अच्छे दिन,सबका विकास सबका साथ,शेतीमालाला योग्य भाव, प्रत्येक भारतीयांच्या खात्यावर १५ लाख रुपये टाकणार इत्यादी आश्वासनं मोदी सरकारनं दिली होती, तीन वर्षे होऊन गेली,पण यातील एकही आश्वासन भाजपसरकारने पाळले नाही. मोदी-फडणवीस सरकार विकासाच्या मुद्द्यावर सपशेल पराभूत झालेले आहे,त्यामुळे आता भाजप सत्तेत येणार नाही, याची कल्पना त्यांच्या मातृसंघटनेला म्हणजे संघाला आहे. गुजरात विधानसभेत दीडशे/जागा मिळणार अशी वल्गना करणाऱ्या भाजपाला केवळ ९९ जागा मिळाल्या.पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानात भाजप पिछाडीवर आहे.दुसऱ्या टप्प्यात मतदानात आघाडी घेतली.कारण मोदींनी विकासाच्या मुद्द्यावर नव्हे, तर पाकिस्तानची भीती दाखवून ९९ जागा मिळवल्या.
विकासाच्या मुद्द्यावर हे यशस्वी होऊच शकत नाहीत, कारण यांचा पायाच विधायकतेवर नव्हे, तर विध्वंसावर उभा आहे.संघ भाजपाचे हिंदुत्व हिंदूंच्या कल्याणावर नव्हे तर दलित आणि मुस्लिम द्वेषावर उभारलेले आहे. हिंदूंनी शिक्षण घेतले पाहिजे, हिंदूंनी अंधश्रद्धा सोडली पाहिजे, हे ब्राह्मण्यवादाचे प्रचारक कधीही सांगत नाहीत, तर मुस्लिम आणि दलित हे कसे शत्रू आहेत, असे कुप्रबोधन करणारे अनेक प्रचारक गावागावात जाऊन नाव, वेष, भाषा आणि मिशा बदलून काम करतात.
भीमा कोरेगाव येथील घटना एका दिवसात घडलेली नाही. ब्राह्मण्यवादी प्रचारकांनी खोटा इतिहास सांगून अगोदरच मानवी गोळा बारुद भरून ठेवलेला होता. याची कल्पना फडणवीसांच्या पोलीस यंत्रणेला नाही, असे समजणे हास्यास्पद ठरेल.
५०० बहुजन शूररवीरांनी नालायक पेशवाईचा १ जानेवारी १८१८ रोजी पराभव केला. याचा खरे तर सर्वप्रथम मराठयांना आनंद झाला पाहिजे.कारण शिवरायांना छळणाऱ्या पेशव्यांचा बदला या शुरवीरांनी घेतला होता. १४ जानेवारी १७६१ रोजी तिसऱ्या पानिपतच्या युद्धात पेशव्यांचा पराभव झाल्याचा आनंद महाराणी ताराबाईला झाला होता.महाराणी ताराबाईंनी “बरं झालं पेशवाई बुडाली”असे उद्गार काढून डिसेंबर १७६१ साली देह ठेवला.पेशव्यानी कायम शिवछत्रपतींची जनकल्याणकारी राज्याची कल्पना होती त्या विरोधातच कर्मे केली. छत्रपतींनी उभा केलेला स्वराज्याचा कारभार कुटील नीतीने बळकावून स्वराज्याचा खजिना स्वतःच्या अय्याशीसाठी वापरला. शिवरायांचे नावही इतिहासातून मिटवून टाकण्याचा कृतघ्नपणा शिवशक बंद करून केला. याच ब्राम्हण्यवादी शक्तींनी शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता,त्यांची हत्या केली, संभाजीराजाना हालहाल करून ठार मारले,संत तुकाराम महाराजांची हत्या केली, प्रतापसिंह महाराजाना छळले, दलितांना झाडू आणि मडक घेऊन फिरण्यास भाग पाडले , ब्राह्मण, मराठा, दलित अशा सर्व स्त्रियांचा पेशव्यांनी अतोनात छळ केला.
औरंगजेबाद्वारे ब्राह्मणांनी संभाजीराजाना ठार मारल्यानंतर वढू बु. येथील बहुजनांनी (मराठा,महार इत्यादी).संभाजीराजांच्या शवाला अग्नी दिला. वा. सी. बेंद्रे,शरद पाटील यांनी लिहिले आहे की पेशव्यानी संभाजीराजाना तीन वेळा ठार मारण्याचा प्रयत्न केला.
मराठा-महार यांना छळणाऱ्या पेशव्यांना ५०० बहुजन सैनिकांनी कायमचे गाडले, याप्रसंगी कांही मराठा पेशव्यांच्या बाजूने लढत होते. पण बहुसंख्य मराठा पेशव्यांच्या विरोधात होते.आजदेखील पेशव्यांच्या औलादी भाबड्या मराठयांना हाताशी धरून कटकारस्थान करत आहेत.संघाचे हस्तक सर्व जातिधर्मात पसरलेले आहेत.अगदी मुस्लिमांत देखील त्यांची एक विंग काम करत आहे.
येत्या २०१९ च्या निवडणुका समोर ठेवून वेगाने जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण करण्याचे काम सुरु आहे.गुजरातमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात यश आले नाही. ते आता महाराष्ट्रात प्रयत्न करत आहेत.
अभिमान कोणाचा बाळगायचा?
शिवरायांना छळणाऱ्या पेशवाईला गाडणाऱ्या शूरवीरांच्या स्मृतिप्रित्यर्थ भिमाकोरेगाव येथे ब्रिटीशांनी विजयस्तंभ उभारलेला आहे,खरे तर आपण सर्वांनी त्या स्तंभापुढे नतमस्तक झाले पाहिजे.पण तेथे नतमस्तक होणारावर हल्ला करणे, हे पेशवाईच्या वारसदारांचे लक्षण आहे.दंगलीत बहुजन मरतात, पण फायदा ब्राह्मणी व्यवस्थेचा होतो.आपण अभिमान शिवशाहीचा मानला पाहिजे,पेशवाईचा नव्हे.
हे सर्व सांगण्याचा उद्देश भीमाकोरेगावच्या निमित्ताने जी दंगल घडवून संपूर्ण महाराष्ट्रात मराठा विरुद्ध बौद्ध अशी उभी दरी निर्माण करण्याचा सध्या सत्तेवर असलेल्या फडणवीसशाहीचा जो प्रयत्न आहे, तो खूप भयंकर आहे. दलित बहुजन तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणारा आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या षड्यंत्रामागे कोण आहेत, त्यांची नावेच जाहिर केली आहेत. मनोहर भिडे व मिलिंद एकबोटे यांनीच ही दंगल घडविल्याचा प्रकाश आंबेडकर यांचा आरोप अत्यंत गंभीर आहे. ज्या भाषेत दलितांविरोधात वातावरण पेटविणाऱ्यांची भाषा होती, ती भाषा या महाराष्ट्राला परिचित आहे. शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास सातत्याने मांडून मराठा, ओबीसी बहुजन समाजातील युवकांची डोकी भडकावण्याचे काम कोणा अदृश्य हाताची बोटे करत असतील तर हे कपट ओळखायला आपण शिकलं पाहिजे , ज्या डोक्यातून हे सामाजिक विद्वेषाचे किडे बाहेर पडत असतील ते किडे ठेचायलाच हवेत. हे सर्व अभ्यासाशिवाय शक्य नाही. आपसातील सामंजस्याशिवाय शक्य नाही. महाराष्ट्र एका मोठ्या वळणावर उभा आहे. छत्रपती शिवयारायांचा, प्रकांड पंडित शंभुरायांचा, महात्मा जोतीराव फुल्यांचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शाहूराजांचा, जेधे-जवळकरांचा हा महाराष्ट्र हेडगेवार-गोळवलकरांचा करण्याचे षड्यंत्र सुनियोजितपणे गेले तीन-साडेतीन वर्षे राज्यात जोमाने सुरू आहे. त्याला दलित, बहुजन समाजातील युवकांनी बळी पडल्यास केवळ त्यांचाच नाही तर त्यांच्या पुढच्या पिढ्यांचाही ऱ्हास होणार आहे. हे विद्वेषाचे विष मनात भिनवणाऱ्यांची पोरे-बाळे अमेरिका युरोपात स्थायिक होऊन आपला उत्कर्ष साधता साधता आपल्यावर हसत आहेत, हे कायम लक्षात ठेवायला हवे. भीमाकोरेगावचे षड्यंत्र सध्याच्या पेशव्यांनी रचले खरे पण दलित बहुजनांच्या एकजुटीने हे षड्यंत्र त्यांच्यावरच उलटवण्याची संधी आहे. मराठा-महार हे एकमेकांचे शत्रू नसून भावंडं आहेत. छत्रपती शिवरायांच्या खांद्याला खांदा लावून मराठा-महारानी पराक्रम गाजवला. शिवरायांनी कधीही भेदाभेद केला नाही.त्यांना अनेक महत्त्वाच्या पदावर नेमले.राजर्षी शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. डॉ आंबेडकरांचा जगातील पहिला पुतळा कोल्हापुरात भाई माधवराव बागल यांनी उभारला. मराठा-महार हे शूर, पराक्रमी, लढवय्ये अशी भावंडं आहेत. या भावंडांनी आपापसात लढणे हे दोघांसाठीही घातक आहे. त्यापेक्षा यांनी एकत्र येऊन दंगली घडविणाऱ्या पेशवाई किड्यांचा शोध घेऊन त्यांना आवर घालायला हवा. दोन्ही समाजातील अनेक समंजस युवक-युवती समाजमाध्यमांवर अशाच प्रकारे व्यक्त होत असून ही आनंददायक बाब आहे. मात्र रात्र वैऱ्याची आहे. षड्यंत्रकारी पेशव्यांचा हा वार फुकट गेला म्हणून ते गप्प बसतील, असे होणार नाही. ते पुन्हा काहीतरी कुरापती काढतीलच. तेव्हाही एकजुटीने त्यांना सामोरे जाऊन त्यांचे हे षड्यंत्र हाणून पाडण्याची गरज आहे. भीमाकोरेगावचा इतिहास हा सनातनी राज्यकर्त्यांपासून मुक्तीचा इतिहास आहे. त्या इतिहासाचे अभिमानगीत सर्व बहुजनांनी एकत्र येऊन एकसुरात गायला हवे. शाहू, फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज ही आपली प्रतिके आहेत. या प्रतिकांबरोबर खेळ करणाऱ्यांचा बिमोड करायलाच हवा. त्यासाठी इतिहासाचा अभ्यास व वर्तमानाचे भान गरजेचे आहे. हे भान नव्या पिढीतील अनेक तरुणांना आहे. मात्र काही तरुणांची माथी खोट्या नाट्या बातम्या व इतिहासाचे खोटे दाखले देत भडकावली जात असताना त्यांचे मनपरिवर्तन करण्याची प्रत्येकाची जबाबदारी ओळखून हा समना करावा लागणार आहे. या लढाईत विजय हा दलित-बहुजनांचाच होणार आहे. पेशवाईचा दारुण पराभव तेव्हाही झाला होता व आजही होणारच आहे. कारण प्रतिगामी विचार हा कायमच बुडत असतो. प्रगतीशील विचारच पुढे जात असतो, हे प्रत्येकाने भीमाकोरागावमधील या पेशव्यांच्या षड्यंत्राच्या निमित्ताने लक्षात ठेवायलाच हवे.
5 Comments
Real Message Sir.Very Nice
सध्याचे सरकार दंगलींना रोखण्यात नाक्कीसच अपयशी ठरलेले आहे. संघाचे विचार नक्कीच या देशासाठी धोकादायक आहेत. आणि आंबेडकरांचे विचारच यातून आपल्याला बाहेर काढू शकतील हेही सत्य आहे. परंतु हे आम्हाला संभाजी ब्रिगेड किंवा त्या अत्यंत जातीयवादी संस्थेत काम करणाऱ्या माणसाने सांगू नये. संघी बनावट इतिहास आणि कोकाटेकृत ब्रिगेडी इतिहास ही एकाच प्रकारची हरामखोरी आहे. दोघांनाही तितकेच दूर ठेवावे लागेल आणि नवीन समाज निर्माण कारण्यासाठी पाऊले उचलावी लागतील. पेशवाईत नक्कीच अक्षम्य असे अपराध घडले आणि त्यांचे वंशंज (विचांरांचे) आजही जिवंत आहेत यात वादच नाही त्याचा निषेधच. त्याद्वारे एकाच समाजाला टार्गेट कारण्याचाही निषेध.
nice sir 100/% true
Chan Mahiti Ahe Sir
लेख अत्यंत अभ्यासपूर्ण आहे. सत्य माहिती सांगणारावर नेहमीच टिका हाेते. सत्य पचायला जड जाते. असत्य/खोटी माहीती/भाषा लवकर. समजते. सांगणारा कोण आहे त्यापेक्षा तो काय सांगतोय हे महत्वाचे आहे.