ऊसतोडीचा हंगाम सुरु झाला की ऊसतोड कामगारांचे तांडे आपापले कोयते घेऊन पोराबाळांसह निघतात. दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील कामगार पक्ष्चिम महाराष्ट्राच्या दिशेने स्थलांतर करतात. मराठवाड्यातल्या गावागावांमधून, वाड्यावाड्यांमधून मजूर साखर कारखान्यांची दिशा पकडतात. नवराबायकोच्या जोडीला कोयता म्हणजे मजूरी जास्त मिळते. त्यामुळे नवराबायको दोघेही निघतात. साहाजिकच दहा वर्षांच्या आतली लहान लेकरंही त्यांच्याबरोबर असतात.…
Tag