‘देशात व राज्यात सध्या सरकार नावाची यंत्रणा लुप्त पावली असून ‘व्यक्तीपुजकांच्या संघांची जोरदार परेड सुरू आहे. कितीही नाक कापलं तरी भोकं जाग्यावर आहेत. घसा कोरडा करून आक्रस्ताळी नकारात्मकता’ लादण्यात हे व्यक्तिपुजक संघ अहोरात्र कष्ट घेत आहेत. या व्यक्तिपुजकांची लाडकी व्यक्ती ‘बालिश’पणाच्या गर्तेत रूतल्याची साक्ष देत असतानाही ‘आमचा अभिमन्यू…
मराठी चित्रपटांतून मराठा समाजाचा पाटील किंवा सरपंच ज्या प्रकारे क्रूर, बलात्कारी व भ्रष्ट दाखवलाय तीच मराठा समाजाची खरी प्रतिमा समजून माध्यमांतून या मोर्चाविषयी लिखाण होतंय. वास्तवातला पाटील, देशमुख आज गांजलेला आहे, शेती पिकत नसल्याने तो हलाखीत आहे, तो सावकार नाही तर सावकाराच्या पेढीवर व्याज भरणारा आहे हे समजून…
सर्व भाषणे तारस्वरात केली गेली. त्यात आवेश होता. परंतु विषयाची जाण नव्हती. मोर्चा संपला. परतीच्या प्रवासात सात आठ जण अपघातात मृत्त्यू पावले. अपघाती मृत्यू झालेल्यांसाठी शासनाला जबाबदार धरण्याचा विनोदी प्रकारही झाला. त्या मृत्यू पावलेल्या लोकांच्या कुटुंबियांना मराठा मोर्चाकडून काही मदत देण्यात येणार आहे की नाही हे मात्र कळले…