fbpx
Author

आशिष जाधव

Browsing

कलाक्षेत्रात कलावंताच्या मेहनत आणि गुणवत्तेपेक्षाही त्याच्या नशिबाचा भाग मोठा असतो. उमेदीच्या दिवसांमध्ये उपेक्षा झाल्यावर उतारवयात त्याच्या कलेचं चिज होतं, त्यातही आपला वेगळा ठसा उमटवून जायचं, हे सोपे काम नाही. असंच काहिसं पुरणचंद आणि प्यारेलाल वडाली या लोकप्रिय सूफी गायक वडाली बंधूंच्या बाबतीत झालं. घरंदाज पाकिस्तानी सूफी गायकांच्या गोतावळ्यात…

राईट अँगल्सच्या तमाम वाचकांना, हितचिंतकांना, हितशत्रूंना, चाहत्यांना , टीकाकारांना, हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, शिखांना, ब्राम्हणांना, मराठ्यांना, बौद्धाना, भारतीय उपखंडातील सर्वधर्मीय व सर्वजातीय बांधवाना. राईट अँगल्सच्या फेसबुक पेज व पोस्ट लाईक व शेअर करणारांना तसेच राईट अँगल्सच्या पोस्ट वर भडकून अर्वाच्य शिवीगाळ करणारांना… होळी व रंगपंचमीच्या शुभेच्छा !!!

… ही बाबा बुल्ले शाहची रचना किंवा कलाम केवळ मुसलमानांना अल्लाचं नाव घेऊन होळी खेळण्याचं आवाहन करत नाही, तर कुराण शरीफच्या आयतचा आधार घेत जात-पंथ-धर्माची चौकट मोडून मानवता धर्म वाढवण्याची शिकवण देते. त्यामुळंच बाबा बुल्ले शाहच्या या रचनेचं महत्त्व अनन्य साधारण आहे. कदाचित म्हणूनच होळी सणाच्या दिवशी राईट…

संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झालेल्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक-आर्थिक जडणघडणीत चार वेळा मुख्यमंत्री म्हणून मोलाची भूमिका बजावणाऱ्या शरद पवारांची मुलाखत स्वत:ची वेगळी वाट चोखाळणारे नेते राज ठाकरे यांनी घ्यावी तसंच ती मुलाखत टीव्हीवरून घराघरात बघितली जावी, हेच या महामुलाखतीचं वैशिष्टय आहे. त्यामुळं मुलाखत कशी घ्यायला हवी होती, कोणते…

महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी वर्तमानपत्रांमधल्या ‘महागुंतवणुकी’च्या बातम्या वाचून ऊर भरून आला. ‘महागुंतवणूक’- मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत राज्याची आर्थिक मुसंडी, देशात महाराष्ट्रच नंबर वन!, राज्यात ७०,३२५ कोटींच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव, एक लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेची महाराष्ट्राची क्षमता! वगैरे वगैरे. खरंच क्षणभर कर्जबाजारी नुकसानग्रस्त शेतकरी, संपकरी एमपीएससी परिक्षार्थी, विरोधकांचा…

सध्या देशाचा माहौल असा बनलाय की तुम्ही सेक्युलर आहात म्हणजे मुस्लिमधार्जिणे आहात, अशी ओरड सुरू होते. तुम्हाला एकटे पाडण्याचा सहमतीने प्रयत्न होतो. त्यात तुम्ही मुसलमान असाल तर मग तुमच्या अस्तित्वापासून ते जगण्याच्या उद्देशापर्यंत सगळ्या पातळ्यांवर विविधांगी चर्चा होते. ही चर्चा घडवून आणण्यामागे विशिष्ट हेतू असतोच असतो. भारत हा…