Tag

jnu

Browsing

जातीअंताची वैचारिक भूमिका आणि डाव्या संघटनांच्या नेतृत्वाचे जातिय/सामाजिक चरित्र ( caste character ) हा एकंदरच भारतीय डाव्या चळवळीला भेडसावणारा प्रश्न आहे आणि jnu त्याला अपवाद नाही , (किंबहुना उच्च शिक्षणाच्या लोकशाहीकरणाचा मुद्दा बॅकसीट वर राहिल्यामुळे ,जे एन यु सारख्या विश्वविद्यालयात इंग्रजी भाषक जातवर्गीय अभिजनवादाचा अंतःप्रवाह कायमच राहिला आहे ,त्याची लागण डाव्या संघटनांनी कशी आहे हे बघण्यासाठी जेएनयु मधून येणाऱ्या डाव्या पक्षाच्या नेत्यांकडे आणि बुद्धिवंतांकडे पाहावे, जेएनयु मधील अनेक मातब्बर डाव्या म्हणवून घेणाऱ्या प्राध्यापकांनी ओबीसी आरक्षणाच्या अंमलबजावणीला विरोध केला , viva परीक्षेत बहुजन बिगर इंग्रजी भाषक विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचे ढळढळीतपणे दिसत असतानाही viva चे weightage घटवायला विरोध केला हे नजरेआड करून चालणार नाही ) २००६ पासून उच्च शिक्षणात ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून सामाजिक भाषिक तोंडवळा झपाटयाने बदलू लागला आणि वैचारीक आणि राजकीय पातळीवर बहुजनवादी आंबेडकरवादी भूमिकेतून डाव्यांच्या विचार व्यवहाराच्या चिकित्सेला अधिक जोम आला। या चिकित्सेचे स्वागत करून आपल्या विचार व्यवहारात बदल करण्यातली डाव्यंची कुचराई ही बापसा आणि डाव्यांमधील कडवटपणाच्या मुळाशी आहे

–नचिकेत कुलकर्णी

दोन आठवड्यांपूर्वी पार पडलेल्या  दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाच्या students union निवडणुकांमध्ये तीन डाव्या संघटनांच्या आघाडीने चारही पदांवर यश मिळवले आहे. जेएनयु मध्ये डाव्या विचारांचा दबदबा आहेच तेंव्हा यामध्ये विशेष  काय आहे, नेहमीप्रमाणेच याही वर्षी डाव्या विद्यार्थी संघटनांनी विजय मिळवला असा सिनिकल सूरही लागू शकतो. पण जेएनयु ज्या पद्धतीने संघ-भाजपच्या सरकारच्या निशाण्यावर राहिले आहे ते बघता ह्या विजयाचे राजकीय महत्व लक्षात घ्यावे लागेल.