रशियाने युक्रेनवर विशेष लष्करी कारवाई सुरू केल्यानंतर भारत सरकारने घेतलेल्या भूमिकेने जगभरातील राजनैतिक तज्ज्ञांना धक्का बसला. संयुक्त राष्ट्रात रशियाचा निषेध करण्यासाठी पाश्चात्य देशांनी आणलेल्या ठरावावरील मतदानात भारताने भाग घेतला नाही. यामुळे झालेल्या भूकंपाचे धक्के पश्चिमेकडील राजधानीत स्पष्टपणे जाणवले. मंत्री आणि मुत्सद्दींच्या वक्तव्यानंतर अखेर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही…
या वर्षीच्या मार्च महिन्यापासून जगभरात करोना विषाणूचा वेगाने प्रसार होत असल्याचे ध्यानात आल्यावर आंतरराष्ट्रीय राजकारणाची चक्रे कशी फिरतील या वर नव्याने चर्चा सुरु झाली. ही चर्चा नव्याने सुरु झाली असे म्हणण्याचे कारण म्हणजे सन 2019 मध्ये ही चर्चा अमेरिका-चीन व्यापार युद्ध आणि जागतिकीकरणाचे भवितव्य या भोवती केंद्रित होती.…