काश्मिर खोरं हे नियमितपणे अतिरेक्यांचं, कश्मीरी लोकांचं, सशस्त्र दलाच्या जवानांचं रक्त बघणारं साक्षीदार आहे आणि त्यात आता पर्यटकांचीही भर पडली आहे. मे २०१८ च्या सुरुवातीला शाळेच्या बसवरही दगडफेक झाली आणि त्यात अकरा वर्षांच्या मुलाला मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर काश्मिरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी रमझानचा पवित्र महिना सुरू असल्याने…
नुकतेच (मे २०१८) अलिगड मुस्लिम विद्यापीठाने भारताचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांना अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या विद्यार्थी युनियनचं आजीवन सदस्यत्व देऊन सन्मानीत करण्यासाठी बोलावलं होतं. त्यांना योग्य ती सुरक्षा पुरवल्यानंतरही हिंदु युवा वाहिनी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सशस्त्र कार्यकर्ते त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत पोहोचले. या सशस्त्र आंदोलकांचा आक्षेप असा…
यावर्षी १४ एप्रिलला भीमराव आंबेडकरांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त देशभर मोठ्या उत्साहात अनेक कार्यक्रम पार पडले. त्यामध्ये विशेषतः भाजपनेही सहभाग घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर जाहीर करून टाकलं की, काँग्रेस कायम बाबासाहेबांच्या विरोधात होती आणि म्हणूनच आपल्या सरकारने त्यांना योग्य तो सन्मान दिला आहे. आतापर्यंत इतर कोणत्याही…