भीमा-कोरेगावमध्ये झालेल्या हिंसेचे पडसाद अजूनही उमटत आहेत. जानेवारी १, २०१८ ला भीमा कोरेगाववरून परतणाऱ्या हजारो दलितांवर हल्ले झाले. त्या हिंसाचाराला जबाबदार म्हणून मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांची नावे पुढे आली. तपास अजूनही सुरू आहे. पण त्यासंदर्भात आदिवासी आणि दलितांसाठी काम करणाऱ्या पाच सामाजिक कार्यकर्त्यांना महेश राऊत, रोना…
आंतरराष्ट्रीय दौ-यावर (ऑगस्ट 2018) गेलेल्या राहुल गांधी यांनी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटर्जिक स्डडीज येथे आपल्या आपल्या भाषणात म्हटले होते की, “राष्ट्रीय स्वयंसेवी संघटना देशाचा आत्माच बदलण्याचा प्रयत्न करीत आहे. भारतातील अन्य कोणत्याही संघटना अशा नाहीत ज्या इथल्या प्रमुख संस्थांवर ताबा मिळवू इच्छितात… अरब विश्वात अस्तित्वात असलेल्या मुस्लिम ब्रदरहुडप्रमाणे…
मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली अलीकडेच दलित अत्याचार विरोधी विधेयकामध्ये अटकपूर्व जामिनाची तरतूद करून ते सौम्य करण्यात आलं होतं. त्यानंतर देशातल्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शनं झाली. त्यामध्ये प्रामुख्याने भाजपप्रणीत केंद्र सरकारचा दलित विरोधी चेहरा पुढे आला. लोकांच्या या दबावापुढे झुकून केंद्र सरकारला या सुधारणा तरतूदी मागे घाव्या लागल्या. सर्वोच्च…
आसाममध्ये नॅशनल सिटिझन रजिस्टरचा (एनसीआर)पहिला मसुदा जारी केल्यानंतर संपूर्ण देशात मोठं वादळ उभं राहीलं. या सूचीतून आसाममधल्या जवळपास ४० लाख लोकांची नावं गायब आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या मते, ज्या लोकांची नावं एनसीआरमध्ये नाहीत ते परकीय आहेत, ते देशाच्या सुरक्षेला धोकादायक असून त्यांच्यामुळे देशातल्या नैसर्गिक स्त्रोतांवर…
गेल्या काही वर्षांत धार्मिक अल्पसंख्यांकांच्या विरोधात हिंसेच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामध्ये गोमाता आणि राष्ट्रवादाच्या नावावर ही हिंसा करून अल्पसंख्यांकांना लक्ष्य केलं जात आहे. त्याचा परिणाम असा झाली की, अल्पसंख्यांकांमध्ये असुरक्षिततेतची भावना वाढीला लागली असून ते आपल्या समाजातल्या इतरांमध्ये न मिसळता घेटो केल्यासारखे राहतात. देशाच्या सामाजिक एकतेच्या दृष्टीने…
अलीकडेच लोकसभेमध्ये (२१ जुलै २०१८) ‘अविश्वास ठरावा’वरील चर्चेच्या वेळी मोदी सरकारची विविध धोरणं आणि निर्णय पुढे आले. भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवणं असो, परदेशी बँकांमध्ये असलेला काळा पैसा परत आणणं, प्रत्येकाच्या बँकमध्ये १५ लाख रुपये जमा करणं, तरुणांसाठी रोजगार निर्माण करणं, वाढत्या महागाईला आळा घालणं, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं, अशा प्रत्येक…
आपण अशा काळातून जात आहोत, जिथे समाजातील दुर्बल घटक आणि धार्मिक अल्पसंख्यांकांविरुद्धचा द्वेष प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गोमांसाच्या कारणास्तव जमावाकडून होणाऱ्या हत्या आणि विशिष्ट जातींना दिली जाणारी अपमानकारक वागणूक, दलितांना होणारी मारहाण, या पाठोपाठ देशभरात आता मूलं चोरल्याच्या अफवेमधून जमावाकडून होत असलेल्या हत्या वाढत आहेत. राजकीय पातळीवरुन…
१९७५ मध्ये देशावर लादण्यात आलेल्या आणीबाणीला ४३ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने भाजपने जोरदार निषेध नोंदवत वर्तमान पत्रात अर्धपान जाहिराती दिल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कुटुंबाकडे सर्व सत्ता राहण्यासाठी ही आणीबाणी लावल्याचं सांगितलं. भाजपची पालक संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कशी आणीबाणीविरोधात सामील होती याचे मोठमोठे दावेही करण्यात आले.…
सध्याचं राजकारण हे धर्माच्या नावाखाली चाललं आहे. त्यामध्ये साम्राज्यवादी देशांचं तेलावर नियंत्रण मिळवण्यासाठी असलेलं राजकारण असो किंवा दक्षिण आशियाई देशांमध्ये जन्म-आधारित असमानतेचं राजकारण असो. हे सर्व धर्माच्या आडूनच सुरू आहे. पाकिस्तान आणि अनेक पश्चिम आशियाई देशांमध्ये, इस्लामच्या नावाने सरंजामशाही-एकाधिकारशाही अस्तित्वात आहे आणि मजबूतही होत आहे. म्यानमारमध्ये- श्रीलंकेमध्ये बौद्ध…
संपूर्ण जग विशेषत: पश्चिम आशिया आणि दक्षिण आशियाने दहशतवादाची भयंकर कृत्यं पाहिली आहेत ज्यात अनेक निष्पाप लोकांना ठार मारलं गेलंय. मुंबईत २००८ मध्ये जेव्हा २६/११ चा दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा हिंदू आणि मुस्लीम दोन्ही धर्मांचे लोक त्यात मारले गेले. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टोही अशाच हिंसेचा बळी ठरल्या…