जगात जन्मावर आधारलेले श्रेष्ठत्व व कनिष्ठत्व मानणारे समाज नाहीत असे नाही. वर्णवादी व वंशवादी समाज आहेत. श्रेष्ठत्व व कनिष्ठत्व ही भावना मुळातच अनुदार, असंस्कृत व मानवव्देष्टी आहे. परंतु भारतातील हिंदू समाजाने प्राचीन काळापासून ज्या ग्रंथाला आपला धर्मग्रंथ व संविधान म्हणून शिरसावंद्द मानले तो ग्रंथच अशी उच्चनीचता धार्मिक व…
आरक्षणाच्या मुद्द्यावरून विविध राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाची देश ढवळून निघाला असून मागास प्रवर्ग कोणता आणि मागासलेपण कसे ठरवायचे याविषयी चर्चा सुरू आहेत. घटनेतील तरतुदींच्या अर्थ लावून बाजू मांडली जात आहे, परंतु या तरतुदी आणि वस्तुस्थिती या दोहोंचा मेळ साधून आपल्याला पुढे जायचे आहे. आरक्षण कुणासाठी आहे, कशासाठी आहे,…
सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींवर महाभियोग चालविण्याची प्रक्रिया अथ पासून इति पर्यंत राजकीयच आहे. भारताच्या राज्यघटनेत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींवर महाभियोग चालविण्यासाठी कलम १२४ (४) व १२४(५) नुसार तरतूद आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीवर महाभियोगाची कारवाई करण्यासाठी १२४(४) व २१७ (१ बी ) हे दोन कलमे संयुक्तपणे तरतूद सांगतात.…