कालच्या प्रजासत्ताक दिनी मुंबईमध्ये पुन्हा एकदा मैदानाला नाव देण्यावरून वाद बघायला मिळाला. मालाड येथील एका मैदानाला टिपू सुलतान असं नाव दिल्याने भाजप, बजरंग दल आदी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. भाजपचं सरकार २०१४ मध्ये केंद्रात सत्तेत आल्यापासूनच स्थळं, शहरं आदींची मुस्लिम नावं बदलण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे. कालच्याच दिवशी…
संत कबिरांच्या ६२० व्या प्रकटदिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी अलिकडेच उत्तर प्रदेशमधील मगहर येथील त्यांच्या मजारवर जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. त्यावेळी पुन्हा एकदा भारतीय इतिहासाचे त्यांचे म्हणून जे आकलन आहे, त्यावरून वाद निर्माण झाला. मोदीजी आपल्या औघवत्या शैलीत समोर जमलेल्या श्रोत्यांना म्हणाले की गुरु नानक, बाबा गोरखनाथ आणि कबीर…