fbpx
Author

डॉ. मोहन द्रविड

Browsing

श्रीलंकेमध्ये हजार सत्य गोष्टींच्या आधी एक लोणकढी थाप चटकन खपते. – मायकल ओनडाट्ये, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे श्रीलंकन लेखक श्रीलंकेचा दक्षिण किनारा काहीसा गोलाकार आहे. त्याचा पश्चिम भाग भारताकडे तोंड करून आहे. तिथे श्रीलंकेची राजधानी आणि बंदर कोलंबो आहे. पण त्या बंदराचा उपयोग आंतरराष्ट्रीय व्यापाराकरता फारसा होत नाही. कारण भारत…

यूक्रेनला द्यायचे ४० अब्ज डॉलर अमेरिकेच्या संसदेत विक्रमी वेळात मंजूर झाले. तरीही राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडल्यापासून मंजूर व्हायला दीड आठवडा लागला. सगळ्यांना—विशेषत: अमेरिकेतील पुरोगाम्यांना—एवढी घाई लागली होती की त्यांना ही रक्कम दोन दिवसांत मंजूर व्हायला पाहिजे होती. राष्ट्राध्यक्ष बायडन यांची मागणी ३३ अब्ज डॉलरची होती.…

एक जमाना असा होता की बातम्या स्वयंभू घडायच्या. याउपर आपल्याला जर काही घडामोडी पाहिजे असतील तर त्या घडवून आणाव्या लागत. एक उदाहरण: एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी अमेरिकेला स्पेनविरुद्ध युद्ध पाहिजे होतं. पण त्यासाठी जनतेला कसं तयार करायचं? जनतेला सहसा युद्ध नको असतं. आपली मुलं मरायला पाठवायची, किंवा दुसर्‍याची मारायची…

इराक, २००३

अमेरिकेच्या मदतीने चाललेल्या येमेनमधल्या नरसंहारात आतापर्यंत दोन लाख माणसं मृत्यू पावलीत. यूनोच्या अंदाजाप्रमाणे दीड कोटी मरणाच्या दारात आहेत. युद्धामुळे आणि उपासमारीमुळे. हे आपल्यापैकी किती जणांना ठाऊक आहे? फारच थोडया. कारण ते सी. एन. एन. किंवा बी. बी. सी. वर दाखवत नाहीत. न्यूयाॅर्क टाइम्सच्या बातम्यांत ते नसतं. आणि अशा…

इंधनाचे राजकारण की राजकारणासाठी इंधन

उत्तरप्रवाह-२ या नावाच्या नॅचरल गॅसच्या चार फूट व्यासाच्या आणि १२०० किमी लांबीच्या रशिया ते जर्मनी दोन मोठया पाइपांचे बांधकाम गेल्या महिन्यात पुरे झाले. (जर्मनी ते उर्वरित युरोप पाइप आधीपासूनच अस्तित्वात आहेत.) या कामाला चार वर्षे लागली. बांधण्याचा खर्च १२ अब्ज डॉलर. त्यातले निम्मे पैसे रशियाने खर्च केले, बाकीचे…

काय्ल रिटनहाउस

अमेरिकेतल्या एकूण एक लोकांचं एका गोष्टीबद्दल एकमत आहे आणि ती म्हणजे जगातील कोणत्याही दुसऱ्या देशापासून अमेरिकेला शिकण्यासारखं काही नाही. किंबहुना बाकीचे देश अस्तित्त्वात आहे हेच त्यांच्या खिजगणतीत नसतं. मग त्यांना इतिहास आहे, त्यांचे काही अनुभव असू शकतील या गोष्टी बाजूलाच राहिल्या. जगाचा इतिहास अमेरिकेपासून चालू होतो आणि अमेरिकेपर्यंत…

अमेरिकेतले भांडवलशाही-राजकारण लैंगिक शोषणाचे नेक्सस

गेले दोन आठवडे अमेरिकेमध्ये गिलेन मॅक्सवेल नामक एका बाईवर लैंगिक शोषण आणि त्यासाठी लहान मुलींना फसवण्याबाबत खटला सुरू आहे. मॅक्सवेल या बाईवर मूळात खटला चालण्याचं कारण की ती जेफरी एप्स्टीन नामक एका श्रीमंत, गुन्हेगार आणि अनेक मुलींच्या लैंगिक शोषणाला कारणीभूत अशा महाभागाची मैत्रीण. या खटल्याच्या निमित्ताने एप्स्टीन आणि अमेरिकेतल्या…