fbpx
Tag

russia

Browsing

यूक्रेनला द्यायचे ४० अब्ज डॉलर अमेरिकेच्या संसदेत विक्रमी वेळात मंजूर झाले. तरीही राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडल्यापासून मंजूर व्हायला दीड आठवडा लागला. सगळ्यांना—विशेषत: अमेरिकेतील पुरोगाम्यांना—एवढी घाई लागली होती की त्यांना ही रक्कम दोन दिवसांत मंजूर व्हायला पाहिजे होती. राष्ट्राध्यक्ष बायडन यांची मागणी ३३ अब्ज डॉलरची होती.…

एक जमाना असा होता की बातम्या स्वयंभू घडायच्या. याउपर आपल्याला जर काही घडामोडी पाहिजे असतील तर त्या घडवून आणाव्या लागत. एक उदाहरण: एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी अमेरिकेला स्पेनविरुद्ध युद्ध पाहिजे होतं. पण त्यासाठी जनतेला कसं तयार करायचं? जनतेला सहसा युद्ध नको असतं. आपली मुलं मरायला पाठवायची, किंवा दुसर्‍याची मारायची…

एक प्रकाश जो काजवा ठरला

रशियाने युक्रेनवर विशेष लष्करी कारवाई सुरू केल्यानंतर भारत सरकारने घेतलेल्या भूमिकेने जगभरातील राजनैतिक तज्ज्ञांना धक्का बसला. संयुक्त राष्ट्रात रशियाचा निषेध करण्यासाठी पाश्चात्य देशांनी आणलेल्या ठरावावरील मतदानात भारताने भाग घेतला नाही. यामुळे झालेल्या भूकंपाचे धक्के पश्चिमेकडील राजधानीत स्पष्टपणे जाणवले. मंत्री आणि मुत्सद्दींच्या वक्तव्यानंतर अखेर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही…

इराक, २००३

अमेरिकेच्या मदतीने चाललेल्या येमेनमधल्या नरसंहारात आतापर्यंत दोन लाख माणसं मृत्यू पावलीत. यूनोच्या अंदाजाप्रमाणे दीड कोटी मरणाच्या दारात आहेत. युद्धामुळे आणि उपासमारीमुळे. हे आपल्यापैकी किती जणांना ठाऊक आहे? फारच थोडया. कारण ते सी. एन. एन. किंवा बी. बी. सी. वर दाखवत नाहीत. न्यूयाॅर्क टाइम्सच्या बातम्यांत ते नसतं. आणि अशा…

रशिया-युक्रेन युद्धाचा अन्वयार्थ

२४ फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनला ‘नाझी मुक्त’ करण्यासाठी युद्धाची घोषणा केली आणि जागतिक पातळीवर अभूतपूर्व राजकीय, आर्थिक, सामाजिक उलथापालथ सुरु झाली. लेनिनच्या ‘There are decades where nothing happens; and there are weeks where decades happen’ ह्या प्रख्यात उद्गारांची सार्थ आठवण करून देणाऱ्या घडामोडी अवघ्या काही आठवड्यांत घडत आहेत.…

इंधनाचे राजकारण की राजकारणासाठी इंधन

उत्तरप्रवाह-२ या नावाच्या नॅचरल गॅसच्या चार फूट व्यासाच्या आणि १२०० किमी लांबीच्या रशिया ते जर्मनी दोन मोठया पाइपांचे बांधकाम गेल्या महिन्यात पुरे झाले. (जर्मनी ते उर्वरित युरोप पाइप आधीपासूनच अस्तित्वात आहेत.) या कामाला चार वर्षे लागली. बांधण्याचा खर्च १२ अब्ज डॉलर. त्यातले निम्मे पैसे रशियाने खर्च केले, बाकीचे…

नाटो-अमेरिकेचा विस्तारवाद, युक्रेन समस्या आणि नव्या विश्व-व्यवस्थेची नांदी

बीजिंगमध्ये सध्या चालू असलेलं विंटर ऑलिम्पिक्स जागतिक राजकारणातील शक्ती-संतुलनाच्या संदर्भात नव्या कालखंडाची सुरुवात होण्याचं निमित्त ठरलं आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींकडे पश्चिमी चष्म्यातून न बघणाऱ्या प्रत्येक विश्लेषकाने ही बाब टिपली आहे. हा नवा कालखंड कसा असेल ह्याविषयी आज नेमकेपणाने भाकीत करता येणार नाही मात्र अमेरिकेच्या जागतिक वर्चस्वासमोर मोठं आव्हान उभं…