अमेरिकेच्या मदतीने चाललेल्या येमेनमधल्या नरसंहारात आतापर्यंत दोन लाख माणसं मृत्यू पावलीत. यूनोच्या अंदाजाप्रमाणे दीड कोटी मरणाच्या दारात आहेत. युद्धामुळे आणि उपासमारीमुळे. हे आपल्यापैकी किती जणांना ठाऊक आहे? फारच थोडया. कारण ते सी. एन. एन. किंवा बी. बी. सी. वर दाखवत नाहीत. न्यूयाॅर्क टाइम्सच्या बातम्यांत ते नसतं. आणि अशा…
उत्तरप्रवाह-२ या नावाच्या नॅचरल गॅसच्या चार फूट व्यासाच्या आणि १२०० किमी लांबीच्या रशिया ते जर्मनी दोन मोठया पाइपांचे बांधकाम गेल्या महिन्यात पुरे झाले. (जर्मनी ते उर्वरित युरोप पाइप आधीपासूनच अस्तित्वात आहेत.) या कामाला चार वर्षे लागली. बांधण्याचा खर्च १२ अब्ज डॉलर. त्यातले निम्मे पैसे रशियाने खर्च केले, बाकीचे…