देशाच्या राजकारणामध्ये वैचारिक शैथिल्य आलेले आहे, आणि या वैचारिक शैथिल्यातून नव्या पिढीची समस्या ते समजू शकलेले नाहीत. आणि म्हणूनच नव्या पिढीपुढे जुनेच तूण-तुणे वाजवले जातेय. वैचारिक शैथिल्यामुळे अस्वस्थता आणि अस्तित्वाची भीतीही निर्माण झालेली आहे. आर्थिक मंदी ज्यावेळेस येते, त्या वेळेस राजकीय पक्ष आणि सत्ताधाऱ्यांनी सामाजिक धोका, सामाजिक अस्थिरता…
एकेकाळी समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी हाक दिली की मुंबई बंद व्हायची. जॉर्ज यांचा बंद म्हणजे टोटल बंद! जॉर्ज यांनी टॅक्सी चालक-मालक यांची संघटना उभारली होती. मुंबईतील वाहतुकीचे महत्त्वाचे साधान असलेल्या बेस्टमध्येही त्यांची युनियन होती. महापालिका, गुमास्ता अशा कितीतरी असंघटित क्षेत्रातील कामगारांना जॉर्ज यांनी अत्यंत मेहनतीने संघटित केले…