शारीरिक हिंसा शक्य नसेल त्यावेळी प्रतिपक्षाच्या कर्तृत्त्वाला, त्याच्या मानदंडांना अनुल्लेखाने मारायचे. मौनाच्या या कटानंतरही प्रतिपक्षाचे मानदंड समाजमानसात तगून राहिले तर मग त्यांच्या विरोधात कुजबूज तंत्र वापरायचे. असत्याची पेरणी करण्यासाठी कधी अवास्तव कहाण्या तर कधी संभ्रमित सत्य, आभासी सत्य विविध माध्यमातून कुजबुजत राहायचे. विरोध वाढला की शांत राहायचे, विरोध…
प्रिय साऊ, सत्य की जय हो! सावित्रीबाई तुम्ही आमचे प्रेरणास्थान! प्रेरणास्थान म्हणजे जिच्या कार्यकर्तृत्वातून जात-पुरुषप्रधान समाजात जगण्याची, तग धरण्याची आणि अन्यायाविरुध्द बंड करण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली, मिळत असते आणि मिळत राहिल. १९ व्या शतकात होत्या बर्याच जणी. ज्या विषमताग्रस्त समाजाच्या काळपाषाणाला धडका देण्याचा प्रयत्न करत होत्या. कोणी आनंदीसम…