येणाऱ्या गुजरात विधानसभेसाठी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना एकूण १८२ पैकी १५० जागा जिंकण्याचे ‘टार्गेट’ दिले आहे. भाजपाचा छोटामोठा हरेक कार्यकर्ता आता १५० जागा जिंकण्याचीच पोपटपंची करताना दिसतो. भाजपा अध्यक्षांचे हे १५० जागा जिंकण्याचे स्वप्न, वास्तवाशी कितपत मेळ खाते कि सगळा खयाली पुलावच आहे ? या प्रश्नांची…
गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरावयाच्या शेवटच्या दिवशी, भाजपातील बंड चव्हाट्यावर आले आहे. बंडखोर केवळ गल्ली पातळीवरील नाराजच नव्हेत तर भूतपुर्व मंत्री व गुजरात भाजपाचे ज्येष्ठ नेतेसुद्धा बंडाच्या पवित्र्यात आलेले दिसतात. धनजी पटेल या धनिकाकडून नऊ कोटी रुपये घेऊन, पक्षश्रेष्ठींनी वाधवान मतदारसंघ -सुंदरनगर जिल्हा- ज्या मतदारसंघाचा या…
प्रपोगंड्याचा वायू भरून ‘गुजरात मॉडेल’ चा जो फुगा मोदी अँड कंपनीने फुगविला होता त्याला हार्दिक, जिग्नेश आणि अल्पेश हि त्रिमूर्ती ठिकठिकाणी टाचण्या लावतेय. ह्या फुग्यातील सगळी हवा आता बाहेर पडतेय. या तीन युवकांनी राज्यस्तरावर यशस्वी आंदोलने करून भाजपासमोर कडवे आव्हान उभे केल्याचे स्पष्ट जाणवतेय. सुरवात केली हार्दिक पटेल…
एक नाही, दोन नाही, गुजरातेत २००२ पासून सलग तीन विधानसभा निवडणुका जय श्री राम चा नारा देत भाजपाने तीव्र धार्मिक ध्रुवीकरण करून सहज जिंकल्या होत्या. परंतु याखेपेस पाटीदार आंदोलकांचा जय सरदार चा नारा जय श्री रामवर भारी पडताना दिसत आहे. तेवीस वर्षीय हार्दिक पटेल व पाटीदार अमानत आंदोलन…
रणभूमी गुजरातमध्ये लढाईला सुरवात झालीय. आजवरच्या निरीक्षणातून तरी हा लढा संवाद विरुद्ध भाषणबाजी असा दिसतोय. एका बाजूला नम्र भाषा आहे तर दुसरीकडे कर्कश्य नारेबाजी आहे. एका पक्षाचा सेनानी सामान्य लोकांत मिसळून त्यांची गाऱ्हाणी, त्यांच्या व्यथा लक्ष्यपूर्वक ऐकतोय, तर दुसऱ्या पक्षाचा धुरंधर, आवेशपूर्ण भाषणांची आपल्या भक्तगणांसमोर आतषबाजी करतोय. एका…
पंतप्रधान मोदींचे राजकीय भवितव्य पणाला लावणारी निवडणूक ९ व १४ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या गुजरात निवडणुकीकडे साऱ्या देशाचे डोळे लागले आहेत. १८ डिसेंबरला या निवडणुकीचे निकाल घोषित होतील. हा निर्णायक दिवस असणार आहे. पंतप्रधान मोदींचे राजकीय भवितव्य या निकालावर अवलंबून आहे. याच गुजरात राज्याच्या प्रगतीचा हवाला देत मोदींनी…