रशियात संपन्न झालेल्या फुटबॉल विश्वचषकाचा ज्वर (किंवा नशा) फ्रान्स आणि क्रोएशिया यांच्यात काल झालेल्या अंतिम सामन्यानंतर ओसरेल. युरोप- अमेरिका आणि रशिया यांच्यातले ताणलेले संबंध, शिवाय रशियातील एलजीबीटीविरोधी, वंशवादी वातावरण, कायदे, एकूणच स्लाव राष्ट्रवाद आणि जगभरच वर्णवर्चस्ववादी गटांना फुटबॉलच्या निमित्ताने चढणारा जोम यामुळे हा विश्वचषक आधीपासूनच वादग्रस्त ठरला होता.…
अमेरिकेत गुलामगिरीची प्रथा होती. कृष्णवर्णीय लोकांची गुलाम म्हणून खरेदी-विक्री होत असे. प्रेसिडेंट लिंकन यांनी १८६५ साली घटनादुरुस्ती करून ही प्रथा निकालात काढली. पण त्यांना त्यासाठी प्रचंड विरोध सहन करावा लागला. एक यादवी युध्दच तिथे झाले. गुलामगिरीची प्रथा गेली तर वर्णभेद मात्र पुढे अनेक वर्षे कायम होता. १९६५ साली…