मोदी सरकारला ४ वर्षे पूर्ण झाली आणि न्यू इंडियाचे पिल्लू बाजारात आले. पण या न्यू इंडियाच्या जुन्या दुखण्यांची आठवण सरकारला उशिरा येत आहे.आता हळू हळू शेती, शिक्षण, रोजगार, इ.बद्दल नवीन जुमले जन्माला घातले जात आहेत. उदा. खरीप हंगामाची पेरणी संपत आल्यावर MSP जाहीर करणे, साखर उद्योगाला पॅकेज जाहीर करणे…
महाराष्ट्रात सध्या शैक्षणिक क्षेत्रात जोरदार घोडदौड सुरु आहे. म्हणजे तशी ही घोडदौड देशातच सुरू आहे म्हणा. न सुरू झालेल्या जिओ विद्यापीठाला उत्कृष्टतेचा दर्जा देऊन केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देशासाठी एक नवा शैक्षणिक पायंडा घालून दिलेलाच आहे. आता त्यांचेच लहान भावंड असलेले विनोद तावडे सर्व ए व…