fbpx
Author

संध्या नरे-पवार

Browsing

गांधीबाबा आलेत. आपल्या १५० व्या जयंतीवर्षाचा प्रारंभ सोहळा पाहत सगळीकडे झाडू मारत फिरत आहेत. महात्माच ते. त्यांना स्वच्छतेची केवळ आवडच नाही तर स्वच्छतेचं तत्त्वज्ञानच त्यांनी तयार केललं, त्यामुळे नव्याने हाती आलेला झाडू आवडला त्यांना. झाडायला घेतलाय त्यांनी एकेक रस्ता. २०१४ मध्ये सत्तेवर आल्यावर भाजपा आघाडीचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी…

केले एखाद्याने मनुस्मृतीचं समर्थन तर तुम्ही एवढी तीव्र प्रतिक्रिया का देता? अशा पुराणमतवादी लोकांकडे दुर्लक्ष का करत नाही? आपला वेळ का वाया घालवाता? असे काही प्रश्न मनुस्मृती समर्थनाच्या विरोधात लेख लिहिल्यावर कायम विचारले जातात. ही मंडळी स्वतःला सजग, आधुनिक मानत असतात. मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी मनुस्मृतीचे समर्थन…

या देशातल्या काही घटकांना विषमतेचा पुरस्कार करणारी मनुस्मृती ही श्रेष्ठ वाटते, देशाच्या लोकशाहीवादी घटनेपेक्षा अधिक महत्त्वाची वाटते, हे उघड गुपित आहे. ती त्यांना तशी वाटते म्हणूनच या देशात विषमतेवर आधारित चातुर्वण्य व्यवस्था शतकानुशतकं टिकून राहिली, अस्पृश्यतेचं हीनत्व समाजाच्या सर्व अंगात भिनलं. देशाला स्वातंत्र्य मिळालं, समतावादी घटनेवर आधारित राज्यव्यवस्था…

गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यापाठोपाठ ५ मार्चला झालेल्या ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळ्यातही सेक्शुअल हॅरॅसमेंट विरोधातल्या मी टू मोहिमेचा पुनरुच्चार झाला आणि विविध सेलिब्रिटींनी या मोहिमेला जाहीर पाठिंबा दिला. लैंगिक शोषणाविरोधात मी टू असं म्हणत आणि पुरुषसत्तेला टाइम इज अप असं बजावत हालिवूडमधल्या अभिनेत्री एकत्र आल्या आहेत आणि जगभरातल्या…

” तुम्हाला काहीच कसं हो वाटत नाही? आम्हाला किती त्रास होतो तुम्हाला दिसत नाही का? चौथीनंतर आमच्या गावात शाळा नाही. तासभर चालत आम्हाला शाळेत जावं लागतं. रस्ते चांगले नाहीत, बस नाही. शाळेत इमारत नाही, पाणी नाही…तरी आम्ही मुली शाळेत जातो. पण सातवीनंतर आईबाबा आम्हाला शाळेत पाठवत नाहीत. कारण…

गौरी मांडत असेलेले सगळेच्या सगळे विचार सगळ्यांनाच मान्य होतील असं नाही. पण त्यालाच विचारस्वातंत्र्य म्हणतात. न पटणाऱ्या विचारांचा तुम्ही प्रतिवाद करु शकता. न्यायालयात दाद मागू शकता. पण कट्टरतावादाला विचारस्वातंत्र्याचा हा लोकशाही अवकाश कधीच मान्य नसतो. त्यापेक्षा तोंड झाकून चोरपावलांनी येत गोळ्या घालणं त्यांना अधिक आवडतं किंवा जमतं. तोंड…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ‘संस्कारभारती’ ही संस्था ‘मनुस्मृती’चा मेकओव्हर करणार असून मनूविषयीचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याच्या बातम्या मराठी वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध होत आहेत. मुळात जो ग्रंथ या भूमीतल्या दलित-बहुजनांच्या गुलामगिरीचा उद्घोष करतो, त्याचा मेकओव्हर कशासाठी? कोणासाठी? या मेकओव्हरमधून काय दडवायचे आहे, काय झाकायचे आहे? हे प्रश्न आजच्या…