मोदी व शहा लिखित आणि देवेंद्र फडणवीस दिग्दर्शित `पवारांचं वस्त्रहरण` या एकांकिकेचा पहिला प्रयोग बुधवारी, ५ जुलै रोजी छगन भुजबळ यांच्या `एमईटी` या मुंबईच्या उपनगरात असलेल्या संस्थेत पार पडला. या एकांकिकेत अजित पवार यांची प्रमुख भूमिका होती आणि त्यांच्या जोडीला हवशे, नवशे व गवशे यांनी एकांकिकेतील संहितेनुसार त्यांना…
आधुनिकतेबरोबर स्त्रीशिक्षणाची वाट अधिकाधिक सबल होत जाईल, अशी एक अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात या वाटेवर धर्मवादाचा अडसर आजही कायम आहे. या धर्मवादासमोर निधर्मीवाद (सेक्युलॅरिझम), बहुसांस्कृतिकतावाद (मल्टिकल्चरलिझम) या आधुनिक संकल्पना एकच एक उत्तर द्यायला अयशस्वी ठरत आहेत. किंबहुना धर्मवाद निधर्मीवादाला आपल्या सोयीने वापरत कधी त्याला बहुसांस्कृतिकतेच्या विरोधात उभं करतो…
भारताची जी जडणघडण गेल्या ६६ वर्षांत झाली, तीच संघाला मान्य नाही. या वाटाचालीत अनेकदा अडथळे आले. चुकाही झाल्या. सामाजिक विद्वेषाचे अणि समाज विस्कटतो की काय, अशी भीती वाटावी, असे प्रसंगही अनेक आले. पण बहुसांस्कृतिकतेवर आधारलेल्या सामाजिक चौकटीत चालवली गेलेली संसदीय लोकशाही राज्यपद्धती हे भारतीय राज्यसंस्थेचं स्वरूप कायम राहिलं.…