fbpx
सामाजिक

अध:पात

गेले दोन आठवडे अमेरिकेमध्ये गिलेन मॅक्सवेल नामक एका बाईवर लैंगिक शोषण आणि त्यासाठी लहान मुलींना फसवण्याबाबत खटला सुरू आहे. मॅक्सवेल या बाईवर मूळात खटला चालण्याचं कारण की ती जेफरी एप्स्टीन नामक एका श्रीमंत, गुन्हेगार आणि अनेक मुलींच्या लैंगिक शोषणाला कारणीभूत अशा महाभागाची मैत्रीण. या खटल्याच्या निमित्ताने एप्स्टीन आणि अमेरिकेतल्या अत्यंत उच्चभ्रू लोकांशी त्याची असलेली जवळची मैत्री याची चर्चाच पुन्हा एकदा रंगली आहे. बिल क्लिंटनपासून डॉनाल्ड ट्रम्पपर्यंत आणि भौतिकशास्त्रातल्या अनेक आघाडीच्या शास्त्रज्ञांपर्यंत सगळ्यांशी त्याची मैत्री होती. उच्चभ्रूंच्या लैंगिक गरजा पूर्ण करण्यापासून ते मोठमोठ्या विद्यापीठांना कोट्यावधी डॉलर्स देणग्या देण्यापर्यंत अनेक कामं एप्स्टीन करायचा. अमेरिकेच्या झगमगाटामागील गुन्हेगारी विश्व, पैसे, मुलांचं लैंगिक शोषण आणि एप्स्टीनसारख्या गुन्हेगाराला मिळणारं अभय आणि समाजातलं स्थान याची ही मोठी रोचक कथा आहे.

१० ऑगस्ट २०१९ रोजी जेफरी एप्स्टीन नामक एका अब्जाधिश नराधमाचा न्यूयॉर्क शहरातील पोलीस कस्टडीत खून झाला. पोलीसांच्या दफ्तरी मृत्यूची नोंद आत्महत्या अशी केली गेली आहे. हा जगातला सर्वांत महत्त्वाचा कैदी. त्याच्यावर कॅमेराखाली सतत लक्ष ठेवले होते. दरवाज्याबाहेर दोन-दोन पहारेकर्‍यांच्या जोडया आलटून पालटून पहारा करत होत्या. पण एप्स्टीन मेला तेव्हा पहारेकरी नेमके झोपले होते. कॅमेरामध्ये काहीतरी समस्या निर्माण होऊन ते बंद पंडले होते. एप्स्टीनच्या कोठडीतल्या सहकैद्याला तो एप्स्टीनला त्रास देतो म्हणून तिथून हलवला होता. दोन दिवसांपूर्वीच एप्स्टीनने आपली सगळी संपत्ती कुणाच्या हाताला लागू नये म्हणून एका ट्रस्टमध्ये हलवली होती. गिलेन मॅक्सवेल ही त्याची साथीदार त्याला पकडल्यापासून बेपत्ता झाली होती.  

पोलीसांनी रचलेली आत्महत्येची कहाणी संशयास्पद आहे असं वाटायला भरपूर जागा होती. (एप्स्टीन मेलाच नाहीमुडदा आणून ठेवलाय तो दुसर्‍या कुणाचा तरीअसं म्हणणाराही एक पक्ष आहे.) पण संशय घ्यायच्या भानगडीत कुणी पडलं नाही. कारण हे विश्व  सर्वसामान्यांचं नव्हतं. हे माफीयाराज होत. फक्त वेगळ्या प्रकारचे माफीया. उच्चभ्रू लोकांत वावरणारेउच्चशिक्षितांमध्ये उठबस करणारेप्रतिष्ठीत लोकांशी लागेबांधे असलेले माफीया. सत्य पण अप्रिय बोलणार्‍यांची अवस्था काय होते याची कल्पना देणार्‍या कथा सर्वांच्या डोळ्यांसमोर होत्या. फितूर” झालेल्या मोर्डचाई वानूनू या इस्र्राइलच्या अणूशास्त्रज्ञाला त्याचे जबडे तारेने शिवून गेले वीस वर्षे अंधारकोठडीत टाकल्याची कहाणी सूज्ञांना परिचित होती.

गंमत म्हणजे जेफरी एप्स्टीन हे या गॉडफादरमधले” मुख्य पात्र असूनही ते कायम पडद्याआडच राहिले. मृत्युनंतरच त्याचा चेहरा लोकांसमोर आला. चित्रपटातील दुय्यम पात्रं मात्र आपापल्या क्षेत्रात अत्युच्चस्थळी विराजमान होती. त्यांत विविध विज्ञानशाखांमधले नावाजलेले (काही नोबेल पारितोषिक मिळालेले!) शास्त्रज्ञ होतेइंग्लंडच्या राजघराण्यातील राजपुत्र होतेमोठेमोठे उद्योगपती होतेख्यातनाम गुंतवणूकदार होतेनामवंत वकील होतेवृत्तपत्रव्यवसायातील गड्डे पुरुष होतेप्रसिद्ध नट होतेसी. आय. ए. आणि इस्र्राइलच्या मोसाद अशा हेरखात्यांतली माणसं होतीअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. एप्स्टीन सर्वसामान्यांशी जरी फटकून वागत असला तरी या खास मित्रमंडळात तो विशेष रममाण होई.

त्या सर्वांमधला आणि त्या सर्वांचा एप्स्टीनशी असलेला दुवा म्हणजे तरुण आणि विशेषत: अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण. एप्स्टीन कुठेही गेला तरी त्याच्या दोन्ही बाजूस सुंदर बांधेसूद कोवळ्या मुली असायच्याच. विज्ञानाच्या परिषदेतसुद्धा तो मागच्या रांगेत बसून मुलींबरोबर अश्लील चाळे करत बसायचा. आपल्या व्यवसायातून” एप्स्टीनने असंख्य अब्ज डॉलर्स कमावले. वेस्ट इंडिजमध्ये लिटल   सेंट जेम्स” नावाचं एक बेट विकत घेतलं. दोन जेटविमानं घेतलीएक देशातल्या देशात फिरण्यासाठीदुसरं लांबच्या प्रवासासाठी. (नोबकॉफच्या कादंबरीतील बारा वर्षाच्या नायिकेवरून त्याने या दुसर्‍या विमानाचं लोलिटा” असं बारसं केलं!) न्यूयॉर्क शहरातील सर्वात महागडं घर याचं. ते अवाढव्य ४५,००० चौ. फुटांचं आणि सहा मजल्याचं आहे. त्याची किंमत दहा कोटी डॉलर्स असावी असा अंदाज आहे. अंदाज म्हणण्याचे कारण विक्रीपत्रात त्याची किंमत शून्य.
एप्स्टीन ट्रम्पबरोबरदाखवली आहे. ते घर त्याच्या एका अब्जाधीश हितचिंतकाने त्याला भेट म्हणून दिलं! त्याचे असेच जबरदस्त महाल इतर अनेक राज्यात आहेत. या सर्व गोष्टी त्याने आपल्या व्यवसायासाठी वापरल्या. त्यात पैसे कमावले. अशी त्याची चक्रीय वाढ होत गेली.

एप्स्टीनच्या सर्वच कथा अरबी भाषेतील सुरस कथांपेक्षा अधिक गूढ आहेत. त्याचा जन्म १९५३ साली न्यूयॉर्कमधील एका सामान्य ज्यूवंशीय कुटुंबात झाला. त्याचं शिक्षण जेमतेम दोन वर्षं कॉलेज. त्यानंतर न्यूयॉर्कमधील अत्यंत महागडया आणि शहरातील खास बुजुर्ग लोकांच्या मुलांसाठी काढलेल्या खाजगी शाळेत त्याची गणिताचा शिक्षक म्हणून नेमणूक झाली. इथून त्याच्या रहस्यमय जीवनास सुरुवात होते. अशा अर्धशिक्षित माणसास ही नोकरी कशी मिळालीत्या शाळेचे मुख्याध्यापक हे ट्रम्पच्या अटर्नी जनरल विल्यम बार (२०१९-२०२०) याचे वडील. हा निव्वळ योगायोग म्हणायचा की इथेही पाणी मुरतेएप्स्टीनचा वर्गातल्या मुलींवर विशेष लोभ असे. त्या अतिश्रीमंत घरातल्या असल्या तरी बर्‍याच जणींकडे त्यांच्या घरच्यांचं लक्ष कमी असे. इथे त्याचं फावलं.

दोन वर्षांतच त्याला शाळेतून काढलं. पण त्याच्या एका विद्यार्थीनीचे” वडील ग्रीनबर्ग (हा गृहस्थही ज्यूवंशीय) बेअर स्टर्न्स” या वॉल स्ट्रीटवरच्या अत्यंत प्रतिष्ठित आणि बलाढ्य कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. एप्स्टीनला या कंपनीत लगेच नोकरी मिळाली. इथे तो चार वर्षं होता. बेअर स्टर्न्समध्ये त्याला ग्रीनबर्गने क्लायंट दिले ते सगळे मालदार. मग एप्स्टीनने स्वत:ची कंपनी काढली. (त्यानंतरही त्याचे ग्रीनबर्गशी संबंध दाट राहिले.) ज्यांच्याकडे गुंतवायला १ अब्ज डॉलर्सपेक्षा कमी रक्कम आहे अशांचं तो तोंडही बघत नसेअसं म्हणतात. त्याच्याकडे पंधरा ते वीस अब्जाधीश क्लायंट कायम असत. अर्थातच या सर्व कहाण्या असण्याची शक्यताही दांडगी आहे. कारण त्याच्या तथाकथित क्लायंट्समधला एक जण सोडून बाकी कुणाचं नावही लोकांना माहीत नव्हतं— अगदी त्या व्यवसायातील लोकांनासुद्धा! जो एक लोकांना माहीत आहे तो म्हणजे स्त्रियांच्या अंतर्वस्त्रांच्या धंद्यात गब्बर झालेला लेझ्ली वेक्स्नर. हाही ज्यूवंशीय आणि अब्जाधीश. एप्स्टीनला न्यूयॉर्कमधलं घर फुकट” मिळालं ते याच्याकडूनच.

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन आणि जेफ्री एपस्टाईन
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन आणि जेफ्री एपस्टाईन

एप्स्टीनने आपल्या तीस वर्षांच्या कारकीर्दीत जवळजवळ हजार एक मुलींचं वाटोळं केलं. एवढया काळात तक्रार करायला कुणीच पुढे कसं आलं नाहीहा प्रश्न स्वाभाविकपणे उद्भवतो. असं व्हायला कारणं अनेक. पहिलं कारण म्हणजे भीती. दुसरं म्हणजे आपल्यावर कोण विश्वास ठेवील का ही शंका. मी-सुद्धा” (#MeToo) चळवळीनंतरही या परिस्थितीत फारसा फरक  पडला असं दिसत नाही. बरेच वेळा या चळवळीचा उपयोग अनेक जण स्वत:च्या मतलबांकरता करतात. धनदांडगे कायदा वाकवण्यात तरबेज असतात. शिवाय त्यांच्याविरुद्ध चाललेली पोलीस चौकशी खात्याच्या वरच्या थरावर हमखास दडपून टाकली जातेअसा अनुभव बहुतेकांचा होता. एप्स्टीनचं क्लिंटनबरोबर यातलं गाजलेलं एक प्रकरण म्हणजे अमेरिकेतील नेब्रॅस्का राज्यातील अनाथाश्रमातल्या मुलांवरच्या अत्याचारांचे. ही मुलं अंमली पदार्थांच्या वाहतूकीकरता वापरली गेली आणि लैंगिक शोषणाकरता. हे चालवणारा जो म्होरक्या होता तो एका पतपेढीच्या फसवाफसवीच्या भानगडीत सापडला. मग इतर गोष्टी बाहेर आल्या. आर्थिक भ्रष्टाचारावरून त्याला पाच वर्षांची शिक्षा झाली. (पुढे त्यात त्याला तीन वर्षांची सूट मिळाली!) त्याचे हितसंबंध नेब्रॅस्का राज्यात वरपर्यंत पोचले असल्याने अल्पवयीन मुलांवरच्या अत्याचारांच्या आरोपांतून तो सुटला. साक्षीदारांना धमक्या दिल्या गेल्या. त्यातूनही एक खमकी मुलगी उभी राहिली. तिने खोटी साक्ष दिली या आरोपाखाली तिलाच पंधरा वर्षाची शिक्षा झाली. बळी गेलेली वीस-पंचवीस मुलं-मुली आता कुठे मोठी झाल्यानंतर एकत्र येऊन अन्यायाला वाचा फोडायच्या प्रयत्नात आहेत. 

नेब्रॅस्का राज्यात झालेल्या वासनाकांडात फक्त त्या राज्यातील बडी धेंडं होती. एप्स्टीन प्रकरणात आंतरराष्ट्रीय स्थरावरची धेंडं आहेत. असल्या भानगडींतल्या म्होरक्यांना हमखास वाचवणार्‍या (आणि निष्पाप मुलामुलींनाच तुरुंगात खडी फोडायला पाठवणार्‍या) हार्व्हर्ड विद्यापीठातला प्रोफेसर-वकीलावरच या प्रकरणात आरोप आहेत. हाही ज्यूवंशीय असून याचे इस्राइलशीविशेषत: इस्राइलच्या मोसाद या हेरखात्याशीघनिष्ट संबंध आहेत. इंपीचमेंट खटल्यात ट्रम्पचं वकीलपत्र घेणार्‍यांपैकी हा एक वकील. अमेरिकेतील न्यायव्यवस्थेत सर्वात मोठा कच्चा दुवा कोणता असेल तर न्यायाधीश,” असं त्याचं प्रसिद्ध विधान आहे. या गोष्टीचा तो फायदा घेतो.  

डॉनल्ड ट्रम्प आणि एप्स्टीन यांची दोस्ती पंचवीस वर्षांची. एप्स्टीन एक विलक्षण माणूस आहे. आम्हा दोघांनाही मुली आवडतात. फरक एवढाच की त्याला जरा कमी वयाच्या आवडतात!” असं ट्रम्पनं एकदा म्हटलं होतं. त्यांची एकत्र-आणि बरोबर मुली अशी-अनेक छायाचित्रं आणि छायाफिती उपलब्ध आहेत. ट्रम्पच्या फ्लॉरिडा इथल्या वास्तूमध्ये एप्स्टीन पार्ट्यांची तजवीज करायचा. दुसरा राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन खुद्द व्हाइट हाउसमध्येच मुलींबरोबर क्रीडा करायचा. (त्यात तो सापडला आणि इंपीचसुद्धा झाला!) अशा माणसाची एप्स्टीनशी घसट असणं अगदीच स्वाभाविक होतं. त्याचं एप्स्टीनच्या लिटल सेंट जेम्स या बेटावर येणं-जाणं चालू असे. (लोलिटा” विमानाचा रेकॉर्ड सांगतो की क्लिंटन तिथे पंचवीस वेळा गेलाक्लिंटन कबूल करतो फक्त चार वेळा!) ट्रमप आणि क्लिंटन यांच्या म्हणण्याप्रमाणे एप्स्टीनला भेटण्यात त्यांचा हेतू पूर्णपणे शुद्ध होता.

आतापर्यंत तरी एप्स्टीनच्या जाळ्यात सापडलेल्या कोणत्याही मुलीने या दोन्ही राष्ट्राध्यक्षांवर गंभीर आरोप केलेले नाहीत. याउलट इंग्लंडचा राजपुत्र (राणीचा दुसरा मुलगा) अँड्रू मात्र पुरा रंगेहाथ सापडलेला आहे. त्याने खून जरी केला तरी त्याचा केस कुणी वाकडा करू शकणार नाहीअसं कायद्याचं संरक्षण त्याला इंग्लंडमध्ये असलं तरी अमेरिकेत (तो आलाच तर) त्याचे लाड होणार नाहीत. एप्स्टीनची त्याच्याबरोबरची छायाचित्रं आणि छायाफिती त्यांची दोस्ती जाहीर करतात. अँड्रूवर बलात्काराचा आरोप करणार्‍या मुलींनी त्याच्याबरोबर काढलेले फोटो प्रसिद्धीस दिले आहेत. त्यातल्या एका फोटोत राजपुत्राच्या कवेत एक मुलगी आणि बाजूला एप्स्टीनची मैत्रीण गिलेन मॅक्सवेल उभी आहे. एप्स्टीनला मुली पुरवणं हे गिलेनचं काम. घरी भांडणदुर्लक्षवाईट वागणूक वगैरे कारणांमुळे बाहेर पडलेल्याकिंवा अमली पदार्थांच्या व्यसनाधीन झालेल्याकिंवा जीवनात वाट चुकलेल्या मुली हेरून त्यांची शिकार करण्यात ती तरबेज होती.

गिलेन ही मूळची ब्रिटिश. तिचा बाप रॉबर्ट मॅक्सवेल हाही एक पोचलेला आसामी होता. तो चेकोस्लोव्हाकियात जन्मलेला ज्यू. दुसर्‍या महायुद्धानंतर इंग्लंडमध्ये स्थायिक झाला. तिथे हेराफेरी करून अमाप पैसा कमावला. वृत्तपत्रव्यवसायशास्त्रीय मासिकांचं प्रकाशन हे त्याच्या अनेक उद्योगांपैकी. बत्तीस हजार लोक त्याच्याकडे नोकरीला होते. अमेरिकन सी. आय. ए. आणि इस्राइली मोसाद या हेरखात्यांची कामं करायचा. मजूर पक्षाचा खासदारही झाला. क्रेमलिनपासून बकिंगहॅम पॅलेसपर्यंत सर्वत्र संचार. आयुष्यभर चस्की केली. १८० फूट लांबीचं जहाज (यॉट) विकत घेतले.

पैसे संपले तसे त्याच्याकडच्या चाकरदार लोकांचे एक अब्ज पौंडाचे पेन्शन फंड त्याने हडप केले. त्यातली एक पेनीसुद्धा आज तीस वर्षे झाली तरी कुणाला वसूल करता आलेली नाही. नंतर इस्राइलमधल्या कुणा बडया असामीकडून धमकीने (ब्लॅकमेल) पैसे वसूल करायला तो गेला आणि त्यालाच त्याच्या जहाजावरून १९९१ च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये रात्रीच्या अंधारात ढकलले गेले. त्यात तो बुडून मेला. त्याला इस्राइलमध्ये पुरला. त्याच्या राजेशाही प्रेतयात्रेला इस्राइलचे आजी-माजी पंतप्रधानआजी-माजी राष्ट्राध्यक्ष हजर होते. बाप मेला आणि पोरांच्या अंगावर कर्जाचं ओझं टाकून गेला. कुटुंबाची पांगापांग झाली. प्रत्येकाने वेगळे झोल चालू केले. काही तुरुंगातही गेले.

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डॉनल्ड ट्रम्प, जेफ्री एपस्टाईन आणि जिलेन मॅक्सवेल
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डॉनल्ड ट्रम्प, जेफ्री एपस्टाईन आणि गिलेन मॅक्सवेल मॅक्सवेल

गिलेन न्यूयॉर्कला आली आणि तिने नवा यार-एप्स्टीन- शोधून नव्या धंद्याला सुरुवात केली. इंटरनेटसोशल माध्यमं यांच्या सुरुवातीचा काळ तो. मुलींच्या शिकारीस नवीन मार्ग उपलब्ध होत होते. पालकांच्या एप्स्टीनविरुद्ध पोलिसात तक्रारी जाऊ लागल्या. एप्स्टीनच्या दुर्दैवाने इंटरनेटवर शिकार्‍यांची पावलं स्पष्ट दिसायची आणि पूर्वीसारखे पालकांना झटकणे पोलीसांना कठीण होऊ लागले. यातून मार्ग कसा काढायचा यासाठी फ्लॉरिडाच्या अटर्नी जनरलने (नाव अकॉस्टा) एप्स्टीनच्या वकीलांशी चर्चा चालू केली. हार्व्हर्डचा कुप्रसिद्ध प्रोफेसर हा त्याचा मुख्य वकील. इंटरनेट हे माध्यम नवीन असल्याने त्यासंदर्भात केलेले कायदे पुरेसे स्पष्ट नाहीत या गोष्टीचा फायदा घ्यायचं दोघांनी ठरवलं. कायद्यातील अस्पष्टता सिद्ध करण्यासाठी हार्व्हर्डच्याच एका भाषाशास्त्रज्ञाला उभं केलं. बलात्कार झालेल्या मुलींना चित्रात घ्यायचंच नाहीअसं ठरवलं. या सगळ्याचा परिणाम म्हणजे २००८ साली एप्स्टीनला तेरा महिन्यांची नाममात्र सौम्य शिक्षा झाली. शिक्षेच्या काळातसुद्धा त्याचे जुने धंदे चालू राहिले.    

कायद्याची ही उघडउघड झालेली चेष्टा पाहून एप्स्टीनच्या कृष्णकृत्यांना बळी पडलेल्या मुलींमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये प्रचंड प्रक्षोभ झाला. एप्स्टीन हा सी. आय्. ए. चा माणूस असल्याने आम्हाला फार खोलात जाऊन चौकशी करता येत नाही असा पवित्रा अ२टर्नी जनरल अकॉस्टाने घेतला. अनेक वर्षं हा घोळ चालला. शेवटी एप्स्टीनला २०१८ साली न्यूजर्सी येथे अटक झाली. पालकांच्या श्रमाचे चीज झाले. पण काही आठवडयातच एप्स्टीन मेला आणि तो आनंद क्षणभंगूर ठरला. मधल्या काळात अकॉस्टा ट्रम्पचा कामगार मंत्री झाला. ट्रम्पला झोडपायला नवीन काठी मिळाल्याबरोबर सगळे वार्ताहर वेगाने पुढे सरसावले. पण या भानगडीत क्लिंटनही आहे हे कळल्यावर तितक्याच जोरात मागे फिरले!  

एप्स्टीनच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात मोठा विस्मयजनक पैलू म्हणजे त्याला असलेला विज्ञानाचा छंद! पार्टिकल फिजिक्सगुरुत्त्वाकर्षणक्वार्कस्ट्रिंग थिअरी ही फिजिक्समधली आघाडीतली क्षेत्रं तसेच जीवशास्त्रउत्क्रांती या सर्व विषयांची त्याला चांगल्यापैकी जाण होती. (निदान त्या विषयांवर लांबलचक गप्पा मारण्याइतपत!) त्यातल्या महत्त्वाच्या शास्त्रज्ञांशी त्याने संबंध वाढवायला सुरुवात केली. त्याचा हार्व्हर्डएम्. आय्. टी. या विद्यापीठांवर विशेष जीव होता. इतरही विद्यापीठं होती. त्यांना संशोधनासाठी पैशाची गरज भासे. अनेक वेळा बायकांच्या बाबतीत ते फारसे सोवळे” नसायचे. या दोन्ही गोष्टी एप्स्टीन सढळ हाताने पुरवी. हार्व्हर्डएम्. आय्. टी. यांना त्याने प्रत्येकी एक कोटी डॉलर्सच्या आसपास मदत केली आहे. शिवाय बिल गेट्ससारख्या उद्योगपतींना या संस्थांना कोटयवधी डॉलर्स देण्यास त्याने उद्युक्त केलं आहे. आश्चर्य म्हणजे बरेच वेळा एप्स्टीनचे उद्योग माहीत असूनही विद्यापीठांनी त्या देणग्या-कधी उघडपणेकधी चोरूनतर कधी बेनामी- घेतल्या आहेत.

२००६ साली एप्स्टीनने वेस्ट इंडिजमधील आपल्या बेटावर गुरुत्त्वाकर्षणावर न भूतो न भविष्यती अशी सहा दिवसाची परिषद भरवली होती. त्या परिषदेत जगातल्या सर्वोच्च अशा वीस शास्त्रज्ञांनी भाग घेतला. त्यात तीन नोबेल पारितोषिक विजेते होते. स्टीव्हन हॉकिंग या जगप्रसिद्ध ब्रिटिश शास्त्रज्ञाच्या अनेक फेर्‍यांपैकी ही एक. न्यूटनने गुरुत्त्वाकर्षणाचा शोध लावलापण गुरुत्त्वाकर्षण काय चीज आहे अजून कुणाला कळलेले नाही. या कोडयावर मनमोकळ्या आणि तणावमुक्त वातावरणात शास्त्रज्ञांनी विचारविनिमय करावाअशी माझी इच्छा होती,” एप्स्टीनने नंतर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत सांगितलं. There was no agenda except fun and Physics, and that’s fun with a capital F” तिथे मजा करायला भरपूर मुली होत्या आणि उपस्थित शास्त्रज्ञ पाहुण्यांनी त्या संधीचा फायदा घेतला. 

एप्स्टीनसारखाच फिजिक्सचा नाद असलेला दुसरा कलंदर म्हणजे अॅल सेकल. हाही मूळचा न्यूयॉर्कचा ज्यू. कॉलेजमध्ये दोन वर्षं काढल्यानंतर हा कॅलिफोर्नियामधील पॅसडीना या गावी स्थायिक झाला. या गावात कॅल्टेक नावाचे जगप्रसिद्ध विद्यापीठ आहे. जगातील इतर कोणत्याही विद्यापीठापेक्षा अधिक नोबेल पारितोषिक विजेते इथे आहेत. सेकल तिथे गेला तेव्हा रिचर्ड फाइनमनमरी गेल-मॅन हे विसाव्या शतकातले महान समजले गेलेले शास्त्रज्ञ तिथे होते. सेकल त्यांचा जानी दोस्त झाला. त्याने दिलेल्या पार्ट्यांना इतरही शास्त्रज्ञ यायचे. या ओळखीच्या जोरावर त्याने अनेकांना टोप्या लावल्या. (दुर्मिळ ग्रंथ विकणे-विकत घेणे हा त्याचा पोटापाण्याचा उद्योग!) गिलेन मॅक्सवेलची बहीण त्याची तिसरी बायको. त्यानेही एप्स्टीनच्या बेटावर गुरुत्त्वाकर्षणावर दुसरी एक परिषद भरवली. यामध्येसुद्धा अनेक जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ होते. फरक एवढाच की यावेळी एप्स्टीनचे धंदे लोकांना माहीत झाले होते आणि त्याची चौकशी चालू होती. (सेकल पुढे फ्रान्समध्ये गेला आणि तिथे त्याचा खून झाला.)

गिलेन अमेरिकाब्रिटन आणि फ्रान्स या तीन देशांची नागरिक आहे. लंडनन्यूयॉर्क येथील सर्वात महागडया भागात तिचे दहा हजार पेक्षा अधिक चौरस फूटांचे आलीशान महाल आहेत. आयकरखात्यात त्यांची नोंद देणगी” अशी केलेली आहे. देणगीदारांची नावं दिली आहेत आणि सर्व जण अब्जाधीश आहेत. त्यांनी देणग्या का दिल्या या गोष्टीची चौकशी व्हायची आाहे. २ जुलै २०२० रोजी गिलेन पोलीसांना सापडली. तिच्यावरती अनेक मुलींचे आरोप आहेत. ती एप्स्टीनच्या गिर्‍हाइकांना मुलींचा पुरवठा तर करायचीच. शिवाय स्वत: मुलींवर लैंगिक अत्याचार करायचीत्यांना विकृत चाळे करायला प्रवृत्त करायचीवगैरेहे तिच्यावरील विविध आरोप. त्यातील महत्त्वाच्या एका खटल्यात गिलेनचा खास मित्र ब्रिटिश राजपुत्र अॅन्ड्रू आहे.    

मायक्रोसॉफ्ट कंपनी चे मालक बिल गेट्स आणि जेफ्री एपस्टाईन
मायक्रोसॉफ्ट कंपनी चे मालक बिल गेट्स आणि जेफ्री एपस्टाईन

या सर्वातून अनेक प्रश्न उभे राहतात. सर्वप्रथम म्हणजे एप्स्टीन मुलींच्या लैंगिक पिळवणूकीतून नक्की कसे पैसे कमवायचाएक शक्यता ब्लॅकमेलची. त्याला हेरखात्यांचं संरक्षण असल्यास असली धोक्याची कामं तो बिनक्कित करत असेल. दुसरी शक्यता म्हणजे या भानगडीत गुंतलेले महापुरुष आपखुशीने पैसे देत असतील. ते सर्व पैशाने प्रचंड मजबूत होते. असल्या विकृत चंगळीपोटी काही कोटी डॉलर्स उडवणे ही काही अशक्य कोटीतील गोष्ट नाही. ज्यो बायडनच्या मुलाने अशाच एका धमाल रात्री तीस हजार डॉलर्सचा चुराडा केल्याचा किस्सा उजेडात आला आहे.

दुसरा प्रश्न म्हणजे एप्स्टीनच्या पैशाचा उगम अल्पवयीन मुलींच्या बलात्कारात आहे हे माहीत असूनसुद्धा शैक्षणिक संस्थांनी आणि प्रतिष्ठीत शास्त्रज्ञांनी त्याच्याकडून पैसे घेतले कसेआम्हाला खरंच माहीत नव्हतं असं खोटं बोलणं हा सर्वात लोकप्रिय बचाव. दुसरा बचाव म्हणजे आपण अनेकांकडून देणग्या घेतो त्या सगळ्यांची माहिती आपल्याला कुठे आहेअसा पवित्रा घ्यायचा. एका शास्त्रज्ञाचं तर म्हणणं असं पडलं की हल्ली मुली लवकर वयात येतात१४ वर्षाच्या मुलींना १९ वर्षाच्या मुलींची समज असते. तेव्हा अल्पवयीन मुलींशी संबंध ठेवले तर बिघडलं कुठेसर्व काही माहीत झाल्यानंतरही आम्ही त्याचे पैसे परत करणार नाही असं म्हणणारे भरपूर लोक निघाले. एप्स्टीनने त्याच्या देणगीवर केव्हाच करसूट (टॅक्स डिडक्शन) घेतलेली आहे,तेव्हा त्याचे पैसे परत करणं कायद्यात बसणार नाहीअसाही युक्तीवाद आहे.

वास्तव हे कहाणीपेक्षाही अधिक चमत्कारिक असते,” अशा अर्थी इंग्रजीत एक चावून चोथा झालेली म्हण आहे. प्रतिभावंत वैज्ञानिकसर्वव्यापी हेरखातीअग्रगण्य विद्यापिठेकल्पक उद्योगपतीभारदस्त व्यापारीआणि सर्वशक्तिमान राष्ट्रप्रमुख एका धाग्याने बांधले जावेत अशी ही कथा प्रत्यक्षात घडली नसती तर कुणी विश्वास ठेवला नसता. आणि हा सर्वांना बांधणारा धागा लहान मुलींचं लैंगिक शोषण हे बघून मन संतप्त होतं. पण ज्यांचा संताप येतो त्यांच्यापुढे आपण य:कश्चित आहोत याची जाणीव झाली संतापाची जागा  विषण्णता घेते. या गोष्टी जगाला नवीन नाहीत. तर पुरातन आहेतसनातन आहेतहे सगळं मान्य आहे. पण माणूस जसा सुसंस्कृत झाला तसा या गोष्टी त्याने त्याज्य समजल्या अशी एक आपली भाबडी समजूत असते. एप्स्टीन आणि त्याच्या संपर्कातली माणसं बघून त्या समजूतीला तडे जातात.

एप्स्टीन हा एकटाच आहे की असे नराधम आणखी आहेतबहुदा असावेत. इंग्लंडमध्ये अल्पवयीन मुलामुलींशी लैंगिक संबंध ठेवणं कायदेशीर करा अशी चळवळ आहे. (इतर देशातही असेल. शेवटी इंग्लंड सगळ्यांचा पुढारी आहे!) आम्हाला अल्पवयीनांचं लैंगिक आकर्षण वाटतंत्याला आम्ही तरी काय करणार?” असा एक मुद्दा पुढे केला जातो. लैंगिक संबंध ठेवायला कमीत कमी सोळा वर्षाचंकिंवा बारा वर्षाचं किंवा दहा वर्षाचं बंधन पाहिजे हे ठरवायचा अधिकार कुणालाअशी बंधनं नैसर्गिक नाहीत. पूर्वीच्या काळात नऊ-दहा वर्षांच्या मुलींची लग्नं व्हायची,” असा दुसरा युक्तिवाद. असलं आकर्षण माणसाच्या जनुकातच (डीएनए) असतं असं सिद्ध करणारे शास्त्रज्ञही पुढे आणले जातील. या चळवळीचे लोक हट्टी आहेतपिच्छा पुरवणारे आहेतमहत्त्वाकांक्षी आहेतआणि एप्स्टीन प्रकरणाने ते पैसेवालेबलशालीही आहेत हेही दाखवलं आहे.

अमेरिकेतील एफबीआयच्या पाहणीप्रमाणे देशामध्ये लहान मुलांची बिभत्स चित्रं आणि चित्रफिती यासंदर्भातील गुन्ह्यांचं प्रमाण या दशकात २५०० टक्क्यांनी वाढलं आहे. माहित असलेल्या आठ लाख लैंगिक गुन्हेगारांतले दोन तृतीयांश लहान मुलांवर अत्याच्यार करणारे आहेत. दुर्दैवाने अत्याचार करणारे लगेच लक्षात येत नाहीत. कारण ते बरेच वेळा जवळचे लोक असतातनातेवाईक असतात. अल्पवयीनांशी लैंगिक संबंध हा व्यापार मोठा आहेवाढता आहेआणि उघडउघड चालला आहे. या व्यापारावर अवलंबून असलेल्या पर्यटनाचा व्यवसायही गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढला आहे. याचे कारण समाजातील आर्थिक विषमता वाढत आहेदेशादेशांमधली विषमता वाढत आहे. अशियाआफ्रिकादक्षिण अमेरिका या खंडांमधील लहान मुलांची भुकेकंगाली वाढत चालली आहे. आणि त्याच प्रमाणात पैसेवाल्यांची निर्दयता वाढत चालली आहेमाणुसकी कमी होत चालली आहे.    

आपल्या समाजाला निग्रो आपल्याबरोबरचे आहेत हे समजायला तीनशे वर्षं लागलीसमलिंगी संबंध स्वीकारायला शंभर वर्षं लागली. अल्पवयीनांशी लैंगिक संबंध स्वीकारायला फार तर वीस वर्षं लागतील!” असा या नतद्रष्ट लोकांचा आत्मविश्वास आहे. एवढंच नव्हे तर त्या दृष्टीनं त्यांची तयारी चालू आहे. लहान मुलांशी लैंगिक संबंध ठेवणार्‍या लोकांबद्दल तुम्हाला आदर वाटला पाहिजेअशीही चळवळ निघेल. त्यांना गौरवणारे चित्रपट निघतील. तुम्ही मागासलेले आहात असा समज तुमच्या मनात ठसवण्यात येईल. हॉलीवुडवाले असल्या गोष्टीत प्रगत” असतात. आताच नेटफ्लिक्सवर क्यूटीज्” हा लहान मुलांच्या लैंगिक चाळ्यांचा चित्रपट लोक मिटक्या मारत बघत आहेत. अमेरिकेत तीन लाख आणि जगात तीन कोटी बालकं वासनांचा बळी व्हायच्या छायेत आहेत. आणि यातील एक तृतीयांश दर वर्षी बळी पडत आहेत.

रोमच्या साम्राज्याच्या पतनाच्या काळी अशीच लक्षणं दिसत होती. आपल्या इथल्या पेशवाईच्या शेवटातदेखील असाच बिभत्स रंग भरला होता. आदिलशहाच्या जनानखान्यात पाचशे मुली होत्या आणि त्याचा अंत वयाच्या ३६ व्या वर्षी अतीस्त्रीसंगाने झाला. विनाशकाले विपरित बुद्धी म्हणण्यापेक्षा विपरित बुद्धीमुळे विनाशकाळ उद्भवतो असं म्हणणं जास्त योग्य ठरेल. जगातली आजची साम्राज्ये यातून शिकतील अशी आशा धरूया.

डॉ. द्रविड हे फिजिक्समधील पीएच. डी. असून यांचे राजकारणविज्ञानइतिहास या विषयांवरील लिखाण वेगवेगळ्या मासिकांतून प्रसिद्ध होते. त्यांचे वास्तव्य अमेरिकेत असून त्यांचे मुक्काम पोस्ट अमेरिका हे अमेरिकेचं सर्वांगीण दर्शन देणारे पुस्तक रोहन प्रकाशनने प्रसिद्ध केले आहे.

1 Comment

  1. Atul Vivek KOTA Reply

    डॉ.द्रविड,
    western societies बाबत, अधपतात तुम्ही अत्यंत सुंदर, विस्तृत पणे सखोल, असे लिहिता. त्यातुन निष्कर्ष जे काही, वजवी-अवाजवी, निघोत-ना-निघोत, let it be as it may.

    मात्र, वाचकाच्या डोस्क्यात निघणारे/होणारे ते सर्व, विचार कल्लोळ, ते तुमचे स्वतःचे विचारानुसार, होणारे विनिमय होत. तरी ते सर्व असो.

    मात्र मी म्हणेन, तुमचे लेखन हे जास्त महत्वाचे होईल/ ठरेल, जेंव्हा तुम्ही शक्य झाल्यास, तुमच्या लेखनात इतर अती महत्त्वाच्या आसामीचे views/opinions include करू शकलात तर, उदा. Dr.Noam Chomsky, Immanuel Wallerrstien, Teresa Hayter (UK), Ingmer Bergman-(सारखे इतर – उदा’.) David Attenborough (CineDirectors), Ms.Jane Drew-(Ar’./Planner), Salman Rushdie, Ratan Tata अश्या काही नामचीन्ह व्यक्तींचे, तुमच्या लेखनावरचे opinions तुम्ही शेअर करावे, त्याप्रमाणे तुमचे लेखन enrich करून, यापुढे इथे सादर करावे, अशी माझी एक प्रामाणिक सूचना आहे, म्हणजे त्यास जास्त महत्त्व येईल.
    सो thanks for sharing this, wish you very best of hny-2022, Cheers, warm regards.

    from:
    अतुल विवेक कोटा
    Solapur-SmartCity-Mah’

Write A Comment