असं म्हणतात की, आकडे खोटं बोलू शकत नाहीत. त्यामुळे बँका, आर्थिक व्यवहार यांतील फसवणूक कधीना कधी उघडकीस येतेच. पण जिथे भाजपचं सरकार आहे तिथे आकडेही खोटेच दाखवले जातात. तीन वर्षांपूर्वी मेक इन इंडिया आठवडा साजरा केल्यावर गेल्या तीन दिवसांमध्ये महाराष्ट्र सरकारने मॅग्नेटिक महाराष्ट्र हा तीन दिवसांचा एक गुंतवणूक…
महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी वर्तमानपत्रांमधल्या ‘महागुंतवणुकी’च्या बातम्या वाचून ऊर भरून आला. ‘महागुंतवणूक’- मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत राज्याची आर्थिक मुसंडी, देशात महाराष्ट्रच नंबर वन!, राज्यात ७०,३२५ कोटींच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव, एक लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेची महाराष्ट्राची क्षमता! वगैरे वगैरे. खरंच क्षणभर कर्जबाजारी नुकसानग्रस्त शेतकरी, संपकरी एमपीएससी परिक्षार्थी, विरोधकांचा…