावावीत अशी मागणी  आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून विनंती केलेली आहे.अंदमान येथील सेल्युलर  जेलमध्ये ब्रिटीशांनी ‘काळ्या पाण्याची’ सजा देऊन अनेक स्वातंत्र्यवीरांना डांबले होते. अशा जवळपास १४९ स्वातंत्र्यवीरांसोबत सातत्याने शासकीय विषमता व भेदभाव बाळगण्यात आला आहे, त्यांना अजूनही अंदमानातील कैदी एवढीच ओळख आहे. वीर सावरकारांप्रमाणे त्या इतर १४९ स्वतंत्र्यवीरांनाही समान सन्मान द्यावा व त्यांची छायाचित्रे भारतीय संसदेतील दालनात लावावीत अशी मागणी  आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून विनंती केलेली आहे.अंदमान-निकोबार बेटावर असलेल्या सेल्युलर जेलमधील कैद्यांना ‘काळ्या पाण्याची शिक्षा झालेले कैदी’ म्हणूनही ओळखले जात होते. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अनेक भारतीयांना  राजकीय कारणांसाठी राजकीय बंदी म्हणून या तुरुंगात  ठेवण्यात आले होते. या सेल्युलर  तुरुंगात शिक्षा भोगलेल्या अनेक भारतीय स्वातंत्रवीरांसोबत आजही भेदभाव होताना दिसतो. ज्या अनेक स्वातंत्रवीरांना येथे डांबण्यात आले होते त्यामध्ये वामनराव जोशी, बरीन्द्र कुमार घोष, उपेंद्रनाथ बनर्जी, हेमचंद्र दास, उल्हास कर दत्ता, इंदुभूषण रॉय, बिभूती भूषण सरकार, हृषिकेश कांजीलाल, सुदिन कुमार सरकार, अभिनाश चंद्र भट्टाचार्जी, बिरेंद्र चंद्र सेन, शंभूनाथ आझाद, जयदेव कपूर, बटुकेश्वर दत्त, सचिंद्रनाथ सन्याल, पंडित परमानंद, लोकनाथ बाळ, गणेश चंद्रघोष  असे अनेकजन होते. परंतु वि.दा.सावरकर आणि इतर स्वातंत्रवीरांमध्ये सातत्याने  शासकिय स्वरुपाचा आणि राजकीय कारणांसाठी भेदभाव केला जात आहे.१९०९ ते १९२१ या काळात सावरकरांसोबत असे आणखी १४९ स्वातंत्रवीर काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते. परंतु सावरकर वगळता  या सर्व कैद्यांना आजतागायत स्वातंत्रवीर असल्याचा मान मिळाला नाही त्यांचा आजही कैदी असाच उल्लेख होत आहे. केवळ वि.दा.सावरकर यांचेच छायाचित्र संसद भवनात लावण्यात आले आहे. इतर स्वातंत्रवीरांचे छायाचित्र का लावण्यात येत नाही आणि त्यांच्यासोबत त्यांच्या मृत्यूनंतरही का भेदभाव होतो. आम्हा सर्व भारतीयांसाठी हे सर्वच १४९ स्वातंत्रवीर तेवढ्याच प्रतिष्ठेचे  आहेत त्यामुळे या सर्वांनाच स्वातंत्रवीरांचा मान देण्यात यावा आणि या सर्वांचेच छायाचित्र कोणताही भेदभाव न करता भारतीय संसदेच्या महत्वाच्या सभागृहात लावण्यात यावे ही मागणी योग्यच आहे .  वीर विनायक दामोदर सावरकर हे इतर १४९ राजकीय कैद्यांपैकी एक आहेत ज्यांना अंदमान सेल्युलर तुरुंगात पाठविण्यात आले होते. परंतु ही इतिहासाची दुर्देवी घटनाच म्हणावी लागेल की सावरकरांनी तुरुंगातून आपली सुटका करून घेण्यासाठी ब्रिटीश सरकारकडे  लिखित स्वरुपात माफी मागितली होती. नंतर स्वतःच्या या कृतीचे समर्थन करण्यासाठी तशी माफी मागणे म्हणजे राजकीय मुत्सद्देगिरीचे आणि राजकीय चातुर्याचे भाग असल्याचे त्यांनी सांगितले होते. अनेकजणांनी इथे  कारावास  भोगला , रणनीतीचा भाग म्हणूनसुद्धा माफी मागण्याचा मिंधेपणा न स्वीकारता मरेपर्यंत अंदमानच्या तुरुंगात कोलूचा बैल म्हणून काम केले. केवळ वि. दा. सावरकरांनाच स्वातंत्रवीर म्हणणे यामागे ठरवून केलेली मोठी प्रक्रिया व षडयंत्र आहे. हा अंदमानातील या १४९  स्वातंत्र्य वीरांचा अपमान आहे .    महात्मा गांधीच्या हत्येतसुद्धा सावरकर हे संशयित आरोपी होते. परंतु पुराव्या अभावी त्यांची मुक्तता करण्यात आली होती. अशा गोंधळात टाकणारे चारित्र्य असलेल्या वि.दा.सावरकर यांचे छायाचित्र आपण भारतीय संसदेच्या महत्वाच्या सभागृहात लावतो आणि अंदमानच्याया तुरुंगातून सुटण्यासाठी ज्यांनी कदापि माफी मागितली नाही त्या इतर त्यांच्यासारख्याच व पूर्ण शिक्षा भोगलेल्या तसेच अंदमानच्या जेलमध्येच शेवटचा श्वास घेतलेल्या १४९ स्वातंत्रवीरांकडे आपण दुर्लक्ष करतो. हा त्या १४९ स्वातंत्रवीरांचा अवमान आहे. सावरकर हे अत्यंत धूर्त आणि चालाख राजकीय संधिसाधू राजकारणी होते याची अनेक उदाहरणे देता येतील. माणसांना जवळ करून आणि जवळीक साधून त्यांची अशी बुद्धीधुलाई करायची कि त्या माणसांच्या शरीराचा वापर केला तरी त्यालाच धन्यता वाटेल असे संमोहित करणे त्यांना जमायचे असे दिसते . कार्ल मार्क्स वाचला का? असा प्रश्न त्यांना विचारला गेला होता म्हणे तेव्हा सावरकरांनी आपल्या उद्धटपनाचा परिचय देत ‘ मार्क्सला विचारा त्याने  सावरकर सावरकर वाचला का ? असे उत्तर दिले . कार्ल मार्क्सचे निधन झाले त्यावर्षी सावरकर जन्माला आले तरीही त्याने असे उत्तर देण्यातील समर्पता व अन्वयार्थ उदात व्यापकतेने सांगणारे महाभाग आजही महाराष्ट्रात आहेतच . अत्यंत दुर्लक्षित कराव अस महाराष्ट्रातील पुणे , मुंबई , नाशिक भागापुरत मर्यादित असलेले  सावरकरांचं कार्यकर्तुत्व आहे . महात्मा गांधींच्या खुनातील मुख्य संशयीत सूत्रधार म्हणून ते भारताला माहिती आहेत.  त्यांचा नास्तिकवाद, तर्कवाद विज्ञननिष्ठा व भाषाप्रभुत्व याबाबतीत असलेली स्पष्टता न स्वीकारता धर्मावर आधारित  द्विराष्ट्रवादाची  मांडणी डोक्यावर घेणाऱ्यानीच , भारताच्या फाळणीची बीजे रोवणाऱ्या सावरकरानां स्वातंत्र्यविराचा दर्जा दिलेला आहे.   सावरकरांनी ब्रिटीशांची लेखी माफी मागून बाहेर पडण्याच्या प्रकाराला राजकीय मुत्सद्देगिरीचे असे नाव दिले तरीही त्यामुळे ज्यांनी माफी न मागता अंदमानच्या अंधार कोठड्यांमध्ये जन्म घालविला , पूर्ण शिक्षा भोगली त्यांचा  देशासाथीचा त्याग  सावरकरांपेक्षा कमी होता  असे तर म्हणता येत नाहीच . मग प्रश्न  असा आहे कि त्या इतर १४९  स्वतंत्रविरांसोबत सातत्याने राजकीय भेदभाव का ? सावरकरांनी  ब्रिटिशांना लिहिलेल्या क्षमायाचीका पत्रे पाठविलीत आणि आता अत्यंत हुशारीने त्या क्षमापात्रांना ‘विनंतीपत्रे’ म्हणा असा नवीन चलाखीचा लेखी प्रयोग प्रतिथयश वृत्तपत्रांमध्ये लेखी लिहून यायला लागला आहे . सावरकरांनी केलेल्या प्रत्येक षडयंत्री पातकामागील व्यापक हेतू राष्ट्रप्रेम आणि देशकार्य हाच होता असे मांडणारे व  बुद्धीभ्रमात राहू इच्छीणारे लोक महाराष्ट्रातच काही प्रमाणात आहेत . गुप्तपणे काम करून देशसेवा अनेकांनी केली पण भारतदेश उभा करताना सामन्यातील सामान्य माणूस उभा करणाऱ्या महात्मा गांधीना  झोपविण्याचे  कटकारस्थान कधीच देशसेवा होऊ शकत नाही हे समजणाऱ्या बहुजन वर्गाने कधीच विकृतशिल नेत्यांना आपले मानले नाही . अभिजन वर्गातील मुठभर धर्माधांनी आजही सावरकरांसारख्या नेत्यांचा उदोउदो सुरु ठेवला आहे . या पार्श्वभूमीवर  ब्रिटीशांची माफी न मागता पूर्ण काळ अंदमानच्या  तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा भोगणाऱ्या अशा १४९ किंवा  त्यापेक्षाही जास्त स्वातंत्रवीरांचे छायाचित्र संसद भवनात लावणार असल्याचे त्वरित जाहीर करावे अशी अपेक्षा कळसुसंगत  आहे .

लेखक सामाजिक न्याय आणि मानवी हक्क विश्लेषक वकील आहेत. संविधान अभ्यासकच्या भूमिकेतून कैक जनहित याचिका दाखल करून लोकशाही रक्षणाचे काम त्यांनी केले आहे.

3 Comments

  1. सुनील ढेंगळे Reply

    अगदी खरय! न्याय सर्वांनाच मिळाला पाहिजे. देशासाठी हजारो जणांनी बलिदान केले.लाखो जेलमधे गेले होते.अनेकांचे निर्वंशही झालेत.परंतु जणु काही फक्त नेहरू घराण्यानेच स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला असे वातावरण स्वातंत्र्यानंतर तयार केले गेले.जयप्रकाश नारायण, लोहिया,एस्. एम्. जोशी, कर्पुरी ठाकुर, मदनमोहन मालविय, सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने किती योजना तयार केल्या गेल्या?विमानतळ, बंदर,अथवा स्टेडियम असो सर्वत्र एकाच घराण्याचा उदो उदो…हीच संस्कृती तर फैलावली नाहीना? सध्या नेहरु विरोधी अक्षर जरी काढले तर अंगावर धावुन येणारी मंडळी पाहिली की मोदी भक्तही फिके वाटावे. जे पेरलं ते उगवेल येवढच म्हणायचं मला.

  2. Vrushal Thakur Reply

    त्या १४९ स्वातंत्र्यवीरांची नावे कळतील का?

Reply To Rehmat Cancel Reply