आपल्या देशात दररोज काही ना काही विनोदी बोलण्याची स्पर्धा असल्यासारखे काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व पक्षीय नेते, लोकप्रतिनिधी वगैरे शाब्दिक ओकाऱ्या करत असतात. भिडे नावाचा स्वतःला गुरुजी म्हणवणारा एक कुणीतरी म्हातारा आहे म्हणे. त्याने शालेय जिवनात वाचलेली एक जादूची कथा स्वतःच्याच नावावर खपवली. की म्हणे त्याच्याकडे एक आंब्याचे झाड आहे.…
भीमा कोरेगावच्या ऐतिहासिक लढाईला यावर्षी दोनशे वर्ष पूर्ण झाली. गेली दहा वर्षे भीमा कोरेगावला जमणाऱ्या अनुयायांच्या संख्येत दरवर्षी वाढ होतच आहे, यंदा दोनशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नेहमीपेक्षा जास्तच गर्दी होणार हे उघड होते, त्यातच सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या (गोवंश-हत्याबंदि, दलित विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि संविधान बदलण्याच्या वल्गना) दलित विरोधी पावलांनी…