fbpx
Tag

on the waterfront

Browsing

अमेरिका हा मुक्त भांडवलशाहीचा पुरस्कार करणारा देश आहे,  त्यामुळे तो कम्युनिस्ट विचासरणीच्या विरोधात असणार यात नवल नाही.  तथापि १९४० आणि १९५०च्या दशकात अमेरिकेत कम्युनिस्ट विरोध अतिशय टोकाला (Paranoid) गेला. त्याकाळात तिथे सत्ताधारीवर्गाने कम्युनिस्ट असल्याच्या केवळ संशयावरून हजारो व्यक्तींचा छळ केला. कम्युनिस्टांशी कोणाचे लागेबांधे आहेत, कोण विघातक कारवाया करत आहे, कोण कम्युनिस्टांचे सहानुभूतीदार आहेत, इत्यादींबाबत अमेरिकी नागरिक,  सरकारी कर्मचारी, संस्था यांचा तपास करण्यासाठी तिथल्या वेगवेगळ्या तपास यंत्रणा, सरकारी समित्या काम करत होत्या. हजारो अमेरिकी लोकांवर ते कम्युनिस्ट असल्याचा किंवा कम्युनिस्टांचे सहानुभूतीदार, सहप्रवासी असल्याचा आरोप करण्यात आला. त्यांची कसून चौकशी करण्यात आली. काही लोकांवर तर ते सोव्हिएट रशियाकरता हेरगिरी करत असल्याचाही आरोप करण्यात आला. अमेरिकेतील तेव्हाचा एक सेनेटर जोसेफ मॅकार्थी हा कट्टर कम्युनिस्टद्वेष्टा होता. त्याने जाहीर आरोप केला की दोनशे पाच कार्डधारक कम्युनिस्ट शासनयंत्रणेत घुसलेले आहेत, त्यातील काही अमेरिकेच्या आर्मीतही आहेत. त्यामुळे तर एकच खळबळ उडाली. मॅकार्थीने कम्युनिस्टांविरुध्द जहरी अपप्रचार केला, भाषणे दिली. जोसेफ मॅकार्थी हा गव्हर्नमेंट ऑपरेशन्स कमिटीचा चेअरमन होता आणि ह्या समितीची एक पर्मनंट सबकमिटी ऑन इन्व्हेस्टीगेशन्स होती, त्याचाही तो चेअरमन होता. त्याच्या समोर सुनावणी चालायची. ह्या सुनावणीत त्याने न्याय वगैरे गुंडाळून ठेवला होता. जोसेफ मॅकार्थीच्या ह्या कम्युनिस्ट विरोधी अत्यंत द्वेषपूर्ण विचारसरणीमुळे व त्याच्या कारवायांमुळे तो काळ मॅकार्थी इरा म्हणून ओळखला जातो व मॅकार्थीझम हा शब्दप्रयोग तेव्हापासून रूढ झाला जो आजही वापरण्यात येतो. कोणताही पुरावा नसताना देशद्रोहाचा व राज्यसत्ता उलथून टाकण्याचा आरोप करणे म्हणजे मॅकार्थीझम. राजकीय  विरोधकांवर देशद्रोहाचा आरोप करणे हा प्रकार सध्या किती बोकाळला आहे ते आपल्यालाही दिसत आहेच. तसेच लोकांच्या मनात एखाद्या समुदायाविषयी किंवा विचारधारेविषयी कलुषित भावना असतात. सत्ता  मिळवण्यासाठी अशा कलुषित भावनांचा वापर करणे…