आधुनिकतेबरोबर स्त्रीशिक्षणाची वाट अधिकाधिक सबल होत जाईल, अशी एक अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात या वाटेवर धर्मवादाचा अडसर आजही कायम आहे. या धर्मवादासमोर निधर्मीवाद (सेक्युलॅरिझम), बहुसांस्कृतिकतावाद (मल्टिकल्चरलिझम) या आधुनिक संकल्पना एकच एक उत्तर द्यायला अयशस्वी ठरत आहेत. किंबहुना धर्मवाद निधर्मीवादाला आपल्या सोयीने वापरत कधी त्याला बहुसांस्कृतिकतेच्या विरोधात उभं करतो…
सध्या राजकारणात उत्तर प्रदेश निवडणुकांची चर्चा चालू आहे. भारतीय जनता पक्षासाठी आणि त्याच्या हिंदुराष्ट्र प्रकल्पासाठी उत्तर प्रदेश हे अत्यंत कळीचं राज्य ठरणार आहे. इथला पराभव किंवा जेमतेम विजय हा भाजपला फटका देणारा असेल. अयोध्येतील राममंदिराचं सर्वात मोठं आश्वासन पूर्ण करूनही उत्तर प्रदेशात जर थोडीसुध्दा पीछेहाट होणार असेल तर…