fbpx
अर्थव्यवस्था

बिटकॉईनचा भूलभुलैय्या

समजा आपल्या ह्या विश्वाला समांतर असे एक विश्व आहे. हे पूर्ण:त आपल्याला हवे तसे आपण प्रोग्रॅम करू शकत असल्याने तिथे काहीही होऊ शकते. आपल्या नेहमीच्या जगातले अनुभवसिद्ध कोणतेही नियम तिथे लागू पडत नाहीत. त्या जगात राजकारण नाही स्वार्थी निर्णय `जनतेवर थोपवणारे राजकारण नाही पण त्या विचारसरणीत आणि लोकशाहीत खूप साम्य आहे पण हि लोकशाहीह्या व्यवस्थेत hardwired पद्धतीने सातोषी (बाबा) नकामोटो नावाच्या महाअवताराने सद्भावनेतून घेतली असल्याने आणि गणिती प्रूफस हा त्याचा पाया असल्याने ह्या आभासी विश्वातले लोक हा प्रोटोकॉल संपूर्ण समाजाच्या विकासासाठी वापरुन क्रांती करायची स्वप्ने बघतात. ह्या आभासी विश्वात सगळे काही ‘पियर-टू-पीयर’ अशा’बंधुभावाच्या तत्वावर चालते.आणि गम्मत म्हणजे तुम्ही संगणक लावून घेतलेआणि ह्या आभासी जगाचे सॉफ्टवेअर डाउनलोड केले कि संगणकच पैसे बनवतो. ह्या संगणकाने अगोदरच्या पैशाचा हिशेब ठेवला कि नवे पैसे बनतात. असे कसे होऊ शकते हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्ही आपल्या साध्या (पैसे कमावण्यासाठी जिथे काम करायलाच लागते) त्या जगातले दिसता. ह्या आभासी जगातल्या नियमावली नुसार तुम्हाला सुरुवातीला हिशेब ठेवायचे काम केले कि दर दहा मिनिटांनी ५० नाणी मिळणार असतात तुम्ही कितीही काम केले तरी ह्या आभासी मध्यवर्ती बँकेत (जी विकेंद्रित असली तरी मध्यवर्ती बँकेचे -चलन issue करायचे कामच करते) ती कितीही लोकांनी चलन व्यवहारासाठी वापरले तरी चलन (सोन्याच्या खाणीतून निघणाऱ्या गणिती function सारखे च आहे म्हणे ते) नवी नाणी पूर्वनियोजित क्रमानेच बाजारात येणार. दर चार वर्षांनी दर दहा मिनिटांनी ह्या खाणीतून निघणारी नाणी अर्धी होत जाणार. आणि ती मिळवण्यासाठी सगळे जगभरातले सारे संगणक आपले ह्या उत्खननातून निघालेल्या नाण्याचा गणिती पत्ता आणि त्याचा मालकाची ओळख पटवणे आणि ओळख पटली तर पर्मनंट रेकॉर्ड मध्ये ते लिहायचे काम पटकन करून नवी नाणी मिळवायच्या प्रयत्नात लागणार. नेहमी नेहमी सर्वातफास्ट संगणकालाच ती नाणी मिळू नयेत ह्यासाठी ते होऊ नये म्हणून प्रत्येक वेळी सगळ्यात पॉवरफुल संगणकाने नवी नाणी आणि परमनन्ट रेकॉर्ड मध्ये ते नोंदवण्याचा हक्क मिळवू नये म्हणून एक नंबर गेस करायचा खेळ सगळे पॉवरफुल कॉम्पुटर खेळणार आणि मग ज्याला लॉटरी मिळेल त्याला पैसे मिळणार असा मस्त शोध सातोशी बाबाने लावलाय. एका अर्थाने ह्या समांतर विश्वात हा आभासी पॆसा अस ला तरी लोकांचीलोकांसाठीआणि लोकमान्य पद्धतीने तो काढलेला असल्याने साध्या जगातले लोक’विनिमयासाठी तो निर्विवाद वापरतात आणि वापरू शकतो असे सतोषी बाबांचे भक्त मानतात.
हा पैसा हवेतून काढला असला तरी त्यासाठी खऱ्याखुऱ्या जगातून वीज लागते संगणक हि खऱ्या जगातलेच असतात संगणक कंपन्यांना ही खरा खुरा सरकारी पैसाच लागतो. त्यासाठी संगणक ज्या ज्या देशात आहेत त्या त्या देशात खर्च येतोच येतो. पण ह्या आभासी विश्वातली हि आभासी बँक अवघे जग पुढे मागे ह्या विश्वात सामावले जाईल ची भाबडी आशा बाळगतात. सातोशी बाबा (हे प्रसिद्ध अवतारी पुरुष नक्की कोण ह्या विषयी आभासी जगात खूप चर्चा हि झाल्यात ते १ आहेत कि अनेक पासून अनेक प्रवाद असले तरी एका बाबतीत ह्या विश्वाtमान्यता आहे – सतोषी बाबा एक चांगले गणिती आणि संगणक तज्ज आहेत. आणि त्यांच्या जगातल्या ह्या विकेंद्रित बँकेमागची गृहीतक सोपी आहेत.

  1. अर्थव्यवस्थेत नाण्याची संख्या स्थिर असली पाहिजे (म्हणजे अमेरिकेने मनमानी करून हवे तसे डॉलर्स छापले तसे छापता येत नाहीत) आणि चलनात येऊ घातलेल्या नाण्यांची संख्या अगोदर पासून माहिती असली पाहिजे
  2. प्रत्येक नाणे कोणत्या संगणकीय पत्त्यावर आहे हे ह्या बंधू-भावाने जगणाऱ्या प्रत्येकाला माहिती असले पाहिजे. (कोणाकडे ती नाणी आहेत हे नाही तर कुठल्या पत्त्यावर किती नाणी आहेत ते.)
  3. मध्यवर्ती बँक सरकार ह्या सगळ्यांच्या नियंत्रणाची आभासी जगाला गरज नाही आणि आभासी जग आणि वास्तव जग ह्याची सरमिसळ करणार्यांना ह्या दमन करणाऱ्या संथांची गरज नाही.

एकमेकांना साह्य करून सगळे सुपंथ धरू शकतो ह्या’युटोपियन विचार सरणी ची भुरळ लोकांना पडलीये कि ह्या आभासी जगात पैसे गुंतवून खऱ्या जगातले श्रीमंत व्हायची अनिवार्य हाव आणि ते आवाक्यात वाटण्याची शक्यता ह्या दोहींमुळे लोक बिटकॉइन ह्या क्रिप्टो-करंसीत गुंतवणूक कशी लाभदायक ठरली असती ह्याचे गणित करून आपण करावी का अशी गुंतवणूक असा विचार करायला लागलेत.

त्यात गुंतवणूक करण्याआधी त्या भुलभुलैय्यातल्या खाचा-खोचा समजून घ्यायचा आपण प्रयत्न करू.

बिटकॉइन चे पैसे एका व्यक्तीकडून दुसऱ्याला पाठवायची पद्दत रूढ पद्धती पेक्षा वेगळी आहे. संगणकीय दृष्टीने ती वेगळी आहे म्हणून त्या ब्लॉक चेन टेकनॉलॉजी चे कौतुक संगणकीय तज्ज्ञ लोकांना वाटते. त्यात रूढ बँकेची गरज नाही (बँकेसारखे काम अंतर्जालावरचे संगणक विकेंद्रित पद्धतीने करतात) ह्या पद्धतीत व्यक्ती खरे नाव वैगैरे द्याची गरज नसल्याने फक्त संगणकीय पत्ता देऊन भागते. आणि पासवर्ड (किंवा त्याला इथे Private की ने डिजिटल सही केल्याशिवाय कोणी तुमच्या पैशाला हात लावू शकत नाही. सध्याच्या फंड ट्रान्सफर पेक्षा हे वेगळे कसे तर आपल्या नेहमीच्या हिशेब ठेवण्याच्या पद्धतीपेक्षा ह्या चलनाचे हिशेब ठेवायची पद्धती पूर्णतः: वेगळी आहे. समजा आपले आपल्या बँकेत खाते आहे नेहमीच्या बँकेत आपल्या नावापुढे आपल्या खात्यावरची रक्कम लिहिलेली असते आणि जेव्हा आपण त्यातून खर्च करतो तेव्हा ती कमी होते आणि कोणी आपल्याला रक्कम दिली तर ती वाढते. असे रेकॉर्ड बँकेत मध्यवर्ती database मध्ये ठेवलेले असते. आणि दरवेळी त्या मध्यवर्ती database मध्ये बदल होतात पण बिटकॉइन असा कुठलीही मध्यवर्ती माहिती ठेवली जात नाही. कोणत्याही व्यक्तीच्या नावापुढे एकत्रित रक्कम लिहिलेली मिळत नाही तरीही प्रत्येक जण आपल्याच रकमेतून खर्च करू शकतात आणि त्यासाठी बँकेचीही गरज नाही. हे करण्यासाठी जे संगणकीय तंत्रज्ञान वापरले जाते ते म्हणजे ब्लॉक चेन (ह्या डिस्ट्रीब्युटेड लेजरचे आणि ब्लॉक चैन टेकनॉलॉजी चे अनेक उत्तम उपयोग आहेत.पण तो स्वतंत्र लेखाचा विषय आहे)

पण बिटकॉइन मध्ये गुंतवणूक हा विषय इथे विचारात घेत असण्याने बिटकॉइन मध्ये गुंतवणूक केल्यावर वास्तव जगातून नफा येणार कूठून हे समजण्यासाठी बिटकॉइनचे विशेष ते काय हे समजून घ्यायला हवे. आणि नफा होण्यासाठी हे तंत्रज्ञान विशेष असे करते तरी काय? हे समजून घ्यायचा प्रयत्न करू
ह्या बिटकॉइन प्रणालीचे कामकाज वेगळे ठरते ते खालील मुद्द्यामुळे रूढ पद्धतीच्या अकाउंटिंग मध्ये कोणाकडे किती नोटा आहेत ह्याचा हिशेब ठेवला जात नाही किंवा त्या कुठे आहेत त्याचाही ठावठिकाणा बँकेला नसतो. कोणाच्या खात्यावर किती रुपये आहेत ह्याची माहिती बँकेकडे असते. बिटकॉइन आणि इतर क्रिप्टो करंसीत प्रत्येक सातोषी कुठे आहे (१ सातोशी म्हणजे बिटकॉइनचा १००००००व भाग) हा पै-पै चा पत्ता ठेवायचे काम संगणक एकत्रितपणे करतात त्याला मायनींग म्हणतात. वर सांगितल्याप्रमाणे ते काम केले कि तिथल्या अर्थव्यवस्थेत नवीन नाणी येतात.

मध्यवर्ती बँक नसताना फक्त आपल्या मालकीची नाणीच लोक कशा रीतीने वापरू शकतात प्रत्येक पत्त्यावर काही सातोशी किंवा नाणी सांकेतिक भाषेत नोंदवलेली असतात.ती फक्त स्वत:चा पासवर्ड देऊन डिजिटल सही केली कि ती नाणी क्लिअरिंग साठी ब्लॉकचईन रांगेत जातात. ती त्याच व्यक्तीची आहेत आणि तो दोनदा तीच वापरत नाही हे संगणकाने तपासून पहिले की व्यहवार पक्का होतो आणि तो व्यवहार ‘डिस्ट्रीब्युटेड लेजर मध्ये’ चिकटवला जातो. तो तिथून कधीच मिटवता येत नाही.

  1. व्यक्तीचा पत्ता (जो सारखा बदलता ठेवता येतो) त्यामुळे काहीसा निनावी व्यव्हार करणे शक्य होते
  2. बँकेची गरज काहीशी नसल्याने काही कायद्यांची पूर्तता न करता सरकारला कर घेण्यापासून (सध्यापुरते – कारण नवीन कायदे झाले कि ती मुभा जाईल) सरकारला चकवता येते
  3. लोकांनी लोकांसाठी चालवले नेटवर्क असल्याने फायदा झाला तर तो आपल्या संगणकीय बिरादरीतल्या भाऊबंधांचा होतो बँक कंपन्या (संगणक कुठून येतात वैगैरे विचारायला बंदी आहे बर.सातोशी बाबांचे भक्त अशा प्रश्नांनी भडकतात. आपल्याला प्रतिगामी मागासलेले आभासी जगातले गणित न समजणारे अडाणी समजतात) वगेरेचा फायदा होत नाही. बिटकॉइन हे भविष्यातले चलन असल्याने ते तुम्ही आज घेतले नाही तरी चालण्याजोगे असले तरी ते बिटकॉइन भक्त तुम्ही आजचे रुपये /डॉलर्स किंवा पौंड्स देऊन विकत घेऊन त्यांच्या सारखेच श्रीमंत बनावे अशी अपेक्षा धरतात. यासाठी ते मागच्या ७-८ वर्षांचा दाखला हि देतात.

ह्या बिटकॉइन विषयी त्याच्या अनेक मर्यादांपैकी उदाहरणार्थ पुढच्या मर्यादा तुम्ही त्यांच्यापुढे मांडल्या तरी ते सातोशी भक्त बाबांनी हे आधीच सांगून ठेवलेले आहे असे सांगतात (आपले बोकील गुरुजीच सातोशीचे अर्थशास्त्रीय सल्लागार आहेत असे मानायला जागा आहे.)

  1. बाजार भाव – ज्या १ कॉइन चा वापर करून तुम्ही १ दिवशी १ पिझ्झा विकत घेउ शकता किंवा तशाच एका कॉइन चा वापर करून २ महिन्यांनी जर कार विकत घेऊ शकता इतकि तफावत’विनिमयासाठी किंवा साठवणुकीसाठी हे चलन म्हणून बाद ठरते
  2. मायनर ने आपल्या हिशेबात लोकांना घ्यावे ह्यासाठी सध्यातरी खूप फी द्यावी लागते हि बिटकॉईन्स मधेच असल्याने ती तुम्हाला तुमच्याकडे बिटकॉईन्स नसली तर खूप महाग पडते (किंवा असली तरी) कितीही छोट्या रकमेवर जवळपास २५ डॉलर खर्च करायला लागतात !!!
  3. व्यवहार पूर्ण करायला लागणारा वेळ सेकंदाला संपूर्ण जगात मिळून जास्तीत जास्त ७ (सात) व्यव् हार म्हणजे डोंगर पोखरून उंदीर अशीच व्यवस्था आहे.VISA हि प्रणाली एक सेकंदात चोवीस हजार transaction हॅन्डल करू शकते ह्यावरून बिटकॉइन किती तुटपुंजे scalable नसणारे तंत्रज्ञान आहे
    ह्या साऱ्यामुळे बिटकॉइन (ब्लॉक चैन टेकनॉलॉजी नव्हे) पॉन्झी आणि पिरॅमिड स्कीमच्या हायब्रीड सारखी आहे. इथे पिरॅमिडचा प्रवर्तक कोण हेही ठरवणे अवघड आहे. वेगवेगळ्या देशाच्या कायद्याच्या कोणत्या कलमात कोणता गुन्हा बसतो किंवा ह्याला गुन्हा म्हणता येईल का काहीही ठरवणे ह्या आभास आणि सत्याच्या सीमारेषेवरच्या ह्या बिटकॉईन्स ने अवघड केले आहे.

त्या मर्यादा भविष्य काळात नाहीशा होतील आणि १ नाण्याची किंमत डॉलरच्या तुलनेत वाढत राहील असे ते मीडियातून सांगत राहतात आणि सामान्य आपण इंटरनेटवर सुंदर पिच्चाइ बिल गेट्स व्हायची संधी सोडली कि काय ह्या भीतीतून एखादे बिटकॉइन कुठून मिळते कि काय हे बघायला लागतो.
आता ही नाणी मिळवणे खूप दुर्मिळ असते (कारण सातोशी कोड नुसार साठा मर्यादित आहे ना) त्यामुळे काही जुने जाणते बिटकॉइनवाले तुम्ही सुद्धा त्यांच्या सारखे श्रीमंत व्हावे म्हणून त्यांची काही बिटकॉइन नाणी तुम्हाला विकतात –

बिटकॉईन्स (किंवा इतर क्रिप्टो करन्सी) प्राप्त करायचे लोकांकडे ३ मार्ग आहेत.

  1. लोकांनी व्यापारविनिमयातून ते मिळवायचे किंवा पगार बिटकॉईन्स मध्ये घ्य्यायचा…पण बिटकॉईन्स १००० एक लोकांकडे जवळपास ४०% बिटकॉईन्स असल्याने त्यांनी ती विकली नाहीत तर ती आपल्याशी व्यापार करणाऱ्याकडे किंवा पगार देणाऱ्या मालकाकडे येणार कुठून – तेव्हा सध्यापुरता तो पर्याय सामन्यासाठी दूरच
  2. किंवा स्वतः: क्रिप्टो-करन्सी खाणकाम करायचे – म्हणजे (कमीत कमी ३००००० लाख खर्च करून खूप जास्त क्षमतेचा कॉम्पुटर आणून ब्लॉक चेन validate करायचे संगणकीय बँक काम करायचे आणि खाण -मजुरासारखी किती मजुरी आपल्या नशिबी येते ह्याची वाट बघायची आपल्या साध्या संगणकाला ला घेऊन hardware बनवणाऱ्या कंपन्याच्या स्पर्धेत उतरायचे त्यातुन वीज संगणक खर्चाची वजावट वगैरे करून काही सातोशी सुटतात का ते पाहायचे (आता एकट्या दुकट्याने आभासी खाणकाम करायचे दिवस संपलेत त्यातून आपले मायानींग पूल मध्ये वैगेरे जोडून देऊन काही बिटकॉईन्स मिळतात का हे बघता येईल.
  3. किंवा तुम्ही बिटकॉइन आपली नेहमीची करन्सी देऊन ज्याच्याकडे ती आहे त्याच्याकडून विकत घेऊ शकता जी त्यांनी (म्हणजे त्यांच्या संगणकांची)आधी मेहनत करून आभासी जगात बनवून ठेवली आहेत ती ते तुम्हाला तुमच्या जुन्या पुराण्या डॉलर्स किंवा पौंड्स च्या बदल्यात विकतात. (जर ह्या चलनाला खरोखर ते म्हणतात तशी वाढती किंमत भविष्यात मिळणार असती तर त्यांनी आजच्या सरकारी चलनासाठी महाग – विशेष असे आभासी चलन विकले असते??
    समांतर आभासी जगातले श्रीमंत आता खऱ्या जगात श्रीमंत होऊ पाहत आहेत आणि आपले खऱ्या जगातले पैसे’युटोपियन स्वप्नामागे लागून’आपल्याला’आभासी जगात पाठवू पाहताहेत.

मग असे असताना हि क्रिप्टो -करन्सी ची क्रेझ का? बिटकॉइन ची किंमत वाढली. २०१७ जानेवरीला तुम्ही बिटकॉइन मध्ये १ लाख गुंतवले असते तर त्याची किंमत डिसेंबर मध्ये १९ लाख झाली असती सारख्या विधानांनी सामान्य माणसाला मोह पडला नाही तरच नवल. पहिले दोन मार्ग आपल्यासाठी बंद असताना आपल्याकडे त्यांनी तयार केलेल्या आभासी स्वप्नाचे’ग्राहक’ बनण्याशिवाय हा ३रा पर्याय घ्यायलाच हवा असा समज निर्माण करून देण्यामागे माध्यमांचा हात आहे. गणिती भाषा इकॉनॉमिक्स सदृश भाषेचा वापर ह्यामुळे ह्या करंसी चे पुरस्कर्ते वॉरेन बफेट जेमी डिमॉन ह्या सारख्या तज्ज्ञांचा सबुरीने घ्यायचा सल्ला डावलत आहेत.
जसा सोन्याचा साठा मर्यादित असतो तसाच बिटकॉईन्स चा पुरवठा मर्यादित केल्यामुळे होणार काय? किंवा प्रत्येक ट्रांसकशन असे ट्रॅक करायची गरज आणि किंमत काय? आणि लोकांची लोकानी विकेंद्रित पद्धतीने गणिती सूत्रांच्या आणि संगणकीय आज्ञावलीच्या साहायाने चालवली बँक असली तरी त्यात साठा मर्यादित राहत नाही पण परिणाम नक्की काय? ह्याचे कोणतेच अर्थशास्त्रीय उत्तर ह्या गटांकडे नाही क्रॉस-बॉर्डर हवाला सारख्या बहुतेक सगळ्या features ला सामावून घेणारी हि बिटकॉइन अर्थव्यवस्था असली तरीही सरकार विरोधी बंड सर्वसामन्याला करण्यात फायदा काय? कॅसिनोतल्या चिप्स हि क्रिमिनल्स लाखो रुपये काल्याचे पांढरे करायला वापरतात पण म्हणून त्याची किंमत लाखोंच्या घरात होत नाही) मग लोक अशी किंमत द्यायला का तयार आहेत? ह्याचे उत्तर ह्या सायबर-पंकांकडे नाही. हायसारख्या प्रणालीवर भविष्यातली ट्रांसकशन प्रोसससिंग व्यवस्था असू शकते पण सामान्य माणसाला ह्या चलनाला चलन म्हणून वापरण्यापेक्षा त्याचे वेगळे पण जाणून घेण्यापेक्षा झटपट श्रीमंत होण्याचे वेध लागले आहेत.
रोज नवनव्या क्रिप्टो -करंन्सी इंटरनेटवर येत आहेत इनिशियल कॉइन ऑफेरींग करून लोकांना आपल्या करंसीच्या मायनींग मध्ये घेऊन खरे पैसे उभे करायचे असे हे गणित करून आपल्या वेबसाइट वर क्लाऊड बेस्ड मायनिग (म्हणजे स्वत:चा कॉम्पुटर न घेता फी भरून)जर त्या वेब साईटच्या कंम्पुटर्स च्या हाती नाणी अली तर ती वाटून घ्यायची स्वप्न दाखवून डॉलर्स मधली फी घेतली जातीये. बिटकॉइनची एक्सचेंज बिटकॉईन्स आपल्याबरोबर त्याची हिस्टरी घेऊन येतात ती कायदा राबवणार्यांना समजायला अवघड जावी म्हणून आपाप्सा नाणी बदलून देणारे टॅमलिंग सर्विसेस सारखे नवे उद्योग ह्या आभासी जगात चालू आहेत.

२०००-२००२ च्या डॉटकॉम bubble सारखाच हा एक मेनिया आहे. माध्यमातून वाचलया जाणाऱ्या गुगल फेसबुक च्या प्रवर्तकांच्या यशोगाथा पाहून आपणही इंटरनेटवर ते करण्याच्या आवाक्यातले आहे असा गैरसमज लोकांचा होतो आहे चीनअमेरिका साऊथ कोरिया ने ह्या एक्सचेंजच्या नाड्या आवळायला आता सुरुवात केलीये. आणि त्याबरोबर तेजीत आलेले भाव खाली.
लोकांच्या विश्वासावरच हे क्रिप्टो -करन्सी चे जग चालू आहे. हवेतून काढलेले पैसे हे नवल आहे खरे लोकांनी हे चलन म्हणून स्वीकारले किंवा स्वीकारण्याची त्यांची इच्छा असली तरी ते शक्य नाही कारण ह्या बिटकॉईन्स च्या भावावर शिकागो कमोडिटी मार्केट मध्ये बिटकॉईन्स भविष्यकाळातील भावावर वायदा व्यवहार व्हायला आता सुरुवात झाली आहे (त्यामागचे लागेबांधे हा खूप खोलात जाऊन लिहायचा विषय आहे. ह्यात तुमच्या कडे नसलेल्या गोष्टीच्या भावावर तुम्ही financial प्रॉडक्ट विकत घेऊ शकता. ५ बिटकॉइनची किंमत ह्या पटीत चालणार हा वायदा व्यवहार. ह्या कमोडिटी exchange मध्ये बाकी मार्केट्स मध्ये इन्सिडर ट्रेडिंगचा शक्यता खूप कमी आहेत. ४० % बिटकॉईन्स जेव्हा १००० लोकांकडे एकवटलेली आहेत तेव्हा असे मोठे मासे त्यांच्या हवेतून काढलेल्या ह्या करंसीला फक्त क्रे इन् सायडर ट्रेडिंग होऊन (म्हणजे गोपनीय माहिती वापरून कंपनीतल्या /बँकेतल्या लोकांनी वैयक्तिक फायदा करू नये ह्यासाठी कायदे आहेत.) हे कायदे क्रिप्टो करन्सी ला लागू नाहीत. सध्याच्या किमतीतील फरक हा व्हेल्स (म्हणजे मोठे मासे – ह्याच्या हालचालीने bitcoin मार्केट मध्ये -खळबळ पोहोचते) च्या मार्केट मधल्या बिटकॉईन्स च्या नियंत्रणातुन येतोआहे. कॉमोडिटीज किंवा इतर चलनाच्या भावावर काही लोकांचे नियंत्रण ठेवणे (वेगवेगळ्या ग्राहक संरक्षक कायद्यामुळे शक्य नाही) सध्याची क्रिप्टो करणसी मार्केट हे नियंत्रणाबाहेर असल्याने हे काही लोकांच्या हातात एकवटलेलले आहे. भावाच्या वर-खाली जाण्याचा फायदा बघून वेळेवर विकले तरच फायदा व्हायची शक्यता आहे पण वाढत्या भावावर नजर ठेवून लोकांनी घेऊन ठेवलेली बिटकॉईन्स जेव्हा हा फुगा फुटेल जेव्हा ते मार्केट मध्ये काढतील तेव्हा हा फुगा फुटणार आहेचह्याच मार्केट मध्ये १९०५ साली intangible अशा वस्तूंच्या भविष्यातील बाजार भावावर फ्युचर आणि ऑपशन्स मध्ये भावाचे अन्दाज करायला बंदी घातली होती (कारण अशा गोष्टीवर बऱ्यापैकी नियंत्रण असते आणि future आणि ऑपशन्स चे मार्केट हे व्यापाऱ्यांना व्यापारातल्या रिस्क कमी करण्यासाठी मदत म्हणून चालवले जाते पुढे त्या बाजाराला सट्टेबाजाराचे रूप आले. कारण फायद्याची कधीही न संपणारी भूक) आज त्याच बाजारात आभासी जगातल्या चलनाचे खऱ्या जगातील आभासी भाव ह्या सारख्या अनियंत्रित गोष्टीचे भाव होणे हा किती मोठा दैव दुर्विलास आहे.
बिटकॉइनच्या आभासी जगात गुंतवणूक करून सत्यात करोडपती होण्याची स्वप्ने पाहणाऱ्यां साठी एक बोधकथा सांगणे इथे प्रस्तुत ठरेल.
एका गावात चिक्कार माकडं होती. एक दिवस एक व्यापारी गावात आला त्याने जाहिरात लावली – माकडं विकत घेणे आहे. दर १००० रुपये प्रति माकड. व्यापाऱ्याने एक मोठा वाडा भाड्याने घेतला त्यात माकडे ठेवायला सोयी करून घेतल्या. गावातील लोक अचंबित होऊन हा उद्योग पाहत होते. एका माकडावर हजार रुपये कोणी देईल यावर गावातल्या लोकांचा विश्वास बसत नव्हता तरी एका हुन्नरी गृहस्थाने एकअंगणात खेळणारे एक माकड पकडले व एका पिंजऱ्यात घालून ते व्यापाऱ्याकडे हजर केले. व्यापाऱ्याने तत्काळ दोन पाचशेच्या करकरीत नोटा या गृहस्थाच्या हातात टेकविलया. बातमी गावभर झाली. रिकामंटेकड्यांची गावात कमी नव्हतीच पण कामधंदे असणाऱ्या लोकांच्या तोंडसही या बातमीने पाणी सुटले. पुढील एका आठवड्यात लोकांनी झपाझप माकड पकडली आणि व्यापाऱ्यास विकली. पुढील आठवड्यात व्यापाऱ्याने जाहीर केले कि त्याला हवी तेवढी माकडे मिळत नाहीयेत म्हणून तो प्रति माकड २००० रुपये द्यायला तयार आहे. लोक उत्साहाने कामाला लागले. गावातली बहुतांश माकडे पकडली गेली फक्त काही अतिचतुर आणि सावध माकडे गावकऱ्यांच्या हातात लागली नाहीत. काही लोकांनी एकेका माकडा मागे दोन हजार कमविले. त्या रविवारी व्यापाऱ्याने जाहीर केले कि एवढे पैसे देऊनही तुम्ही लोक मला हवी तेवढी माकडे देत नाही आहात चला मी एका माकडाचे पाच हजार रुपये देतो. गावकर्यांना नवीन हुरूप आला. गावातली उरली सुरली माकडे शिताफीने पकडलीच पण आजूबाजू च्या गावातूनही लोकांनी माकडे पकडून आणली. व्यापाऱ्याने खरोखरच एकेका माकडाचे पाच हजार दिले. पण त्याची निराशा लपत नव्हती. त्याने जाहीर केले कि बाबानो मी एवढा पैसे द्यायला तयार आहे तरी तुम्ही एवढे ढिल्ले का पडताय? आणा कि दनादन पकडून. बर पाच हजार कमी वाटत असतील तर मी एकेका माकडामागे दहा हजार द्यायला तयार आहे. पुढचा एक आठवडा मी बाहेरगावी जातोय एक आठवड्याने परत येईन आणि तुमची माकडे दहा हजार ला एक या दराने विकत घेईन. आता कामात हयगय करू नका.
वाड्यात कोंडलेल्या माकडांची काळजी घ्यायला व्यापाऱ्याने एक विश्वासू नोकर मागे ठेवला आणि तो आपले काम आटोपण्यासाठी एक आठवड्यासाठी बाहेरगावी गेला. इकडे गावकऱ्यांची तारांबळ उडाली आता नवीन माकडे आणायची कुठून? पण व्यापाऱ्याच्या विश्वासू नोकरानेच मार्ग दाखविला. म्हणाला लोकहो या व्यापाऱ्याचं धंद्यात काही लक्ष नाही किती माल विकत घेतला याचे हिशेब ठिशेब मीच ठेवतो याला आत्ता वाड्यात एकूण किती माकडे जमा आहेत याचा काहीही पत्ता नाही. तर तुम्ही हि माकडे सात हजार रुपये प्रति माकड या दराने घरी घेऊन जा आणि पुढल्या आठवड्यात आमचे शेट आले कि तीच माकडं त्यांना दहा हजार रुपयाला एक या दराने विका. काहीही कष्ट न करता फक्त एक माकड आठवडाभर घरात बाळगून घर बसल्या तीन हजार रुपये कमविण्याची युक्ति गावकऱ्यांना पसंद पडली. हा हा म्हणता गावकर्यांनी या नोकर कडून जोरदार माकड खरेदी केली. लोकांनी कर्ज काढून पाच पाच माकडे वाड्यावरून घरी नेली. आणि पुढील सोमवारी व्यापाऱ्यास एकेक माकड दहा हजार रुपयास विकण्याचे स्वप्न पाहण्यात गुंग झाले. पुढचा सोमवार आला लोक रजा घेऊन व्यापार्याची वाट पाहत होते. पण व्यापारी उगवायची चिन्हे दिसेनात. अख्खा गाव आशेने वाड्यावर लोटला तर वाडा सताड उघडा नोकराचाही पत्ता नाही. दिवसभर लोकांनी वाट पहिली…. त्यानंतर त्या गावात आजतागायत ना व्यापारी दिसला ना त्याचा नोकर. गावकऱ्यां कडे घरात सात हजार रुपयास एक या दराने खरेदी केलेली माकडे उरली.

बिटकॉईनचे दर ज्या गतीने वाढत आहेत त्यावरून एकदिवस या बिटकॉइन धारकांची गत एक दिवस या सात हजार रुपयात एक निरुपयोगी माकड खरेदी करणाऱ्या गावकऱ्यासारखी होईल अशी भीती वाटतेपण काहीही म्हणा ह्या समांतर आभासी विश्वातले सातोशी बाबा ह्यांना मी मानलं बुआ पाहिजे कारण त्यांनी तर’आभासी- माकड’ लोकांच्या गळ्यात बांधली आहेत !!!

सुप्रिया सरकारनी वाणिज्य व संगणकशास्त्रातील मास्टर्स व व्यावसायिक अभ्यासक्रम विशेष प्राविण्यासह पूर्ण केले आहेत. त्या लंडन मध्ये राहतात. जगभरातील मोठमोठ्या कंपन्यास कर व कायदेविषयक सल्ले देण्याचा व्यवसाय त्या करतात. आंतरराष्ट्रीय व्यापार व करआकारणी हा त्यांच्या विशेष अभ्यासाचा विषय आहे

Write A Comment