केंद्र सरकारने जाहीर केलेले २० लाख कोटींचे पॅकेज वाचून भारताच्या अर्थव्यवस्थेत कोणत्याही प्रकारचे उत्साहाचे वातावरण दिसत नाही. मुळात नोट बंदी व इतर कारणांमुळे घसरणीला लागलेली अर्थव्यवस्था करोनाच्या साथामुळे जाहीर कराव्या लागलेल्या लोकडाउन नंतर अक्षरशः मृतवत झाली. तिच्यामध्ये जान फुंकण्याची अपेक्षा या पॅकेजकडून होती परंतु तसे होईल अशी परिस्थिती…
एक आटपाट नगर होते, सध्या तिथे राहणारे नगरजन फार काही विद्वान-बीद्वान नसले तरी त्या नगरीत, अनेक पिढ्यांपूर्वी राहणारे त्यांचे पूर्वज, फार म्हणजे फारच विद्वान होते असा त्यांचा समज होता. गावातून येणाऱ्या-जाणाऱ्यांना ते आपल्या पूर्वजांच्या विद्वत्तेच्या गोष्टी सांगून ते गपगार करीत. आजूबाजूच्यादुसऱ्या नगरात दिसणारी, आजच्या लोकांची विद्वत्ता, त्यांच्या पूर्वजांच्या…