fbpx
राजकारण

मुसलमान नावाच्या राक्षसाची गोष्ट

मुंबई हे देशातले सर्वाधिक कॉस्मॉपॉलिटन शहर म्हणून नावाजले जाते. या शहरात खूप मोठ्या संख्येने मुस्लिम राहतात. कित्येक पिढ्यांपासून त्यांच्या वस्त्या येथे आहेत. अशा शहरात (किंवा त्याच्या उपनगरात) राहणाऱ्या व एका शाळेत शिकणाऱ्या मुलामुलींचे हे उदाहरण आहे. पण ते जवळपास प्रातिनिधिक आहे. अंधेरी-वांद्रे-पवई अशा भागांमध्ये थोडे वेगळे चित्र आढळू शकेल. पण ते अपवाद म्हणूनच. ही हजारो मुले अशा वातावरणात तरुण होणार आहेत. त्यांचा मुस्लिम समाजाशी दुरान्वयाने कोणताही संबंध नाही. तो येऊ नये अशीच जणू कडेकोट व्यवस्था त्यांच्या अवतीभवती आहे.

राजेंद्र साठे

माझी मुलगी मुंबईतील बोरीवली येथील एका शाळेत शिकली. त्या शाळेत तिच्यासोबत गुजराती, मल्याळी, तमीळ, तेलुगू, हिंदी व क्वचित बंगाली अशी विविध भाषिक घरांमधून आलेली मुले होती. पण पहिली ते दहावी या दहा वर्षांच्या काळात एकही मुस्लिम मुलगा किंवा मुलगी तिच्या वर्गात नव्हती. तिच्या वर्गांच्या इतर तुकड्यांमध्येही  कोणीही मुस्लिम नव्हते. तिच्या शाळेचे जाडजूड व रंगीत वार्षिक अहवाल प्रसिध्द होतात. विविध स्पर्धा किंवा नाटकाबिटकांमध्ये भाग घेतलेल्या मुलांची नावे-फोटो त्यात प्रसिध्द होतात. पण मला त्यात कधीही मुस्लिम नाव आढळले नाही. ही शाळा कॉन्वेंट किंवा चर्चद्वारा चालवली जाणारी नव्हती. सीबीएसई अभ्यासक्रमाची होती. ज्यांची बदली देशभर होण्याची शक्यता आहे असे पालक अशा शाळांमध्ये मुलांना घालतात असे ऐकून होतो. पण त्या दहा वर्षांच्या काळात अपवादानेही असा एकाही मुस्लिम नोकरदार या शाळेकडे आलेला दिसला नाही.

मी राहतो त्या एका सोसायटीत 98 फ्लॅट्स आहेत. अशा एकूण सुमारे सात बिल्डिंग्स  आमच्या कॉम्प्लेक्समध्ये आहेत. म्हणजे सहाशे ते सातशे कुटुंबांचे गाव असावे असा आमचा परिसर आहे. आमच्या सोसायटीमध्ये सर्वभाषिक लोक राहतात. पण यात एकही मुस्लिम कुटुंब नाही. इतर सोसायट्यांमध्येही हीच स्थिती आहे. इथे फ्लॅट विकण्याचे व भाड्याने देण्याचे व्यवहार सतत चालत असतात. पण मुसलमानाला फ्लॅट विकायचा नाही वा मुस्लिम भाडेकरू ठेवायचा नाही हा अलिखित नियम आहे. लोक तसे उघडपणे बोलतात. तसा प्रयत्न कोणी केल्यास सोसायटीचे कारभारी त्याच्यावर या ना त्या मार्गाने दबाव आणतात. तुम्ही एजन्ट बरोबर जागा विकत घेण्यासाठी म्हणून मुंबई च्या उपनगरात  फिरलात, तर हा अनुभव हमखास येईल. एखादी सोसायटीचे गुणगान गाताना, ती कशी मोक्याच्या जागी आहे, मार्केट, हायवे, स्टेशन कसे जवळ आहे याच बरोबर – ‘नो एम फॅक्टर’ हा गुण आवर्जून सांगितला जातो. नो एम फॅक्टर म्हणजे इथे कोणीही मुसलमान कुटुंब राहत नाही

माझ्या मुलीचे मित्र-मैत्रिणी अशाच सोसायट्यांमधून राहतात. यातले काही जण तर फक्त गुजरात्यांच्या किंवा फक्त जैनांच्या अशा सोसायट्यांमध्ये राहतात. तिची एक मैत्रीण गौड सारस्वत ब्राह्मणांच्या सोसायटीत राहते. तिथे तर या ब्राह्मणांमधील विशिष्ट मठ मानणाऱ्यांनाच प्रवेश आहे अशी बोलवा आहे.

हे बहुतांश पालक उच्च मध्यमवर्गीय व व्यावसायिक आहेत. त्यांचे विचार हे हिंदुत्ववादाला अनुकूल असावेत असे त्यांच्याशी सहज बोलले तरी लक्षात येते. मुस्लिमांविषयी त्यांची मते काय असतील याचा तर्क करता येऊ शकतो.

या मुलांचे वाचन मर्यादित प्रकारचे आहे. हॅरी पॉटर वगैरे. त्यात मुस्लिम व्यक्तिरेखा येण्याचा प्रश्न येत नाही. माझी मुलगी मराठी वाचते. पण उध्दव शेळके, श्री. दा. पानवलकर, भारत सासणे, हमीद दलवाई या किंवा अशांच्या लेखनातील मुस्लिम पात्रांपर्यंत ती कधीतरी पोचेल की नाही याबाबत मला तरी शंकाच आहे. आणि अशा व्यक्तिरेखा व त्यांचा परिसर सध्या प्रचलित इंग्रजी साहित्यात आहे असे मला वाटत नाही.

ही मुले इंग्रजी, हिंदी, गुजराती, मराठी टीव्ही मालिका पाहतात. पण त्यातल्या कौटुंबिक मालिकांमध्ये चुकूनसुध्दा मुस्लिम पात्र नसते. ऐतिहासिक मालिकांमध्ये मुस्लिम असतात. पण त्यांचे चित्रण खलनायक म्हणूनच असते. त्याविषयी वेगळे कधी तरी बोलायला हवे.

ही मुले, अर्थातच, हिंदी सिनेमे पाहतात. त्यात त्यांचे आवडते हे रॉमकॉम किंवा हलकेफुलके रोमॅंटिक असतात. बहुतेकदा त्यातील पात्रांना आडनाव नसते. आणि त्यांची नावे सिद, राज, करण अशी असतात. ती हिंदू असावीत अशा रीतीने वागतात.

या मुलांना सर्वसामान्य मुस्लिम समाज, कुटुंबे यांची जवळपास काहीही माहिती नाही. त्यांचे राहणे-वागणे-बोलणे, खाणे-पिणे, भाषा, व्यवसाय, सण-समारंभ, धर्म, धार्मिकता याबाबत त्यांच्या डोळ्यापुढे वा कानावर कोणतेही साधेसुधे तपशील येत नाहीत. त्यातल्या त्यात गर्दीमध्ये येता-जाता दिसणाऱ्या बुरख्यातील मुली-महिला आणि मशिदीमधून कानावर पडणारी बांग यातूनच त्यांना मुस्लिमांचे अस्तित्व जाणवत असावे.

मुंबई हे देशातले सर्वाधिक कॉस्मॉपॉलिटन शहर म्हणून नावाजले जाते. या शहरात खूप मोठ्या संख्येने मुस्लिम राहतात. कित्येक पिढ्यांपासून त्यांच्या वस्त्या येथे आहेत. अशा शहरात (किंवा त्याच्या उपनगरात) राहणाऱ्या व एका शाळेत शिकणाऱ्या मुलामुलींचे हे उदाहरण आहे. पण ते जवळपास प्रातिनिधिक आहे. अंधेरी-वांद्रे-पवई अशा भागांमध्ये थोडे वेगळे चित्र आढळू शकेल. पण ते अपवाद म्हणूनच. ही हजारो मुले अशा वातावरणात तरुण होणार आहेत. त्यांचा मुस्लिम समाजाशी दुरान्वयाने कोणताही संबंध नाही. तो येऊ नये अशीच जणू कडेकोट व्यवस्था त्यांच्या अवतीभवती आहे.

आता या कडेकोट बंदोबस्ताच्या विरुध्द बाजूने होणाऱ्या माऱ्याचे चित्र पाहा.

वृत्तपत्रे व टीव्हीच्या बातम्या यामध्ये सदैव काश्मीर आणि पाकिस्तानची चर्चा चालू असते. पाकिस्तान हे शत्रूराष्ट्र आहे हे तर भारतातल्या प्रत्येक मुलाला आपोआप ठाऊक असतेच. मुले थोडी मोठी झाली की त्यांच्यासाठी पाकिस्तानच्या मुसलमान असण्याचा संबंध ठळक होतो.

काश्मिरी लोक मुसलमान आहेत व त्यामुळे ते देशद्रोहीपणा करीत आहेत असे तर आजकाल आपले अनेक टीव्हीवाले आणि काही पेपरवालेही सूचित करतात.

यांच्या जोडीला आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील आयसिस किंवा तालिबानी दहशतवाद आला आहे.

या सर्व बातम्या ही मुले बारकाईने वाचता-पाहतात असे नव्हे. त्या त्यांच्यापर्यंत वरवरच पोचत असण्याची शक्यता अधिक. पण त्यामुळेच उलट त्यातील गुंतागुंतीपासून ते लांब असतात. मुसलमान म्हणजे दहशतवाद अशी सोपी समीकरणे रुजायला जमीन तयार होते.

गेल्या दोन वर्षांपासून देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. ते आल्यापासूनचे अनेक विषय हे हिंदू आणि मुस्लिम अशी विभागणी करणारे आहेत. गोहत्या बंद करणे, गोमांसावर बंदी घालणे, धर्मांतराला अटकाव करणे किंवा हिंदूंना पुन्हा धर्मात घेणे, राष्ट्रगीतासाठी उभे राहणे, वंदे मातरम, अयोध्येत राम मंदिर उभारणे, देशात समान नागरी कायदा आणणे, काश्मीरचा वेगळा दर्जा रद्द करणे, मुस्लिम महिलांना तोंडी तलाकपासून वाचवणे इत्यादी…. अशी विषयांची यादी आहे.

हे विषय एकामागून एक आवर्ती पध्दतीने पुन्हापुन्हा येत राहतात. मुसलमान नावाच्या एका गटाच्या नाठाळपणामुळे हे विषय उद्भवले आहेत आणि त्यांना वठणीवर आणणे आवश्यक आहे, असा संदेश त्यामुळे दृढ होतो.

लहान मुलांच्या कार्टूनमध्ये अडाणी, हेकट आणि जाडा असलेला एक खलनायक असतो. उदाहरणार्थ छोटा भीममध्ये कालिया किंवा डोरेमॉनमधला सुन्यो. प्रत्येक भागात त्याला शिक्षा करणे आवश्यक ठरते. आपल्या देशातले राजकारण ही एक राजकीय महामालिकाच चालू आहे. त्यातल्या प्रत्येक एपिसोडमध्ये कारण बदलत राहते पण खलनायक एकच राहतो – मुसलमान. त्याला कोंडीत पकडून शिक्षा आवश्यक ठरते.

मुलांपर्यंत यातील सर्वच तपशील पोचत असतील असे नव्हे. किंबहुना ते पोचले नाहीत तरच बरे असतात. कार्टूनच्या पातळीवरच त्यांचे आकलन राहिले तर अधिकच बरे असते.

एकीकडे मुसलमान नावाच्या माणसाला कधीही पाहिलेले नसावे वा त्याच्याशी कधीही संबंध नसावा…. दुसरीकडे मुसलमान हा मागास, शत्रू, खलनायक इत्यादी सर्व काही असल्याचे येता जाता ऐकायला व पाहायला मिळावे…

यामुळे ते ऐकणाऱ्या-पाहणाऱ्याचे काय होईल याची कल्पना कोणालाही करता येईल.

पुण्यातले एक जुने उदाहरण आठवले. 1984-85 च्या आसपास अयोध्येत राममंदिरासाठी विटा जमा करण्याचा उद्योग विश्व हिंदू परिषदेने नुकताच सुरू केला होता.

पुण्याच्या कॉलेजांमधील तरुण त्यात सामील होऊ लागले होते. या कार्यक्रमांमध्ये सर्रास मुसलमानांविरोधात विष ओकले जात असे. पण त्यात सहभागी होणाऱ्यांपैकी बहुसंख्यांचे आयुष्य सदाशिव,नारायण, शनिवार पेठेच्या पलिकडे गेले नव्हते. त्यांचा कधी कोणा मुसलमानाशी असा वा तसा संबंध आल्याची शक्यता देखील नव्हती.

 

सर परशुरामभाऊ नावाचे प्रसिध्द कॉलेज आहे. त्यात मुस्लिम सोडाच ब्राह्मणेतर मुलेसुध्दा कमी संख्येने होती. ज्या सदाशिवरावभाऊच्या नावाच्या पेठेत ते होते तो निदान पानपतावर गेला होता. पण ही मुले स्वारगेटच्या पलिकडे घोरपडी पेठेत सुध्दा कधी गेली असण्याची शक्यता नव्हती. तरीही मुसलमानांविरुध्द त्यांची मते मात्र अत्यंत ठाम होती.

विशिष्ट प्रकाराने केल्या गेलेल्या प्रचाराचा हा परिणाम होता. नंतर यांच्यातील काही जण अयोध्येत मशीद पाडायच्या वेळेस चीअरबॉईज म्हणून गेले असे म्हणतात.  त्यातूनच पुढे देश पेटला. कायमची जखम झाली.

सध्या माझ्या डोळ्यापुढे असलेल्या शाळेतील मुलांबाबतीत पुन्हा हे घडते आहे.

असेही म्हणता येईल की, मुंबईतील बहुसंख्य मुलांच्या बाबत हे घडत आहे.

किंबहुना, महाराष्ट्र आणि देशातील असंख्य शाळां-कॉलेजांमधील मुलांबाबतही बहुधा हे घडते आहे.

किंबहुना, शाळेच्या बाहेर असलेल्या बहुसंख्य लोकांबाबतही हेच घडते आहे. अतिशियोक्ती करून बोलायचे तर असेही म्हणता येईल की भारतीय समाजात लैंगिक गोष्टींचे ज्ञान मुलांना जसे सांगोवांगीच्या गोष्टीतून, चोरीछुप्या पध्दतीने वा अतिरंजित स्वरुपात मिळते त्याच आडवळणी आणि विकृत रीतीने मुसलमान या विषयाबाबत बहुसंख्य हिंदूंची माहिती आणि समज घडत जाते. (त्यातून बचावतात ते सुदैवी.)

किंबहुना, असेही म्हणता येईल की, मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी घालावी असे म्हणणाऱ्या ट्रम्पला उचलून धरणारे सुजाण अमेरिकी आणि बोरीवलीतल्या शाळेतील अजाण मुले यांच्यात काहीच फरक नसतो.

खैर, अमेरिकेतले तूर्तास बाजूला ठेवू. पण आपल्या देशातील लोकांची समज आपल्याला सुधारून घेता येणे शक्य आहे.

पूर्ण देशाचेही जाऊद्या. सध्या महाराष्ट्रापुरते बोलू. या राज्यातील चिपळूण, कोल्हापूर, धुळे, परभणी किंवा अमरावती अशा विविध ठिकाणच्या मुस्लिमांची सध्याची स्थिती काय आहे, त्यांच्यातल्या तरुण, मुले-मुली, महिला, शेतकरी, कारागीर इत्यादींचे मानस काय आहे, त्यांचा काय शिकण्याकडे अधिक कल आहे याचे दर्शन आज कोणत्याही माध्यमांमधून आज घडत नाही.

तलाक, मुस्लिम आरक्षण किंवा अयोध्येचा प्रश्न निर्माण झाला की, शहरातील मंडळी पटापट आपापल्या भूमिका घेऊन मोकळे होतात. पण या प्रश्नावर गावागावातील मुस्लिमांचे म्हणणे काय आहे हे पुढे येत नाही.

गोहत्या बंदीच्या प्रश्नाबाबत मालेगाव किंवा अकोल्यात जाऊन मुस्लिमांसोबतच्या चर्चेचा कार्यक्रम करावा असे आपल्या मराठी वाहिन्यांना वाटत नाही. तशी गरज त्यांना जाणवत नाही.

उर्दू भाषा, मदरसे इत्यादीबाबत जागोजागची स्थिती काय आहे याबाबत क्वचितच वृत्तांकन होते.

नवीन आर्थिक धोरण, आयटी क्रांती, भाजपचे सत्तेत येणे यांचा मुस्लिम समाजावर काय परिणाम झाला आहे याबाबत एकही लेख कोणी लिहित नाही वा तशी बातमी टीव्हीवर दिसत नाही.

आपली नाटके, सिनेमे, साहित्य, मालिका इत्यादींमध्ये मुस्लिम या घटकाला आज जवळपास शून्य स्थान आहे. मोदींच्या आगमनानंतर इथल्या मुस्लिमांना प्रचंड मोठा राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक न्यूनगंड यावा अशी स्थिती आहे. किंबहुना, भाजपची तशीच इच्छा आहे. या अवस्थेची पुसटशी छायादेखील आपल्या माध्यमांमधील चर्चा किंवा कलाकृती इत्यादींमध्ये दिसत नाही.

उत्तर प्रदेशातील रोजचे थैमान आणि फुत्कार यामुळे इथल्या मुस्लिम तरुण-तरुणींची स्थिती अत्यंत बिकट होत असली पाहिजे. त्यांच्या दैनंदिन झगड्यांचे प्रतिबिंब आपल्या समाजव्यवहारांमध्ये कुठेच पडताना दिसत नाही. हे बदलण्याची गरज आहे.

त्यासाठी वर जे जे होत नाही असे म्हटले ते ते करण्याची गरज आहे.

माध्यमे, विविध संघटना आणि मुस्लिम तरुण तरुणीं यांनी ते केले पाहिजे. नव्हे ती त्यांची जबाबदारी आहे.

लेखक ज्येष्ठ पत्रकार असून विविध वृत्तवाहिन्या तसेच वृत्तपत्रातून त्यांनी काम केले आहे.

54 Comments

  1. Ejaj Ahamad Reply

    Sir you have rightly described the condition of Indian Muslims. But Muslims should fight for this injustice, as it was happened in US against racism. Unfortunately they don’t have a leader who is rational, they have leaders like Owaisi who lacks the integrity.
    The condition of Indian Muslims is better in some rural areas but it is worst in metropolitan cities. Muslims themselves are responsible for this. Many of them is having separatist tendencies with lack of education.
    There is absence of Indian Muslims intellectuals or they are in the state of idleness. Talking about injustice against Indian Muslims is a taboo in India.

    • Rightly said…its responsibility of muslim community that they should show maturity, their love for the country. On the contrary they seems irresponsible. If writer will roam around muslim populated area, he can see indiscipline behavior, dirt everywhere. Muslim community needs a leader who can guide them for better education, moral responsibility. Leaders like Owaisi are polluting the atmosphere.

    • Allan Gaekwad Reply

      Ejaj, you are quite right. Minorites have no national leader who can influence the government effectively. Lack of education and getto mentality is also responsibl.

    • Bhai u r cent per cent true. Muslims need to improve ourselves in every aspect. We shouldn’t forget we are representing islam whenever any muslim is doing something wrong then he is not only deteriorating his or her own image but also of Islam. Misbehavior /behavior of child shows his/her parents teachings same way islam is being judged on our contribution to the society in all the way. We need to show what islam is through our kind gestures and wellness with everything.

  2. Vidya Pathare Reply

    Why only Hindus are asked to be tolerant and secular? In predominantly Muslim countries pork is banned, rearing of pigs is banned, during Ramadan one cannot eat out during fasting period. Every religion, every section , every caste wants to safeguard their interests. In Rome do as Romans do they say, why hue and cry over this? Pakistan is not promoting vegetarianism or cow worship or sparing Hindus. Sometimes we need to understand we cannot get along , so don’t force. Muslims send their children to their type of schools so do Catholics . It’s Hindus who being more in number are seen in convents and other schools excepting Islamic schools. Learn to live and let live , no making special efforts to please anybody, definitely not the votebanks. If terrorists practice Islam it’s their wish , I don’t think we can do anything about it. Others are taught we are their enemies , then why force us to think they are our friends? What logic?

    • Absolutely correct! Why others should think about it if any particular community not interested in their better upbringing. Any parents would like to give their children better company. If at all we want secular fabric of this nation to be intact then efforts of upbringing should be equal by all.

    • That is not the case. I can give you a link where in Bahrain country,the government has denied to ban pork as it is against the non Muslim human rights. And about terrorism, terrorists have no religion. Even Islam says that killing an innocent person is like killing of the entire humanity. About Islamic school, I bet that you will change your mind once you come to know what exactly is taught their. And about Muslims, believe me that it is never taught. Even Islam says that humanity is your first religion. Then how can Muslims hate other religions and their followers? So please don’t get misunderstood.

    • जशी दृष्टी तशीच सृष्टी !! 🙂 खैर, दोष आपका नहीं आपकी नफरतोंसे भरी परवरिश का हैं ! Get well soon Madam Pathare 🙂

  3. Shivprasad Mahajan Reply

    मुलांचे सोडा, सर तुम्ही व्यक्तीश: प्रयत्न करून पहिला आहे का ? माझा अनुभव असा आहे की मुख्य प्रवाहात येण्यासाठी मुस्लिम मित्रांनी स्वतः विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहेत पण तसे होताना दिसत नाही. प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे स्त्रियांचे सार्वजनिक आयुष्य. एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमात माझे मित्र कुटुंबा सोबत येतात पण मुस्लिम मित्र बऱ्याचदा एकटाच येतो. याउलट मुस्लिम मित्रा कडे कुटुंबा सोबत गेल्यावर स्त्री पुरुष विभागणी होते हा अनुभव आहे. मोठ्यांची ही गत तर लहानांचा विचारच नको. यामुळे विशेष प्रयत्नांची गरज आहे.

    • रज्जाक शेख Reply

      बरोबर आहे सर तुमच मुसलमान धार्मीक दबावा खालीच जगत असतो हे मान्य परंतु तो सामाजिक नाही अस समजुनका. जर १९९२ आगोदर व त्या नंतर ची सामाजिक परस्थितीतील बदलांचा अभ्यास करा त्यात राजकीय, प्रशासकीय , न्यायालयीन यांच्या भूमिकांचा पन विचार करा . अस्या परिस्थितित अविश्वास व असुरक्षितते च्या भावनेत वाढ होनार की नाही ?

  4. Inayatali Manure Reply

    An eye opening million dollar article…..

    Alas! Will majority of the society accept this truth?
    No, not at all…. I bet people will call the writer traitor, fecular, etc.
    But i will call him my brother, a soldier of the humanity proudly… hats off

  5. शरद शेवडे Reply

    मोदी आत्ता आले . ६० वर्षे गांधी , नेहेरू राज्य करीत होते . त्यांनी तर ६० वर्षे हिंदूंचे अपमान करत मुस्लीम तुष्टीकरण केले . मग हा मुसलमान मुख्य प्रवाहा पासून लांब का राहिला ? मोदी आल्या नंतर फालतू तुष्टीकरण बंद झाले हे साठ्यांच्या पोटात दुखतेय का ? कि पत्रकाराने असेच लीहाहायचे असतेका ?

  6. Shriniwas Kalantry Reply

    In fact there is wide gap in communication and understanding between Hindhus and muslims or between any other community and muslims .muslims dont mix with others ,carry minority complex ,remain either in fear or in aggressive mood .The community has got professionals ,professors ,burocrats and businessmen .If these people take some initiative the matter will be eased .The business must take lead ,as they know other communities better than others and dont have vested interests in keeping their community segregated ,
    Take Pak issue .The acts of that country does not do anything good for Indian muslims .However they make appeal in name of religion to exploit them sentimentally .These things should be understood .

  7. अमित विभांडीक Reply

    लेख अप्रतिम आहे, ह्या विषयावर अधिक जागृती हवी सर, माझे स्वतःचे 3,4 मित्र आहेत शाळेपासून, पण मला ते कधीच वेगळे वाटले नाहीत. धन्यवाद

  8. चंद्रकांत पाटील Reply

    सर,
    अप्रतिम लेख…

  9. अभ्युदय रेळेकर Reply

    जळजळीत वास्तवदर्शी लेख…..

  10. एम ए वाजिद मोमिन Reply

    मुस्लिम समाजाची आर्थिक व सामाजिक परिस्थिती चे यथार्थ चित्रण करून एक उत्कृष्ट वैचारिक लेखन केले बद्दल मनापासून धन्यवाद

  11. Wasim Tamboli Reply

    That is real fact but no body want to share it coz some opl think it is against Hindu religious.

  12. Faruk Gavandi Reply

    साठे सर…आपण मानवतावाद आणि विवेकाचा अँगल धरून एका राक्षसाची गोष्ट सांगितली म्हणूनच ती राइटच आहे…हजारो वर्षांपासून आपल्या देशात शुद्र,दानव,राक्षस म्हणून कत्तली चालू आहेत…त्यांच्या कत्तलखान्यात नवीन राक्षसाची भरती झाली आहे इतकंच…कत्तलीच तत्वज्ञान तयार करण्यात त्यांचा कोणी हात धरू शकत नाही…गरज आहे ती सर्व राक्षकांनी एकत्र येण्याची…

  13. ZUber Habib Khan Reply

    *हम आह भी भरते है तो हो जाते है बदनाम वो क़त्ल भी करते है तो चर्चा नहीं होता।*

    साठे जी आपन मुस्लिम समाजा बद्दल केलेले लिखाण वास्तवाला धरून आहे. Muslim समाज बद्दल ज्या भ्रामक संकल्पना आज जिवंत आहे त्याचे अतुलनिय वास्तववादी वर्णन आपण केले आहे..इतिहासाचा विपर्यास करुन् सुरवाती पासूनच मुस्लिम सामाजाला खलनायक रूपाने प्रस्तुत करण्याचे काम काही कथित उच्चवर्नियांनी मोठया शिताफिने केले आहे। जो पर्यन्त या देशात डॉ बाबा साहेबांच्या संविधानाचे निरपेक्ष न्याय प्रणाली चे अस्तित्व आहे तो पर्यन्त समाजात दुफळी माजवणाऱ्ऱ्यांचे अधिराज्य कधीही येणार नाही। आपण अतुल्य लेख लिहिल्या बद्दल आपले मनापासून अभिनन्दन।। जय हिन्द

  14. Sir,
    I m very happy this kind of discussion. Though it is true. But my side my father has put me in vernacular medium from English medium. He want me understand culture and respect about other communities. I believe nature and bless of Faith in spiritual lead everything will be beautiful.

    Believe and keep praying. Happpy Ramadan.

    • Asif,
      Why are you saying keep praying? if someone does not pray that means he is Kafir and he has no right to exist?

      Stop spreading your sugar coated propaganda,,,

  15. एकांगी लेख आहे, काश्मीर मध्ये जेवढे ,मुस्लीम आहेत त्या ठिकाणी सर्व हिंदू ठेऊन पहा, आज काश्मीर अस्थिर दिसला नसता! माझ्या वर्गात ३-४ मुस्लीम मित्र होते ते सगळ्यांमध्ये कधीच मिसळत नवते, काय अडचण होती? अर्थातच कॉलेज मध्ये कोणी दुजाभाव करण्याचा प्रश्नच नव्हता उलट बाकी लोकं त्यांना सगळ्यांशी बोलायला भाग पडायचे तरीपण ते कधी म्हणावं असं मिसळले नाहीत.

  16. Ejaj Ahamad Reply

    As expected. Some people think that Muslims are playing victim card. Unfortunately they are not playing any card. In today’s India I have seen whenever this topic come into the focus majority of Hindus will deny the injustice happening in India against Muslims. No one is ready to talk about Adv. Shahid Azmi murder case, Hashimpura, Malegaon Bomb blast, Makka Mosque bomb blast and counting.
    I have read the comments and one comment is interesting where someone is appealing to Muslims to show their love for India. I want to ask why ‘Muslims’ needs to show patriotism?
    Unfortunately we are lacking the understanding of Indian culture.
    Not only Muslims themselves but majority community is also responsible for the alienation of muslims.

    • Is it common or just one particular community? I feel these things are common in this country and are not against one particular community. If you agree – we should stop treating this as communal bias but a system which needs improvement.
      Polarization starts when we dont see common pattern across and feel we are targeted.

  17. नरेंद्र Reply

    तुम्ही स्वतः मुसलमानांची मानसिकता अनुभवली आहे का? मदरसांमध्ये काय शिकवतात हे पहिले आहे का? मुसलमान बहुल भागात हिंदूंबद्दल काय धोरण असते हे अनुभवले आहे का? त्याचे कोणतेही प्रतिबिंब या लेखात नाही.

    • आपने कौनसे मदरसोंमें दाखिला लिया हैं जनाब ?? कभी व्हिजीट भी किएं हो ?? बस सुनी सुनायी बातें और दिल आपके मैलें ! जरा अपने दिल के मैल भी साफ करना

  18. Sarfraj sanadi Reply

    राजेंद्र साठे सर ,
    अत्यंत वास्तववादी लिखाण आपण केले आहे …
    आज जी परस्थिती निर्माण होत आहे ती फक्त मुबंई पुरता मर्यादित न राहता ,छोट्या शहरां पर्यंत पसरू लागली आहे …मुस्लिम एका बाजूला आणि इतर धर्म एका बाजूला पाडण्यासाठी जणू अघोषित पद्धतीने षडयंत्रच सुरू आहे . असे सष्ट दिसत आहे .. देशात असो किंवा जगात कोठेही दहशतवादी कारवाई झाली की .. भारतातल्या मुस्लिमाकडे तुम्ही पण त्या मध्ये सहभागी आहात अश्या नजरेने पाहिले जाते..आणि तसाच दृष्टिकोन मुस्लिमांच्या बाबतीत ठेवण्याचा एक कलमी उद्योग तरूण पिढी मध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे…आणि यामधून भारत मध्ये या घटना वाढीस लागत आहेत असे मला वाटते ..पण या सर्व गोष्टींना केवळ कट्टर हिंदुत्ववादीचे जवाबदार नसून मुस्लिम समाजातील नेते , कट्टरपंथीयही तितकेच जवाबदार आहेत .. हे अगदी शंभर टक्के खरे आहे ..

  19. Article is great.
    If you find Muslims in village areas, they are in very perfect harmony with Hindus or complete village. But in cities there is big difference.

    I feel Muslim people are bit emotional.
    Recently I had encounter Religious Muslim person, there basic principle are so different than what is propagated.

    Very clear article focusing on how Hindu attitude and Muslim attitude unknowningly the reason for tensions.

  20. Ramesh Patil Reply

    Prejudices. Yes, they exist. But not purely out of ill intentions on part of the majority, ie Hindus. 1. The Christian community is even more disadvantaged. Many of its neo converts come with a socio-economic baggage. Yet, Chrisitian youth are well employed, educated and even the high school dropout finds a job. So it isn’t a case of majority deriding a minority. On other hand, Muslim culture as seen or heard via Urdu and it’s poetry and in manners of speaking, dress, textiles are emulated by everyone.even eugolised to an extent that makes feel if ever there is any high Hindu culture. 3. Muslims lay ..And more so now, enormous emphasis on exuaivity, a separateness based on purely scriptural inputs, tht lays stress on being told by their religious leaders that they are better, godly, without stain, blameless, Gods chosen people, with emphasis on purity of their religion and practises. Avoiding Shirk or pollution by diluting any Quranic pinciple ( eg marrying a non Muslim, women going out to work, sticking to Muslims etc) has become the more stricter norms being drilled in. Religion is the end game for a Muslim. That leaves a lack of urge to adjust, change and transform. Islam is in need of reform. And not the supposedly negative attitudes of non – Muslims towards Muslims.

    4. For most Muslims, community has become the leit motif. And not the wider world. In a sense, what its own community says matters to Muslims than what others might say. That is a ghetto mentality, observable outside India too.

    5. Women are held under a sort of prison, with mixing with others and izzat being the most important. Can Mr Sathe touch upon these. How far can the outside world help a group that choses more and more to retreat itself into its own cave, all out of fear of the other..And all for th sake of religion.?

  21. धनंजय कंधारकर Reply

    उत्कृष्ट लेख आहे. अतिशय वास्तववादी मांडणी केली आहे. जे खरे आहे तेच मांडले आहे. एकूणच अतिशय बेजबाबदार विधाने विशेषतः मुस्लिमाबद्दल होत असतात. याचे खरोखर वाईट वाटते. आपला देश सर्वांना एकत्र घेतले नाही तर कधीही प्रगती करणार नाही हे लक्षात ठेवले पाहिजे.

  22. Firdaus sayed Reply

    Sir ,I as a Muslim of this is rather thankful to u for ur thoughts & ideas ,lete tell u I was brought up in a Cosmopolitan environment in Pune,studied at jnana prabodhini vidyalaya Pune,
    Sir the media has played a spoil sport & portrayed Muslims in a wrong manner. We need people like u you make this society, understand ,that we r Indian Muslims
    People ask me ,how r u so fluent Marathi r u Maharashtra?Yes I am ,my question is why a Muslim cannot be Maharashtraian,when a Muslim from Kerala can call himself a mallayalee then why not us. Thank u sir for ur views on our community,hopeif all join hands together,India will be a better nation to live in. Jaihind
    E

    • We have to change our angle , I think very injustice is being happened with Muslim right from last 60:years
      Must think to change

  23. Deorao Bakde, New Delhi Reply

    श्री साठेंचा लेख सुन्दर आहे. मुस्लिम समाजाने संकोच सोडून ‘भारतीय प्रवाहात’ मिसळणे ही काळाची गरज आहे. बरेचदा अनुभवलं आहे, रामकृष्ण आश्रम, स्वामी विवेकानंद जयंती निमित्त सर्वधर्म परिषद वा परिसंवाद आयोजित करतात. मुस्लिम वक्ता हमखास inveriably सर्वप्रथम बोलण्याचा आग्रह धरतात, व दुसरा वक्ता बोलण्या आधीच, कामांचं निमित्त सांगून, व्यासपीठावरुन पळ काढतात. ह्याचा अर्थ एवढाच की दुस-यांचं कांहीं ऐकणं नकोय् . भारतीय मुस्लीम समाजाने आपलं वर्तुळ विस्तारायला हवं.

  24. श्रीधर खेर Reply

    गावोगावी पूर्वीपासून सर्व धर्माचे लोक एकत्र रहात. सगळ्या सणात सामिल होत. यांच्यात फूट कोणी पाडली? अर्थातच राजकारण्यांनी. त्यांच्या संकुचित आणि स्वार्थी व्रुत्ती मुळे आज समाज विभागला गेला.

  25. अप्रतिम लेख है Sir, मै पूरीतरह से सहमत हु की मुस्लिमो की प्रतिमा वास्तव मे कम पर कल्पना में ज्यादा ख़राब कर के रखी है. उन्हें ऐसा बना के रखा है की वह बहुत ही कट्टर होते है, सभी लोगो का द्वेष करते है.

    पर जो कहते है काफिरो को मारो, और जो कहते है मुल्लो को मारो, वो दोनों एक ही हुवै। पर अब स्तिथि ऐसी हो गई है की काफिरो को मारो वाला आतंकी है और मुल्लो को मारो कहने वाले देश प्रेमी। पर वास्तव में दोनों इस दुनिया के लिये ख़राब है। ये में इस लिए कह सकता हु की, मेरी स्कूल की सारी पढ़ाई RSS प्रणीत स्कूल में हुई. में १२ तक संघ की शाखा में जाता रहा. पर संघ के कुछ कार्यक्रमों में जो मुस्लिमो का वर्णन किया जाता था, उसमे, और वास्तव में, वो मुझे कभी वैसे नजर नहीं आए।

    मेरा बचपन जिस मोहल्ले में बिता वहां हिन्दुओं के ३, जैन का १ और मुसलमानों के १२ घर थे पर हमें वहा कभी कोई तख़लीफ़ नहीं हुइ यहाँ तक की बाबरी मस्जिद / राम मन्दिर के दंगो में भी हम बड़े आराम से रहे.

  26. जोपर्यंत धर्माचा (कुठल्याही) ‘पवित्र’ आणि ‘unquestionable’ status काढला जात नाही, तोपर्यंत या समस्या कदापि सुटणार नाहीत. फक्त monotheistic नाही, कुठलाही धर्म दुसऱ्या धर्माबरोबर incompatibleचं असतो. प्रत्येकाला तो ज्या धर्मात जन्मला, तो धर्म Greatचं वाटतो.
    Logical thinking आणी humanity यांना, धार्मिक पुस्तकं किंवा ‘so called संस्कृती’ च्या वर preference दिला पाहिजे. धर्माचं obligation किंवा compulsion (स्वतः स्वतःवर लादलेलं सुद्धा) गेलं की, सर्व काही सुरळीत होईल. लहान मुलांवर (आणि मोठयांवरही) धार्मिक संस्कार आणि brain washing करणं बंद केलं पाहिजे. लोकं फक्त style म्हणुन दाढी किंवा शेंडी ठेवतील, तो शुभदिन. किंवा Meditation त्याच्या मानसीक फायद्यांसाठी करावे, उगाचं धर्माचा किंवा कुठल्या देवाचा संबंध त्यात लावु नये.
    थोडक्यात – solution निघणं almost impossible आहे, कारण सर्वचं धर्म उलटे मागे जात आहेत – कुणाला हिंदूराष्ट्र पाहिजे तर कुणाला शरीया.

  27. very impressive write mr sathe .. i really appriciate the way subject has put fourth , even hindus are living in same situation especially when it comes to legal rights , we see lot of discrepency in morals and laws as it was always expected that only HINDU should be liberal and should adjust , dont you feel that pepole are using the so called weaker portion of the societey as weapon to invade proxy war ??? unless and until we unite as nation its not possible .. and please do not blame modi goverment for same as i was impressed with starting write up but on later part you also become judgemental and come to conclusion after all its open ended discussion … i really like the way subject has introduced much needed for harmony among my all brothers .

  28. प्रमोद मुजुमदार Reply

    आपल्याच भोवतीचं आक्रमक आणि अंगावर येणारं वास्तव!
    कधी वाटतं गरज आहे ती कृत्रिम वाटलं तरी मदरशांना मशिदींना भेटी देणं, हिंदूंना घेऊन इफ्तार मधे सामील होणे असे कार्यक्रम सुरू करायला हवेत.
    राजेंद्र साठेंचा लेख उत्तम!
    प्रमोद मुजुमदार

  29. रणजित देशमुख Reply

    सर तुमच्या लेखाचा आशय खरंच महत्वपूर्ण होता पण सगळीकडेच अशी परिस्थिती आहे असं काही नाही. मी ज्या ठिकाणी लहानाचा मोठा झालोय तिथे असे विचार पन आमच्या डोक्यात कधी येत नाहीत, कारण व्यवसायाने खाटीक असलेला युसुफभाई सकाळी 8 वाजता कधी कधी आमच्या हॉलमधील सोफ्यावर चहा पित असतो, आषाढी वारीच्या निमित्ताने घरी येणाऱ्या दिंडीला चहा वाटण्याचं कामही त्यांच्यासारखेच अनेक जण करतात आमच्या इथे. रमजान च्या महिन्यात एक दिवस तरी उपवास सोडायच्या वेळेस आमच्या घरातील सर्व जण मशिदीमध्ये जाऊन विविध पदार्थ वाटतात. दिवाळी ला न चुकता मुस्लिम, ख्रिश्चन यांच्यासाठीही तेवढेच फराळाचे पदार्थ बनवले जातात. मुस्लिम, ख्रिश्चन यांच्या सर्व रूढी परंपरा मला माहित आहेत अगदी जन्मल्यापासून ते मरेपर्यंत.
    आणि मला अभिमान आहे की मी अश्या सोसायटी मध्ये राहतो

  30. Pingback: MOST YOUNG INDIANS ARE GROWING UP SANS ALL TOUCH WITH MUSLIMS | Caravan Daily

  31. Uttam lekh…, Once upon a time Muslims got the opportunity when Late Hamid Dalwai was there, but at that time they tried to underestimate him and tried for personal law board. Radical hindu and muslims will unite and finished the secular Indians for their personl gain.

  32. शुक्रिया साठे सहाब ! आपने सच्चायी से रूबरू करवाया ..लेकीन क्या करें कुछ लोग आज भी आंखोपे पट्टीयां बांधे हुए हैं ! I came across a very hostile reply “As Why are you saying keep praying? ” कुछ लोग बेववजह भी काफी बार तुफान उठा देते हैं .. दिल के मैले लोग वही पढतें हैं जो वोह पढना चाहते है और फिर उसीको तोड मरोड के पेश करते हैं ‘ people only read or hear what they want to hear. यह संघीयोंकी घिनौनी मानसीकता हैं इस मुल्क के जख्मोंको नासूर करके हि दम लेगी ‘ Pray for our country !

  33. I would like to translate this article in Hindi / Urdu ..Can I Sathe Sahab ??

  34. Thanks a lot. Simple and beautiful language used to reveal harsh truth, which shows hidden inferior and highly backward perspective of so called Modern Indians. It will never let India to be a part of development, let alone becoming a superpower. Dr. Taj Ladaf

  35. Pingback: The story of the devil called Muslim: Straight from the horse’s mouth | TwoCircles.net

Write A Comment