रशियाने युक्रेनवर विशेष लष्करी कारवाई सुरू केल्यानंतर भारत सरकारने घेतलेल्या भूमिकेने जगभरातील राजनैतिक तज्ज्ञांना धक्का बसला. संयुक्त राष्ट्रात रशियाचा निषेध करण्यासाठी पाश्चात्य देशांनी आणलेल्या ठरावावरील मतदानात भारताने भाग घेतला नाही. यामुळे झालेल्या भूकंपाचे धक्के पश्चिमेकडील राजधानीत स्पष्टपणे जाणवले. मंत्री आणि मुत्सद्दींच्या वक्तव्यानंतर अखेर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही…
बीजिंगमध्ये सध्या चालू असलेलं विंटर ऑलिम्पिक्स जागतिक राजकारणातील शक्ती-संतुलनाच्या संदर्भात नव्या कालखंडाची सुरुवात होण्याचं निमित्त ठरलं आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींकडे पश्चिमी चष्म्यातून न बघणाऱ्या प्रत्येक विश्लेषकाने ही बाब टिपली आहे. हा नवा कालखंड कसा असेल ह्याविषयी आज नेमकेपणाने भाकीत करता येणार नाही मात्र अमेरिकेच्या जागतिक वर्चस्वासमोर मोठं आव्हान उभं…